बातम्यांच्या जगात महिलांचा टक्का कसा वाढवावा?

वर्तमानपत्र वाचणारी महिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सकाळसकाळी वाफाळत्या चहाबरोबरचं पेपरवाचन असो किंवा रात्री झोपण्यापूर्वी ट्वीटर फीड पाहत जोरदार टीकाटिप्पणी असो...तुमच्या हे कधी लक्षात आलंय का की जाणीवपूर्वक किंवा नकळतही बातम्या दोन गटात विभागल्या जातात.

राजकारण, अर्थव्यवस्था, निवडणुका, आंतरराष्ट्रीय संबंध असे विषय जे महत्त्वपूर्ण मानले जातात ते पुरुषांचे होतात. आरोग्य, शिक्षण, मनोरंजन असे हलकेफुलके विषय महिलांसाठी केले जातात. महिलांना हेच आवडतं असं मानलं जातं.

बातम्यांचा हा अनुबंध आणि बातम्या वाचणाऱ्यांबद्दलचं हे आकलन पारंपरिक विचारांची देणगी आहे. पारंपरिक विचारसरणीनुसार पुरुष घराबाहेर पडतो, पैसे कमावतो. पुरुषांच्या विचारांची झेप व्यापक असते, त्यांचं कुतूहूल सर्वसमावेशक असतं असं मानलं जातं.

महिला घर चालवतात. त्यांचं जग घरापुरतं मर्यादित आहे त्यामुळे घराबाहेरच्या विषयांची त्यांची जाण त्रोटक आहे असं मानलं जातं.

लिहितावाचणाऱ्या पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. इंटरनेट आणि मोबाईलचा अक्सेस म्हणजे वापरण्याचं प्रमाणही त्यांचं जास्त आहे. त्यामुळे बातम्या तेच करतात आणि बातम्या त्यांना समोर ठेऊनच केल्या जातात.

बातम्या निवडणारे आणि लिहिणारे अशा वाचकांचा विचारच करत नाहीत ज्यांचं जग मर्यादित आहे. अनेक विषय त्यांच्या कक्षेबाहेरचे समजले जातात.

आपली पत्रकारिता त्या कठीण विषयांना सर्वसामान्य माणसाला समजेल असं कशी होऊ शकते? जेणेकरुन महिला दुय्यम दर्जा श्रेणीत न राहता पुरुषांच्या बरोबरीने असतील.

बातम्यांची निवड आणि त्याची मांडणी करताना जेंडर लेन्स लागू करण्याची आवश्यकता आहे.

आता जग बदलतं आहे. महिलांनी पत्रकारितेत स्थान निर्माण केलं आहे. बातम्यांचे जुने ढाचे आणि संरचना यांना त्या आव्हान देत आहेत.

बीबीसीचा उपक्रम BBCShe च्या दुसऱ्या आवृत्तीत आम्ही माध्यमसंस्थांच्या बरोबरीने अशा बातम्यांवर काम करतोय अशा मोठ्या बातम्या ज्यांनी महिलांच्या आयुष्यावर परिणाम केला.

BBCShe काय आहे?

टीव्ही पाहणारी महिला

फोटो स्रोत, Getty Images

याअंतर्गत देशातल्या विविध भागातल्या आणि विविध भाषेत काम करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांशी संपर्क केला. पत्रकारितेतील जेंडर लेन्सबद्दल त्यांचं म्हणणं समजून घेतलं.

आपापासातील चर्चेनंतर असं ठरलं की असा एक मुद्दा/गोष्ट असावी जी महिला, पुरुष आणि एकूणच सगळ्यांसाठी लिहिली जाईल.

आम्ही ज्या सहा संघटनांबरोबर काम केलं त्या खालीलप्रमाणे आहेत-

  • बाईमाणूस - औरंगाबादहून या वेबसाईटचं काम चालतं. पत्रकारिकेतेचा पारंपरिक ढाचापल्याड जात सर्वसामान्य महिलांच्या आयुष्याशी निगडीत मुद्यांना समोर आणणं. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्ये दलित, आदिवासी, वंचितउपेक्षित समाजाच्या गोष्टी वाचकांसमोर आणणं हेही वेबसाईटचं उद्दिष्ट आहे.
  • फेमिनिझम इन इंडिया- इंग्रजी आणि हिंदीत असलेल्या या वेबसाईटचा हेतू आहे की समाजात स्त्रीवादासंदर्भात आकलन वाढवणं. याच विषयाशी निगडीत बातम्या, लेख या वेबसाईटवर असतात. महिला आणि समाजातील वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणणं. त्यांचं प्रतिनिधित्व वाढीस लावणं.
  • द ब्रिज - खेळांशी निगडीत पत्रकारितेचं व्यासपीठ. पण ही फक्त क्रिकेटबद्दल बातम्या-लेख देणारी वेबसाईट नाही. ऑलिम्पिक आणि तत्सम मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या बातम्या चर्चेत असतात. पण वर्षभर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांचं वृत्तांकन आणि खेळाडूंच्या संघर्ष कहाण्या वाचकांसमोर आणणं हे ब्रिजचं उद्दिष्ट.
  • गुडगाव की आवाज- राजधानी दिल्ली आणि एनसीआर अर्थात नॅशनल कॅपिटल टेरिटरी भागात चालवलं जाणारं एकमेव कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. गुडगाव भागात या रेडिओ स्टेशनवरील कार्यक्रम स्थानिक गावकरी ऐकतात तसंच कामगार वर्ग प्रवास करतानाही कार्यक्रम ऐकतात. शिक्षण, आरोग्य, राजकारण अशा अनेकविध विषयांवर कार्यक्रम असतात.
  • द न्यूजमिनिट- देशभरातल्या बातम्या देणाऱ्या या वेबसाईटचं लक्ष्य दक्षिण भारतातील पाच राज्यं आहेत. या भागात त्यांचे पत्रकार आहेत. बंगळुरूस्थित या वेबसाईटवर इंग्रजीत लेख असतात. यांचे व्हीडिओ तामीळ भाषेतही उपलब्ध आहेत.
  • वूमन्स वेब- पारंपरिक प्रसारमाध्यमं ज्या पद्धतीने विचार करतात तो बाजूला ठेऊन काम करणं हे या वेबसाईटचं वेगळंपण आहे. महिलांचं आयुष्य आणि त्यांच्या गोष्टी या वेबसाईटवर असतात. इंग्रजीत अशा या वेबसाईटद्वारे वर्कशॉप आणि सेमिनारही आयोजित केले जातात.
बातम्या वाचणाऱ्या मुली

फोटो स्रोत, Getty Images

या प्रसारमाध्यम संस्थांशी बोलून,चर्चा करून आम्हाला महिलांचं आयुष्य, त्यांच्या आवडीनिवडी यासंदर्भातील बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे मार्ग काय आहेत ते समजलं.

या संस्थांच्या बरोबरीने हुडकलेल्या सहा गोष्टी लेख आणि व्हीडिओ स्वरुपात बीबीसीच्या सर्व भाषांमध्ये- हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, तेलुगू, तामीळ वेबसाईट,सोशल मीडिया हँडल तसंच या संस्थांच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील,पाहायला मिळतील.

हा आमचा प्रयत्न आहे जेंडर लेन्स समजून घेण्याचा. महिलांच्या अनुषंगाने बातम्या शोधण्याची,मांडण्याची पद्धत आणखी चांगलं करणं. हा प्रयत्न यापुढेही सुरू राहील.

BBCSheच्या पहिल्या आवृत्तीत पाच वर्षांपूर्वी आम्ही देशातल्या विविध शहरातल्या,भागातल्या सर्वसामान्य महिलांना विचारलं होतं की त्यांना बीबीसीवर काय वाचायला-पाहायला आवडेल? त्यांनी केलेल्या सूचनांवर आम्ही काम केलं. या सगळ्या बातम्या तुम्ही या इथे पाहू शकता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)