बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत...

1. 'राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शेकडो बोगस शाळा', अशी ओळखा बोगस शाळा

महाराष्ट्रात सीबीएसई बोर्डाच्या इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी शासनाचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र मिळवल्याचं शिक्षण विभागाच्या चौकशीत उघड झालं आहे.

अशा एक दोन नव्हे तर राज्यात तब्बल 600 शाळा अनधिकृत असण्याची शक्यता खुद्द शिक्षण विभागानेच वर्तवली आहे.

ही बातमी समोर आल्यानंतर आपला पाल्य ज्या शाळेत शिकतो ती शाळा अनधिकृत तर नाही ना? असा प्रश्न तुमच्या मनातही आला असेल.

याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. बोगस शाळांचं हे प्रकरण नेमकं काय आहे? हे रॅकेट कसं उघड झालं?

अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांचं पुढे काय होणार? आणि पालकांनी अनधिकृत शाळा कशा ओळखाव्या? पाहूया याबाबत शिक्षण विभागाने काय माहिती दिली आहे.

2. गंगा विलास क्रूझ कशी आहे? बिहारचे नेते तिला का विरोध करत आहेत?

13 जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्चुअल माध्यमातून वाराणसी येथील जगातील सर्वांत लांब क्रूझ गंगा विलासला हिरवा कंदील दाखवला.

गंगा विलास क्रूझचा प्रवास वाराणसीतील रविदास घाट येथून सुरू होईल आणि बिहार, बंगालमार्गे बांगलादेशला वळसा घालून आसाममधील दिब्रुगड मध्ये संपेल.

हा प्रवास एकूण 51 दिवसांचा असेल.परंतु, या क्रूझचा प्रवास सुरु होण्यापूर्वीच त्याला बिहारमध्ये विरोध सुरू झालाय. पण त्याचं नेमकं कारण काय आहे?

3. नाटू-नाटू या आरआरआर सिनेमातल्या गाण्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

तेलगू सिनेमा आरआरआर मधल्या नाटू-नाटू या प्रसिद्ध गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग हा गोल्डन ग्लोबचा पुरस्कार मिळाला आहे.

गेले काही महिने हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं आहे. 

नाटू-नाटू (हिंदीमध्ये नाचो-नाचो) या गाण्याला ज्युनिअर एनटीआर-रामचरण आणि एस. एस. राजमौली यांच्यामुळे एक वेगळीच झेप घेता आली आहे.

 हे गाणं कसं तयार झालं? ते पडद्यावर येण्याआधी या सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली, संगीत दिग्दर्शक किरावानी, गीतकार चंद्रबोस यांच्या डोक्यात काय सुरू होतं?

4. तुम्हाला सतत 'खाण्याचा' आजार आहे का?

होय. सतत खाणं ही एक सवय नसून तो आजार असू शकतो.

बहुतेकवेळा आपलं खाणं, आपण खात असलेल्या पदार्थांचा आकार आणि वेळा यांचं समीकरण पाहिलं तर आपण अनेक चुका करत असल्याचं लक्षात येतं. 

गेल्या काही वर्षांमध्ये वस्तूंची, खाद्यपदार्थांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे तसेच आर्थिक प्रगतीमुळे भारतात आणि इतरत्रही वैयक्तिक सवयींमध्ये मोठे बदल झाले आहेत.

एकाच जागेवर फारवेळ बसून राहाणे, बैठे व्यवसाय- नोकऱ्या, पाकिटबंद पदार्थांची उपलब्धता, खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये आलेली विविधता तसेच काही मानसिक प्रश्नांमुळे आपल्या आहारावर मोठा बदल झाला आहे.

खाण्या-पिण्याच्या वेळा, पदार्थांचा आकार, त्यातील विविधता, बदलता बाजार आणि आपल्यात झालेल्या बदलांमुळे उच्च कॅलरीचा आहार घेणं, वारंवार घेणं सुरू झालं आहे. 

यामध्येच एक सतत खाण्याचा आजार म्हणजेच ‘बिंज इटिंग डिसॉर्डर’ (Binge eating disorder) नावाचा आजार दडलेला आहे.

5. जॅक मा यांचं वर्चस्व संपवण्याचं धोरण चिनी सरकारनं का आखलं?

अँट ग्रुपचे संस्थापक आणि आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले जॅक मा हे आपल्या कंपनीवरील नियंत्रण सोडणार आहेत.

या कंपनीच्या मालकीच्या अँट फायनान्शियल या कंपनीवरील जॅक मा यांचे नियंत्रण कमी होणार आहे. नियामक मंडळाच्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अँट ग्रुपच्या मालकीची अलीबाबा ही ई-कॉमर्स कंपनी आहे, जॅक मा अलीबाबा कंपनीचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत.

अँट फायनान्शियल ही अँट ग्रुपची महत्त्वाची कंपनी आहे. याच कंपनीचा अलीपे नावाचा ऑनलाइन पेमेंट सिस्टम प्लॅटफॉर्म आहे.

अँट ग्रुपने सांगितले आहे की या बदलानंतर कुणा एका व्यक्तीकडे सर्वाधिकार नसतील. जाणून घ्या, हे प्रकरण नेमकं काय आहे?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)