ट्विटर खरंच बंद होणार आहे का?

musk

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, झोई क्लायेनमान
    • Role, तंत्रज्ञान संपादक

ट्विटरला रामराम करणाऱ्या मेसेजेनी ट्विटर भरुन गेलंय.

आता ट्विटरवर "RIPTwitter" असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तसेच त्याचा वापर करणाऱ्या अनेक लोकांना आपला डेटा डाऊनलोड करण्यात अडथळा येत आहे. 

काही लोकांनी इतरांना आपल्यापर्यंत पोहोचता यावं किंवा आपले अपडेट्स त्यांना मिळावेत यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

यात भर म्हणून ट्विटरचे नवे प्रमुख इलॉन मस्क यांनी एका थडग्याचं मीम शेअर केलं आहे. या थडग्यावर ट्विटरचा लोगो आहे. 

ट्विटर विकत घेतल्यावर एका आठवड्याभरात मस्क यांनी अनेक लोकांना कामावरुन काढून टाकलं. तसेच वेगवेगळ्या अटी तसेच कामाचे तास वाढवल्यावर अनेक कर्मचाऱ्यांनी स्वतःहून कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. 

हे काम सोडणाऱ्यांपैकी काही लोक इंजिनिअर, डेव्हलपर आणि कोडर आहेत. हे लोक ट्विटर चालण्यासाठी महत्त्वाचं काम करत होते. त्यामुळे हा ट्विटरचा पक्षी आपली फडफड खरंच थांबवेल का?

 ट्विटर हॅक होईल का?

पहिला सर्वात मोठा धोका असतो तो मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हॅकिंगचा. ट्विटरसह सर्वच मोठ्या संकेतस्थळांना हॅकिंगचा सतत धोका असतो.

जगातले नेते, राजकारणी तसेच सेलिब्रिटींची ट्विटरवर हँडल्स आहेत, त्यांना लाखो लोक फॉलो करत आहेत. त्यामुळे हॅकर्ससाठी हे अगदी सोपं सावज आहे. यापूर्वीही असं झालेलं आहे. 

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

किंवा ते नाहीसं करण्यासाठी त्यावर भरपूर वेब ट्रॅफिकचा मारा करुन बंद पाडता येईल. त्यामुळे ते आपोआपच बंद पडेल. असे प्रयत्न सतत होत असतात. त्याला तोंड देणं ही एक रोजची लढाई असते.

सायबर संरक्षण हा 21 व्या शतकातील कोणत्याही कंपनीच्या कामाचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र गेल्याच आठवड्यात ट्विटरच्या सायबर संरक्षण विभागाच्या प्रमुख लिआ किस्नर यांनी कंपनीला रामराम केलाय.

आता त्यांच्या जागी कोण येणार याची माहिती मिळालेली नाही. ट्विटरची आता कम्युनिकेशन टीमही नाही, त्यामुळे विचारण्याचीही सोय नाही. 

ट्विटरची सायबर संरक्षण यंत्रणा भक्कम असू शकते. महिन्याला 30 कोटी लोक वापरत असलेली साईट तुम्ही अशी कमकुवत धाग्यावर अवलंबून ठेवू शकत नाही. पण त्याला भक्कमपणा येण्यासाठी सततची देखरेख, दुरुस्ती आवश्यक असते. 

यासाठी तुम्ही तुमच्या फोन, लॅपटॉपचाही विचार करुन पाहू शकता. आपल्याला ते सुरक्षित ठेवण्यासाठी सतत सिक्युरिटी अपडेट्स येत असतात.

कारण कितीही संरक्षण वाढवलं तरी ते भेदण्यासाठी नवे पर्याय शोधले जात असतात. ते निकामी करण्यासाठी तुमच्या भात्यात नवी शस्त्रं असणं आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या उपकरणांचं रक्षण करण्यासाठी त्याचं चिलखत भक्कम करत राहिलं पाहिजे. 

सर्व्हरला धोका

 हॅकिंगपाठोपाठ धोक्याची दुसरी शक्यता म्हणजे सर्व्हरला धोका.

योग्य लक्ष नसणाऱ्या सर्वरमध्ये देखभालीच्यावेळेस कोणी चुकून क्षती पोहोचवली किंवा कोणी रागाच्या भरात त्यांची तोडफोड केली तर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

सर्व्हरविना ट्विटर राहूच शकत नाही. किंवा फेसबूक, इन्स्टाग्राम आणि डिजिटल जगतात असणारी कोणतीही गोष्ट सर्व्हरविना राहू शकत नाही. 

सर्व्हर, शक्तिशाली काँप्युटर्स हे या संकेतस्थळाचे अवयव आहेत. डेटा सेंटर्समध्ये ते असतात.

ऑनलाईन व्यवसायात सर्व कामकाज नियंत्रित करणारे, त्यांचं नियमन करणारे हे सर्वर संगणक ठेवलेले गोदामच असतात. सगळं जग सर्वरवर चालतं. ही सर्व यंत्र भरपूर उष्णता तयार करत असतात. त्यामुळे डेटा सेंटर्स सतत थंड ठेवावी लागतात. त्यासाठी सतत विजेची गरज असते. 

त्यात सतत माहितीचं आदान-प्रदान होत असल्यामुळे सर्वरची सुद्धा देखभाल किंवा ते बदलावे लागतात.

यात कोठेही चूक होऊ शकते आणि तशी चूक झालीच तर ती अचानक आणि नाट्यमय असू शकते.

इलॉन मस्क यांना याबद्दल नक्कीच माहिती असेल. ते कितीही विदुषकाचं सोंग घेत असले तरी त्यांना याती कल्पना असेलच. या सगळ्यावर सध्या कोण देखरेख ठेवतंय याची आपल्याला कल्पना नाही. 

कदाचित आपल्याला वाटतंय त्यापेक्षा अधिक लोक ट्विटरमध्ये असू शकतील. एका ज्योतिष सांगणाऱ्या महिलेने स्वयंचलित टूलच वापर केल्यामुळे तिचं अकाऊंट लॉक करण्यात आलं होतं. तिने आणि मी याबद्दल ट्विटरला प्रश्न विचारे पण उत्तर आले नाही. परंतु नंतर ते पुन्हा सुरू झालं. 

ट्विटरमध्ये कोणीतरी याकडे लक्ष देत होतंच. कदाचित ते लक्ष देणारे पुरेसे लोक तिथं असतील. 

यापेक्षा तिसरा पर्याय एकदम मोठा धक्का असू शकतो, तो म्हणजे ट्विटरची दिवाळखोरी मस्क यांनी जाहीर करणं आणि ते बंद होणं.

पण आता तरी ते ट्वीट म्हणून आनंद घेताना दिसतायत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त