एका बॅगेत मावणारी पोर्टेबल पवन चक्की, जी तुमच्या घराचं वीज बिल शून्यावर आणेल

पोर्टेबल पवन चक्की
    • Author, रुपेश सोनवणे
    • Role, बीबीसी गुजराती

“स्मार्टफोन इतकीच किंमत असलेली ही छोटी पवनचक्की पुढील 20 वर्षांसाठी तुमच्या घरातील वीज बिल शून्यावर आणू शकते. 20 वर्षे तुम्हाला कसली चिंता राहणार नाही.”

“तीन किलोवॅट सोलर युनिट दोन ते चार तास काम करून केवळ 12 युनिट वीज निर्माण करू शकतं. याउलट, आम्ही तयार केलेली पवनचक्की 24 तास काम करून 21 युनिटपर्यंत वीज निर्माण करण्याची क्षमता आहे.”, असं या पवनचक्कीचे निर्माते सांगतात.

तरुण कला पदवीधर डुंगरसिंग सोढा यांनी कोणतेही प्रशिक्षण न घेता, एक पवनचक्की विकसित केली आहे जी सामान्य माणसाला वीज बिलात दिलासा देऊ शकते असा त्यांचा दावा आहे.

मूळचे राजस्थानचे डुंगरसिंह आणि गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील तरुण दिव्यराज सिंह सिसोदिया यांनी 'सन विंड' नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे.

अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असलेली ही पवनचक्की एसी, टीव्ही, फ्रीज यांसारख्या दैनंदिन गरजेची उपकरणं चालवता येतील इतकी पुरेशी वीज निर्माण करू शकतं, असा त्यांचा दावा आहे.

'सन विंड'चे सह-संस्थापक दिव्यराज सिंह सध्या बीएचं शिक्षण घेत आहेत.

कोळसा, पेट्रोलियम उत्पादनं आणि इतर ऊर्जा स्रोतांच्या मर्यादित प्रमाणामुळं हल्ली बरेच लोक हे पवन आणि सौर ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.

अशा स्थितीत अक्षय ऊर्जा स्रोतांचा स्वस्त पर्याय उपलब्ध करून देऊन सामान्य माणूस आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्यात 'सन विंड' सारखे स्टार्ट अप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

हल्लीच्या काळात वीजबिलांमुळं सामान्य माणसाचं मासिक बजेट बिघडतं, पण पवनचक्की सारख्या पर्यायामुळं तुम्हाच्या खिशाला परवडेल अशी वीज बिल स्वस्तात उपलब्ध आहे.

ही स्वस्त, पोर्टेबल अशी तरुणांनी तयार केलेली पवनचक्की कशी चालते? आणि ती तुमचे वीज बिल शून्यावर कसं आणते? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बीबीसी गुजरातीनं 'सन विंड' स्टार्ट-अपच्या संस्थापकांशी खास बातचीत केली.

नोकरी सोडून कष्टानं पवनचक्की बनवली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्टार्टअपचे संस्थापक डुंगरसिंह सोढा हे राजस्थानचे आहेत.

पवनचक्की तयार करण्यामागे त्याच्या प्रेरणेबद्दल बोलताना ते सांगतात, “मी राजस्थान सारख्या राज्यातून आलो आहे, जिथं वीज-पाण्याची समस्या आहे.

वादळ आल्यावर अनेक दिवस वीज नसते. तेव्हाच माझ्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी आणि शहरी भागातील लोकांची या समस्येतून सुटका होईल असं काहीतरी करण्याची कल्पना माझ्या मनात आली.यातूनच त्यांना पवनचक्कीची कल्पना सुचली.” असं सोढा सांगतात.

ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सोढा यांनी पत्रकारितेची चांगली नोकरीही सोडली. आणि गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या पवनचक्क्यांची रचना आणि निर्मिती सुरू केली.

सोढा सांगतात की त्यांनी या उपक्रमावर आतापर्यंत दहा लाखांहून अधिक रुपये खर्च केले आहेत.

आधी म्हटल्याप्रमाणे त्यांनी पवनचक्क्या बनवण्याचं कोणतंही प्रशिक्षण घेतलं नाही असं ते सांगतात. सोशल मीडिया, इंटरनेट आणि पुस्तकांच्या माध्यमातून सर्व काही स्वतःहून शिकल्याचा त्यांचा दावा आहे.

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मर्यादा नसतात हे या उदाहरणावरून सिद्ध होते.

त्यांच्या पवनचक्क्यांचे फायदे सांगताना ते म्हणतात, “आम्ही घरासाठी पवनचक्क्यांची वेगवेगळी मॉडेल्स बनवली आहेत.

त्यात एक किलोवॅट क्षमतेच्या पवनचक्कीचाही समावेश आहे. ही ऊर्ध्व पवनचक्की तुमचं वीज बिल शून्यावर आणू शकते. आणि ती अगदी कमी किमतीत तुम्ही विकत घेऊ शकता.”

पवनचक्की कशी काम करते?

डुंगरसिंह सोढा हे या स्वयंनिर्मित पवनचक्क्यांचे फायदे सांगतात आणि म्हणतात की, ज्या ठिकाणी हवेचा प्रवाह चांगला आहे अशा सर्व ठिकाणी आम्ही तयार केलेली पवनचक्की चांगली वीज निर्माण करते. ही पवनचक्की घराच्या छतावरही लावता येते.

त्यांच्या पवनचक्कीची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले, “घरी बसवलेल्या पवनचक्कीतून निर्माण होणारी जास्तीची वीज ग्रीडलाही पाठवली जाऊ शकते. कार्यक्षम उत्पादन तयार करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम केले आहेत आणि त्यात वारंवार सुधारणा केल्या आहेत.”

डुंगरसिंह सोढा

मोठ्या आणि छोट्या पवनचक्क्यांच्या डिझाइनबद्दल बोलताना ते सांगातात, “पवनचक्कीचं डिझाइन आम्ही स्वत: तयार केलं. पवनचक्कीचे काही पार्टस् बाहेरून बनवणं स्वस्त होतं, तिथं आम्ही आमच्या डिझाइनच्या आधारे पार्ट्स तयार करुन घेतले.”

" पवनचक्कीच्या डिझाईनसाठी तसंच प्रत्येक पार्टवर संशोधन करण्यात महिने घालवले."

पवनचक्कीचं सविस्तर वर्णन करताना ते म्हणतात, "एक लहान पवनचक्की 15 किमी प्रतितास वाऱ्याच्या वेगानं आणि मोठी पवनचक्की पाच किमी प्रतितास वेगानं वीज निर्माण करते."

पवनचक्कीच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगताना ते म्हणतात की, त्यांची पवनचक्की केवळ घर, शेत किंवा मोकळ्या मैदानात उपयुक्त नाही. पण हे फोल्ड करण्यायोग्य आणि पोर्टेबल उत्पादन आहे. ज्यामध्ये कुठेही पवन ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे.

ते सांगतात की ही पवनचक्की इतकी 'शक्तिशाली' आहे की ती मोबाईल फोन चार्ज करू शकते, दुर्गम भागात पंखे चालवू शकते. तसंच यातून निर्माण होणाऱ्या विजेच्या मदतीनं 113 टन वीजपुरवठा करता येणार आहे.

“तुम्ही ही पवनचक्की तुमच्यासोबत पिकनिकला, दुर्गम भागात घेऊन जाऊ शकता आणि वीज निर्माण करू शकता,” डुंगरसिंग म्हणतात.

'सन विंड'चे सह-संस्थापक दिव्यराजसिंग म्हणतात, “घरच्या वापरासाठी पवनचक्कीसोबतच आम्ही संरक्षण क्षेत्रात उपयुक्त ठरू शकणारी पवनचक्कीही तयार केली आहे. जे फक्त 10-15 मिनिटांत स्थापित करुन सुरु केली जाऊ शकते."

"याच्या मदतीनं आपल्या देशाचे जवान दुर्गम भागातही वीजनिर्मिती करू शकतील."

घरच्या घरी बसवता येणारी छोटी पवनचक्की वापरून किती बचत होईल, याचा अंदाज घेऊन ते सांगतात की, या पवनचक्कीमुळं तुमचं वीज बिल किमान पाच हजार रुपयांनी कमी होऊ शकतं.

यंत्र

फोटो स्रोत, Getty Images

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, 31 डिसेंबर 2022 पर्यंत गुजरात राज्यानं 6,835 मेगावॅट पवन ऊर्जा आणि 6,325 मेगावॅट सौर ऊर्जा स्थापित केली आहे.

पण, मार्चमध्ये आणि गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत, गुजरात राज्यानं आपल्या क्षमतेपेक्षा अक्षय ऊर्जा स्रोतांमधून कमी ऊर्जा निर्माण केली.

ज्याबद्दल काही तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली.

केंद्रीय अक्षय आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या जुलै 2023 च्या अहवालानुसार, गुजरातनं अलीकडेच तमिळनाडूला मागे टाकून अक्षय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत पहिले स्थान मिळवलं आहे.

गुजरात राज्यात एकूण सौर, पवन आणि जैव ऊर्जा क्षमता 10.41 गिगावॅट्स एवढी आहे. संपूर्ण भारताच्या तुलनेत हे प्रमाण 51.3 टक्के आहे.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)