आम्ही संविधान वाचवलं नसतं तर तुम्ही पंतप्रधान झाला नसता - खर्गेंची मोदींवर टीका #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. आम्ही संविधान वाचवलं नसतं तर तुम्ही पंतप्रधान झाला नसता- खर्गेंची मोदींवर टीका
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आम्ही संविधान वाचवलं नसतं तर तुम्ही पंतप्रधान झाला नसता अशी टीका त्यांनी नांदेड येथे केलेल्या भाषणात केली आहे.
याआधीही खर्गे यांनी अशीच टीका गेल्या लोकसभेत केली होती. राहुल गांधी यांची पदयात्रा सध्या नांदेड जिल्ह्यात सुरू आहे. काल 10 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणं झाली. त्यामध्ये मल्लिकार्जून खर्गे यांनीही भाषण केले. खर्गे यांनी यावेळेस मराठीतून लोकांशी संवाद साधला.
ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.
या भाषणात खर्गे म्हणाले,“लोकांना मोदी, मोदीचा कंटाळा आला आहे. पंतप्रधान मोदी देशाबाहेर गेल्यावर मोदी, मोदी करणारे 500 ते 600 लोक असतात. या लोकांना आम्ही इंजिनीअर, डॉक्टर आणि प्राध्यापक केलं. हे सर्व डॉक्टर, इंजिनिअर आठ वर्षात झाले नाहीत. तरीही पंतप्रधान काँग्रेसने काय केलं विचारतात. आम्ही संविधान वाचवलं नसते, तर तुम्ही पंतप्रधान झाले नसता. तरीही पंतप्रधान विचारतात तुम्ही काय केलं. मात्र, पंतप्रधानांनी फक्त जुमलेबाजी केली. 15 लाख रुपये, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या कुठे आहेत?”
2. राऊतांनी वेळ मागितली तर....

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तुरुंगात जाण्यापूर्वी आक्रमक वाटणाऱ्या राऊत यांनी बाहेर आल्यावर मात्र काहीशी समजुतीची मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
पत्रकारांशी प्रथमच संवाद साधताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांचं कौतुक केलं आणि तेच सरकार चालवत असल्याचं म्हटलं. आपण देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊ असं राऊत यांनी सांगितलं.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आपणही राऊत यांना भेटणार का असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेळ मागितली; तर ती देऊन राऊत यांना भेटेन, असे स्पष्ट केले. ‘राजकारणातील कटुता दूर झालीच पाहिजे. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.
3. रवींद्र जडेजाच्या पत्नीला भाजपाची उमेदवारी
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला भारतीय जनता पार्टीतर्फे गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतउमेदवारी मिळाली आहे.
रिवाब जडेजा ही गुजरातमधल्या राजकोट इथं रहाणारी असून तिचे वडिल मोठे उद्योगपती आहेत. रिवाबा इंजिनिअर असून महाविद्यालयीन जीवनापासूनच ती सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. 2016 मध्ये रिवाबाने क्रिकेटपटू रवींद्र जडेजाशी लग्न केलं.
रवींद्र जडेजाचे वडिल अनिरुद्ध जडेजा आणि बहिण नैना जडेजा हे देखील राजकारणात आहेत. नैना जडेजा जामनगरमध्ये महिला काँग्रेस अध्यक्षा आहेत. रविंद्र जडेजा 17 वर्षांचा असताना त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर बहिण नैनानेच रवींद्र जडेजाचं पालन पोषण केलं. इतकंच नाही तर त्याला क्रिकेट खेळण्याला प्रोत्साहनही दिलं. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
4. संजय राठोड यांचा विषय संपवूया- चित्रा वाघ

फोटो स्रोत, Getty Images
महाविकास आघाडीत मंत्री असताना संजय राठोड यांना पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. आता ते शिंदे-फडणवीस सरकारमध्येही मंत्री असल्यामुळे आधी त्यांच्याविरोधात मोर्चा उघडणाऱ्या चित्रा वाघ यांना सतत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे चित्रा वाघ यांनी आता राठोड यांचा विषय संपवूया, राज्यात अनेक प्रश्न आहेत असे विधान केले आहे.
याबाबतची बातमी टाईम्स नाऊ मराठीने प्रसिद्ध केली आहे.
या बातमीनुसार, एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी वाघ यांना राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता वाघ म्हणाल्या की, “संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना क्लीनचिट दिली होती, त्यांना हा प्रश्न विचारा. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते त्यांना हा प्रशन विचारा इतकेच काय पुण्याचे पोलीस आयुक्त यांनाही राठोड यांना प्रश्न विचारा. यात मी कुठलीही पळवाट काढत नाही. जर कोर्टात जाणे पळवाट असेल तर सध्या राज्यात प्रत्येक जण पळवाट काढत आहे.”
5. सौर ऊर्जेमुळे भारताचे वाचले 4 अब्ज 20 लाख डॉलर्स
भारताने वाचवले चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारताने सौर ऊर्जेच्या माध्यमातून सुमारे चार अब्ज 20 लाख डॉलरचे इंधन वाचविले. त्याचप्रमाणे, एक कोटी 94 लाख टन कोळशाचीही बचत झाली, असे ऊर्जा क्षेत्रातील ‘एम्बेर’ या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.
या देशांसह फिलिपाईन्स, थायलंड या आशियातील सात देशांच्या सौर ऊर्जेतील योगदानामुळे यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान 34 अब्ज डॉलर जीवाश्म इंधनाची बचत झाली. याच काळातील एकूण जीवाश्म इंधनाच्या खर्चाच्या तुलनेत ही रक्कम नऊ टक्के आहे, असेही अहवालात नमूद केले आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








