मॉलमध्ये दागिने चोरण्यासाठी तो पुतळा बनून उभा राहिला, दुकानातल्या नोकरांनाही कळलं नाही

फोटो स्रोत, WARSAW POLICE
- Author, जेम ओरेली
- Role, बीबीसी न्यूज
पोलंडची राजधानी वॉर्सा येथून एक अतिशय रंजक घटना समोर आली आहे. इथं एका 22 वर्षीय तरुणानं दागिने चोरण्यासाठी शक्कल लढवली.
तो एक पिशवी हातात घेऊन शॉपमधील मॅनेक्विन (Mannequin) म्हणजे ड्रेस परिधान केलल्या पुतळ्या सारखा उभा राहिला. शॉपिंग मॉलमधील कपड्याच्या दुकानात ठेवलेल्या पुतळ्या ( मॅनेक्वीन ) प्रमाणे अगदी हुबेहूब नक्कल त्यानं केली.
कोणालाच त्यावर शंका आली नाही. मॉल बंद होतानं शटर अर्ध खाली खेचलं होतं. तेव्हा हा तरुण आत शिरला आणि त्यानं हा कारनामा केला.
वॉर्सा पोलिसांनी या घटनेचा फोटो जारी केला आहे. हा तरुण दुकानाच्या काचेच्या खिडकीच्या मागे पुतळा होऊन उभा असलेला दिसतो. तसंच बॅग हातात धरलेली दिसते.
हा आरोपी पुतळा असल्याचं एवढं छान दाखवत होता की दुकानातील कर्मचाऱ्यांनाही त्याची कल्पना नव्हती.
पोलीस प्रवक्ता रॉबर्ट सझुमियाटा यांनी सांगितलं की, कपड्यांच्या दुकानाच्या अर्धवट उघड्या शटर खाली तो सीसीटीव्हीत कैद झाला.

फोटो स्रोत, WARSAW POLICE
वॉर्सा पोलिसांच्या म्हणण्यानुसार संधी साधून आधी या तरुणानं मॉलमधील मॅनिक्विन म्हणजे पुतळ्याचं रूप धारण केलं. त्याला सुरक्षित वाटले, तोपर्यंत तो पुतळा बनून स्थिर राहिला नंतर शॉपिंग बंद शॉपमध्ये फिरला.
त्यानंतर दुकानातून दागिने चोरले आणि काही कॅश घेतली. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिलं आणि पोलिसांना बोलावलं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.या व्यक्तीला तीन महिन्यांची कोठडी सुनावण्यात आली आहे, असं वॉर्सा येथील सरकारी वकिलांनी सांगितलं.
वॉर्सा पोलीस म्हणाले की, त्यानं दुसऱ्या शॉपिंग सेंटर मधील रेस्टॉरंटमध्ये उशीरा जेवण केले होतं आणि तो मॉल बंद होण्याची वाट पाहत होता. जेवणाआधी त्याने एका कपड्याच्या दुकानात जावून नवीन कपडे घेतले. कपडे बदलून तो मग तो रेस्टॉरंटमध्ये गेला होता.
या व्यक्तीवर दुसऱ्या काही मॉलमधून वस्तू चोरल्याचा आरोप आहे. त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचा आरोप आहे आणि त्याला या सर्व प्रकरणांमध्ये 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
हेही नक्की वाचा
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








