'हमास'ला BBC 'दहशतवादी' संबोधत नाही, याचं 'हे' आहे कारण

फोटो स्रोत, REUTERS
- Author, जॉन सिम्पसन
- Role, आंतरराष्ट्रीय घडामोडी, वृत्त संपादक
सरकारमधील मंत्री, वृत्तपत्रांचे स्तंभलेखक आणि जनता अशा सर्वानाच प्रश्न पडलाय की, दक्षिण इस्रायलवर भयंकर अत्याचार करणाऱ्या 'हमास'च्या बंदुकधाऱ्यांना बीबीसी 'दहशतवादी' म्हणून का संबोधत नाही?
याचं उत्तर तुम्हाला बीबीसीच्या स्थापनेच्या तत्त्वांमध्ये मिळतं.
'दहशतवाद' हा एक असा शब्द आहे, जो नैतिकदृष्ट्या वाईट आहे. लोक या शब्दाचा वापर त्यांना नापसंत असलेल्या अतिरेकी प्रणालीचा संदर्भ देण्यासाठी करतात. कोणाचं समर्थन करायचं आणि कोणाचा निषेध करायचा, हे सांगणं बीबीसीचं काम नव्हे. थोडक्यात काय चांगलं आणि काय वाईट, हे आम्ही लोकांना सांगू शकत नाही.
ब्रिटीश आणि इतर सरकारांनी 'हमास'ला 'दहशतवादी संघटना' म्हणून त्यांचा निषेध केला आहे. पण ते त्यांचं काम आहे. आम्ही अनेकांच्या मुलाखती घेतो. यात हमासला दहशतवादी म्हणून संबोधणाऱ्या लोकांचाही समावेश असतो.
मुद्दा हा आहे की, आम्ही ते आमच्या शब्दात सांगत नाही. आमचं काम आहे प्रेक्षकांना सत्य माहिती पुरवणं आणि त्यांना त्यांचं स्वतःचं मत बनवू देणं.
'दहशतवादी' हा शब्द न वापरल्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्या अनेकांनी आमचे फोटो पाहिले असतील, आमचे ऑडिओ ऐकले असतील, आमच्या बातम्या वाचल्या असतील. आमच्या वृत्तांकनाच्या आधारे त्यांनी स्वतःचं मत बनवलं असेल. पण आम्ही कोणत्याही प्रकारचं सत्य लपवत नाही.
आम्ही जे पाहिलं ते पाहून कोणतीही सामान्य व्यक्ती थक्क होईल. या घटनांना 'अत्याचार' म्हणणं अगदी वाजवी आहे.

फोटो स्रोत, REUTERS
नागरिकांची, विशेषत: लहान मुलांची आणि बाळांची हत्या करणं कोणत्याही शांतताप्रिय व्यक्तीला रुचणार नाही. याचं कोणीही समर्थन करू शकत नाही.
मी 50 वर्षांपासून मध्य पूर्वेत वार्तांकन करत आहे आणि इस्रायलमधील अशा हल्ल्यांचे परिणाम मी प्रत्यक्ष पाहिले आहेत.
मी लेबनॉन आणि गाझा याठिकाणी इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्याचे परिणाम देखील पाहिले आहेत. या गोष्टींमुळे तुमचं मन व्यथित होतं, हे तुमच्या मनात कायमचं राहतं.
पण याचा अर्थ असा नाही की, या संघटनेतील गुन्हेगारांना आम्ही 'दहशतवादी' म्हणायला हवं. असं करणं म्हणजे आम्ही आमच्या कामाप्रती तटस्थ न राहता पक्षपात करणं, आम्ही आमच्या कर्तव्यात अपयशी ठरलोय असा त्याचा अर्थ होतो.

फोटो स्रोत, REUTERS
पण बीबीसीच्या बाबतीत नेहमी असंच घडतं. आम्ही दुसऱ्या महायुद्धात नाझींना वाईट म्हणू शकलो असतो, पण बीबीसीच्या ब्रॉडकास्टर्सने आम्हाला तसं न करण्याबाबत स्पष्ट सांगितलं होतं. मात्र आम्ही त्यांचा 'शत्रू' म्हणून उच्चार केला.
"सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीबीसीच्या माहितीपटात नमूद केलंय की, ही आगपाखड करण्याची, तावातावाने बोलण्याची जागा नाहीये. इथे तुमचा स्वर शांत आणि संयमी असावा."
जेव्हा आयआरएने (आयरिश रिपब्लिकन आर्मी) ब्रिटनवर बॉम्बफेक करून निरपराध नागरिकांचा बळी घेतला, तेव्हा हे तत्त्व पाळणं कठीण होतं. पण आम्ही धीर धरला.
बीबीसी आणि माझ्यासारख्या वैयक्तिक पत्रकारांवर मार्गारेट थॅचर यांच्या सरकारकडून तीव्र दबाव होता. विशेषतः ब्रायटन बॉम्बस्फोटानंतर दबाव वाढला होता. निष्पाप लोक मारले गेले होते आणि मार्गारेट थॅचर बॉम्बस्फोटातून वाचल्या.

फोटो स्रोत, REUTERS
पण आम्ही आमची व्याख्या निश्चित केली आहे. आम्ही अजूनही तेच करत आहोत.
आम्ही पक्षपात करत नाही. आम्ही 'वाईट' किंवा 'भित्रा' असे शब्द वापरत नाही. आम्ही दहशतवाद्यांबद्दल बोलत नाही. आणि केवळ आपणच नाही तर जगातील काही प्रतिष्ठित वृत्तसंस्थाही याच धोरणांचा अवलंब करताना दिसून येतात.
परंतु बीबीसीवर बऱ्याच जणांचं लक्ष असतं. याचं कारण म्हणजे राजकारण आणि प्रसारमाध्यमांमध्ये आमचे बरेच टीकाकार आहेत. कारण आम्ही स्वतःचा उच्च दर्जा राखला आहे. शक्य तितकं निःपक्षपाती असणं हा उच्च दर्जा राखण्याचा एक भाग आहे.
म्हणूनच ब्रिटनमधील आणि जगभरातील लोक आम्ही काय म्हणतो याकडे लक्ष देतात. ते आमच्या बातम्या वाचतात, पाहतात आणि ऐकतात.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








