राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतरही मुंबई महापालिकेमध्ये सत्ता का नाही आली?
राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतरही मुंबई महापालिकेमध्ये सत्ता का नाही आली?
गेल्या 25 वर्षांपासून 'शिवसेने'च्या हातात असलेली मुंबई महापालिका पुन्हा ठाकरेंच्या हातात जाणार की प्रतिष्ठेची लढाई ठरलेली ही महापालिका भाजप आपल्याकडे खेचून घेणार, असा हा अटीतटीचा सामना होता.
अगदी गेल्या वर्षभरापासूनच या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं होतं. मग ते शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीला विरोध असो, मराठी भाषेचा मुद्दा असो वा त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी टप्प्याटप्प्याने मनोमिलन करणं असो.
'शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?' या प्रश्नाचंही पुन्हा नव्याने उत्तर शोधणारी ही निवडणूक ठरणार होती.
पण, ठाकरेंच्या ऐतिहासिक एकजुटीनंतरही बीएमसीमध्ये सत्ता का नाही आली? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






