You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्नासाठी जाणारी बोट उलटून 100 हून अधिक मृत्युमुखी, अनेक लोक बेपत्ता
- Author, ख्रिस ईवोकोर आणि अॅलिस डेव्हिस
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, अबुजा आणि लंडन येथून
नायजेरियातील नैऋत्य प्रांतात नायजर नदीमध्ये लोकांना घेऊन जाणारी एक बोट बुडाल्यामुळे 100 पेक्षा जास्त लोक बुडाले आहेत तर अनेक लोक बेपत्ता आहेत.
या बोटीमध्ये 300 पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. ही बोट एका विवाह समारंभासाठी या लोकांना क्वारा राज्यातून नायजर राज्यात घेऊन जात होती.
ही बोट एका झाडाला थडकली आणि उलटली असं एका स्थानिक प्रशासकाने सांगितलं. यातील लोकांचा शोध सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
क्वारा राज्याचे राज्यपाल अब्दुल रहमान अब्दुल रझाक यांनी सांगितले, अनेक लोक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक लोकांचा अजूनही शोध लागलेला नाही.
ही घटना जिथं घडली त्या प्रदेशाचे स्थानिक प्रशासक इब्राहिम उमर बोलोगी- दुसरे यांनी सांगितले, की 150 हून अधिक लोक मृत्युमुखी पावले असावेत.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नदीतल्या लाटांमुळे बोट झाडला आपटली आणि बोट उलटली.
क्वारा पोलिसांच्या प्रवक्त्यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढू शकतो, अजूनही लोकांचा शोध सुरू आहे.
नायजेरियात अशाप्रकारे नदीतील अपघात वारंवार होतात.
नायजर नदी नायजेरिया देशाच्या मधोमध वाहते. आजूबाजूचे लोक रस्त्यापेक्षा कमी वेळात पोहोचण्यासाठी वाहतुकीसाठी नदीचा वापर करतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)