जर्मनीत चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांचा निवडणुकीत पराभव, सीडीयूचे फ्रेडरिक मर्झ बनणार नवे चान्सलर

फ्रेडरिक मर्झ
फोटो कॅप्शन, जर्मनीमध्ये फ्रेडरिक मर्झ यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) पक्षाच्या आघाडीनं विजय मिळवला आहे.
    • Author, पॉल कर्बी
    • Role, बीबीसी न्यूज

जर्मनीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फ्रेडरिक मर्झ यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) पक्षाच्या आघाडीनं विजय मिळवला आहे. मात्र विरोधातील पक्षांपेक्षा खूप पुढं असूनही त्यांना अपेक्षित 30% मतांचा आकडा गाठता आला नाही.

"चला आज रात्री आनंद साजरा करुया आणि सकाळी कामाला लागूया", असं या यशानंतर समर्थकांना उद्देशून त्यांनी म्हटलं. तसेच "आपल्यासमोर असलेल्या जबाबदारीची जाणीव आहे", असंही ते पुढं म्हणालेत.

या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर असलेला अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (AfD) हा पक्ष 20.8% इतकी मतं मिळवून आनंद साजरा करत आहेत.

लिबरल एफडीपी (liberal FDP)पक्षाच्या चान्सलर पदाच्या उमेदवार अ‍ॅलिस वेडेल (Alice Weidel) यांनी त्यांच्या समर्थकांसोबत विजयोत्सव साजरा केला.

मात्र, त्यांच्या पक्षालाही अजून चांगल्या निकालाची आशा होती, त्यामुळे निकालानंतर एएफडीच्या मुख्यालयातील वातावरण शांत होतं.

झेडडीएफ (ZDF)या पब्लिक ब्रॉडकास्टरने केलेल्या सर्वेक्षणानुसार एएफडी पूर्वेकडील इतर पक्षांच्या तुलनेत खूपच पुढे असल्याचं निकालाचे आकडे समोर येताच स्पष्ट झालं.

"जर्मन लोकांनी बदलासाठी मतदान केलं आहे," असं मत अ‍ॅलिस वेडेल यांनी व्यक्त केलं आहे.

त्यांनी म्हटलं की, फ्रेडरिक मर्झ यांचा युती करण्याचा प्रयत्न अखेर अपयशी ठरेल, "आपल्याकडे नवीन निवडणुका होतील. आपल्याला आणखी चार वर्षे वाट पहावी लागेल, असं मला वाटत नाही."

पण पूर्वेकडील निवडणुकीचा नकाशा हलका निळा झाला तसाच जर्मनीचा बराचसा भाग काळा झाला.

निळा रंग हा एएफडीचा आहे तर काळा हा सीडीयू पक्षाचा रंग आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कोणत्या पक्षाला किती मतदान?

गेल्या वर्षाच्या अखेरीस ओलाफ शोल्झ (Olaf Scholz) यांची तीन पक्षांची आघाडी तुटल्यानंतर मर्झ यांनी मतदारांना दुसऱ्या एका पक्षासोबत स्पष्ट आघाडी करण्यासाठी भक्कम जनादेश मागितला होता.

यामुळे स्थिर अर्थव्यवस्थेपासून ते अनियमित स्थलांतरितांसाठी सीमा बंद करण्यापर्यंत जर्मनीच्या अनेक समस्या चार वर्षांत सोडवता येतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

जर्मन मतदारांचे विचार वेगळे होते. ते मोठ्या संख्येने बाहेर पडले, 1990 मध्ये जर्मनीचं पुन्हा एकीकरण होण्यापूर्वी पासून आत्तापर्यंतचं सर्वात जास्त म्हणजे सुमारे 83% मतदान या निवडणुकीत झालं.

मात्र 28.6% मतं मिळालेल्या मर्झ यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅट्स आणि त्यांच्या बव्हेरीयन सिस्टर्स पक्षाला याहून जास्त मतांची अपेक्षा होती.

मर्झ हे पायलटही आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मर्झ हे पायलटही आहेत.

फ्रेडरिक मर्झ यांनी एएफडीसोबत काम करण्यास नकार दिला आहे.

त्यांचा सर्वात संभाव्य भागीदार असलेल्या सोशल डेमोक्रॅट्स पक्षाला 16.4% मतांसह आतापर्यंतच्या सर्वात वाईट निकालाला सामोरं जावं लागलं आहे.

त्यांचे नेते आणि मावळते चान्सलर ओलाफ शोल्झ यांनी सांगितलं की, निवडणुकीचा निकाल पक्षासाठी धक्कादायक असून आघाडीच्या चर्चेत सहभागी होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

सीडीयूच्या कामगिरीमुळे दोन पक्ष युतीसाठी पुरेसे असतील, अशी शंका होती.

जर्मनीने नुकतीच तीन पक्षीय युतीची चार वर्षे पूर्ण केली आहेत आणि त्यांचा एक भागीदार रॉबर्ट हॅबेक यांचा ग्रीन्स पक्ष देखील होता. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मर्झ यांनी त्यांची खिल्ली उडवली होती.

69 वर्षीय मर्झ यांनी कधीही मंत्रिपद भूषवलेलं नाही, परंतु युरोपमध्ये नेतृत्व दाखवणारे आणि युक्रेनला पाठिंबा देणारे ते पुढील जर्मन चान्सलर बनतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

इलॉन मस्क यांच्यावर हस्तक्षेप केल्याचा आरोप

अब्जाधीश इलॉन मस्क आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी निवडणुकीत अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (AfD) ला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे बहुतेक जर्मन लोकांना धक्का बसला आहे.

म्यूनिकच्या भेटीदरम्यान वेन्स यांच्यावर मतदानात हस्तक्षेप केल्याचा आरोप होता, तर मस्क यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर एएफडीच्या समर्थनार्थ वारंवार भाष्य केलं होतं.

यामुळे अ‍ॅलिस वेडेल आणि त्यांच्या पक्षाचं काहीही नुकसान झालं नाही, कारण एएफडीला चार वर्षांपूर्वी पाठिंबा मिळाला होता. त्यांना टिकटॉक मोहिमेचाही फायदा झाला होता कारण त्यामुळे मोठ्या संख्येनं तरुण मतदार आकर्षित झाले होते.

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर एएफडीच्या समर्थनार्थ वारंवार भाष्य केलं होतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेर्झ यांच्या विजयाचं स्वागत केलं आहे. "ऊर्जा आणि स्थलांतर या विषयांसंबंधित कॉमन सेन्सच्या अजेंड्याला" अमेरिकन लोकांप्रमाणे जर्मनही कंटाळले आहेत याचाच हा पुरावा असेल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जर ती एक सूचना होती तर मर्झ यांनी ती एक सूचना म्हणून घेतली नाही. रविवारी रात्री टीव्हीवर झालेल्या एका चर्चेदरम्यान त्यांनी सांगितलं की, गेल्या आठवड्यात हे स्पष्ट झालं आहे की ट्रम्प प्रशासन "युरोपच्या भवितव्याबद्दल मोठ्या प्रमाणात उदासीन आहे".

ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना 'हुकूमशहा' म्हणून संबोधित केलं आहे आणि त्यांनी कीववर युद्ध सुरू केल्याचा आरोप देखील केला आहे. जे युद्ध रशियानं अगदी तीन वर्षांपूर्वीच युक्रेनवर लादलं होतं.

मर्झ यांच्या विजयाचं युरोपमधील बहुतेक भागात लगेचंच स्वागत

युरोपला लवकरात लवकर मजबूत करण्याला आपलं पूर्ण प्राधान्य असेल जेणेकरून आपण टप्प्याटप्प्यानं अमेरिकेपासून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवू शकू, असं मत मर्झ यांनी व्यक्त केलं आहे.

मर्झ यांच्या विजयाचं युरोपमधील बहुतेक भागात लगेचंच स्वागत झालं. फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जगातील आणि आपल्या खंडातील प्रमुख आव्हानांना तोंड देण्यासाठी अनिश्चिततेच्या काळात एकत्र येण्याबद्दल भाष्य केलंय.

तर युकेचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी आपली संयुक्त सुरक्षा वाढविण्यासाठी आणि आपल्या दोन्ही देशांसाठी विकास साधण्याचा प्रयत्न करण्याबाबत भाष्य केलंय.

फ्रेडरिक मर्झ यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅट्स पक्ष त्याच्या यशासाठी वृद्ध मतदारांवर अवलंबून आहे, तर 18-24 वयोगटातील मतदारांना एएफडी आणि अलिकडच्या आठवड्यात मतदानात वाढ झालेल्या डाव्या पक्षात जास्त रस असल्याचं दिसून येतंय.

जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल यांच्यासह फ्रेडरिक मर्झ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल यांच्यासह फ्रेडरिक मर्झ

काही काळापूर्वीच डावे लोक 5% पेक्षा खूपच कमी मतदानासह संसदेतून बाहेर पडत होते.

परंतु नेत्या हेदी रीचिन्नेक संसदेत ज्वलंत भाषणे देत असल्याच्या टिकटॉक व्हिडिओंची मालिका व्हायरल झाली. त्यांना जवळपास 9% मते मिळाली आणि एआरडीच्या सर्वेक्षणानुसार, तरुणांची एक चतुर्थांश मते मिळाली.

एआरडीच्या सर्वेक्षणानुसार नेते हेडी रिचिनेक यांची संसदेत भाषणं करतानाचे व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाले आणि त्यांना जवळपास 9% तरुण मतांच्या एक चतुर्थांश मते मिळाली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.