संजय राऊत : 'जेलमध्ये गेल्यानं दृष्टी कमकुवत झाली, ऐकताना-बोलतानाही त्रास होतो' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

1. जेलमध्ये गेल्यानं दृष्टी कमकुवत झाली, ऐकताना-बोलतानाही त्रास होतो - संजय राऊत

"तुरुंगात असताना आपल्याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथे आपल्याला 15 दिवस ऊनही पाहता आलं नाही. बराच वेळ फ्लड लाईट्सच्या संपर्कात राहिल्यामुळे माझी दृष्टी कमकुवत झाली आहे. तसंच या कालावधीत आपलं 10 किलो वजनही घटलं आहे," अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ED मार्फत अटक करण्यात आली होती. तब्बल 3 महिन्यांनंतर त्यांना जामीन देण्यात आला आहे.

आपल्या तुरुंगवासातील अनुभवांबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं, “मला लिहिताना-वाचताना त्रास होत आहे. तसंच ऐकताना आणि बोलतानाही त्रास होतो.”

“पण ते ठिक आहे. मी स्वतःला युद्धकैदी समजतो. मी भाजपसमोर आत्मसमर्पण केलं असतं तर मूक दर्शक बनून राहिलो असतो,” असंही राऊत यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.

2. वर्ल्डकपमधील पराभवानंतर निवड समिती सदस्यांची BCCI कडून हकालपट्टी

भारतीय संघ

फोटो स्रोत, bcci/jayshah

ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या T-20 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरोधात दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

याचे पडसाद उमटण्याची सुरुवात झाली असून BCCI चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण निवड समितीच बरखास्त करून टाकली आहे. इतकेच नव्हे, तर या रिक्त पदांसाठी नव्याने अर्जही मागवण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडला होता. त्यावेळीसुद्धा हीच निवड समिती कार्यरत होती.

सलग दोन वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारतीय संघाकडून अपेक्षित कामगिरी होऊ न शकल्यामुळे निवड समितीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.

त्यामुळे BCCI ने यासंदर्भात कठोर भूमिका घेत निवड समितीतील सर्वच सदस्यांची हकालपट्टी केली.

या रिक्त पदांसाठी आता अर्ज मागवण्यात आली असून 28 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.

भूपेंद्र पटेल

फोटो स्रोत, facebook

3. भूपेंद्र पटेल हेच भाजपचे गुजरातचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

गुजरात विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

भुपेंद्र पटेल यांनी सप्टेंबर 2021 मध्ये विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली होती.

भाजपच्या या भूमिकेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. भूपेंद्र पटेल घाटलोडिया मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले असून यंदा त्यांना पुन्हा त्याच मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

4. मुख्यमंत्री कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाने शिंदे यांच्यावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते कार्यकर्त्यांना आपल्या गटात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

याच प्रयत्नांअंतर्गत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेशांचे कार्यक्रम घेतले जात असल्याचं दिसून येतं.

दोन दिवसांपूर्वी पालघरमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. याचे फोटो एकनाथ शिंदे यांनी स्वतः आपल्या ट्विटरवरुन शेअर केले होते.

या फोटोमध्ये या माणसांच्या मागे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री असा बोर्ड दिसत आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री कार्यालयात झाला का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकाही होताना दिसत आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

5. अभिनेते पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत

मराठी चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर हा चित्रपट असणार आहे.

या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. रवी जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती सर्वांना दिली.

आपल्या इन्स्टाग्रॅम अकाऊंटवरून याबाबत फोटो शेअर करताना रवी जाधव म्हणाले, “मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए – अटल. सर्वोच्च नेता अटल बिहारी वाजपेयी यांची जीवनकथा पडद्यावर मांडण्याचं भाग्य मला लाभलं.” ही बातमी लोकसत्ताने दिली.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)