जेव्हा थेट चंद्रावरच अणुस्फोट करण्याची योजना आखण्यात आली होती...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मार्क पिसिंग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जेव्हा 1950 च्या दशकात सोव्हित युनियन अंतराळात यश प्राप्त करण्याच्या शर्यतीत समोर होता. तेव्हा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक अनोखी योजना आखली होती. ही योजना चंद्रावर अणुस्फोट करून सोव्हिएत युनियन ला घाबरवण्याची होती.
अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर 1969 मध्ये पहिल्यांदा पाऊल टाकलं तो माणसाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा क्षण होता.
ज्या चंद्रावर आर्मस्ट्राँगने पाऊल ठेवलं त्यावर खड्डे असते आणि अणु हल्ल्याने तिथलं वातावरण विषारी झालं असतं तर काय झालं असतं?
जेव्हा मी पहिल्यांदा ‘A study of Lunar Research Flights, Part1’ वाचायला सुरुवात केली तेव्हा वरकरणी पाहता ते संशोधन अतिशय साधं आणि प्रशासकीय अंगाचं होतं. हे एक संशोधन होतं ज्याचं शीर्षक वाचल्यावर त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जाणार नाही आणि ते लिहिणाऱ्यांनाही हेच हवं होतं.
जेव्हा आपण त्याचं मुखपृष्ठ पाहिलं तेव्हा एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर येतं.
त्याच्या मध्यात एक अणू, एक अणूबॉम्ब, आणि एक मशरुम क्लाऊड (अणू स्फोट झाल्यानंतरचं काल्पनिक छायाचित्र) हे खरंतर कर्टलँड, एअरफोर्स बेस, न्यू मेक्सिको मधल्या एअर फोर्स वेपन्स सेंटरचं चिन्ह आहे. अणूशस्त्रांच्या चाचणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
त्याच्या खाली नाव आहे, एल.रीफेल किंवा लॅनर्ड रॅफेल जे अमेरिकेतले प्रसिद्ध अणू वैज्ञानिक आहे. त्यांनी भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांच्याबरोबर काम केलं आहं. त्यांनी जगातलं पहिलं न्युक्लिअर रिअक्टर तयार केलं होतं. एनरिको फर्मी अणूबॉम्बचे जनक मानले जातात.
प्रोजेक्ट ए 119 या नावाने तयार केलेल्या योजनेत हा प्रस्ताव अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता. त्यानुसार चंद्रावर हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याची योजना तयार करण्यात आली होती.
इथे एक गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की अणूबॉम्बपेक्षा हायड्रोजन बॉम्ब अधिक विनाशकारी समजला जायचा. 1945 साली हिरोशिमावर तो पाडला होता. त्या काळातल्या अणूरचनेनुसार तो सगळ्यात जास्त आधुनिक होता.
ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून या योजनेला लवकरात लवकर मूर्त स्वरूप देण्याच्या आदेशानंतर रॅफेल यांनी मे 1958 आणि जानेवारी 1959 मध्ये ही योजना पार पाडण्याबद्द्ल अनेक अहवाल सादर केले होते.

फोटो स्रोत, Getty Images
योगायोगाची गोष्ट अशी की, या विनाशकारी योजनेत जे वैज्ञानिक सहभागी ते पुढे जाऊन प्रसिद्ध होणारे कार्ल सेगन होते.
सेगन यांनी एका विद्यापीठात त्यांच्या एका अर्जात या योजनेचा उल्लेख केला होता. तेव्हाच या योजनेबद्दल माहिती मिळाली होती.
एका बाजूला या योजनेमुळे चंद्राविषयीच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उकल होणार होती तर एका बाजूला A 119 चा मुख्य उद्देश हा शक्तीप्रदर्शनाचा होता.
हा बॉम्ब चंद्राच्या उजेड आणि अंधाऱ्या बाजूला असणाऱ्या सीमेवर म्हणजे टर्मिनेटर लाईनवर फुटणार होता. या योजनेचा एक उद्देश होता की प्रकाशाचा असा एक गोळा तयार करायचा जो कोणत्याही उपकरणाविशाय रशियात दृष्टीस पडेल. तिथे मशरुम क्लाऊड तयार होण्याची शक्यता फार कमी होती.
त्यावेळी रशियापेक्षा आपण पुढे नाही या भावनेतून निर्माण झालेली असुरक्षितता यामुळे ही योजना आखण्यात आली होती असं लक्षात येतं.
1950 साली अमेरिका शीतयुद्ध जिंकेल अशी परिस्थिती नव्हती. आण्विक शस्त्रं तयार करण्यात अमेरिका रशियापेक्षा पुढे आहे असा एक सार्वत्रिक समज होता. विशेषत: आण्विक शस्त्रांचा विकास, अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्रांची संख्या अमेरिकेपेक्षा रशियात जास्त होती.
1952 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बचा प्रयोग केला होता. तीन वर्षानंतर आपल्या हायड्रोजन बॉम्बने रशियाने अमेरिकेला हैराण करून सोडलं. 1957 मध्ये सोव्हिएत युनियन ने अंतराळात झेप घेत स्पुतनिक 1 ची निर्मिती केली होती. पृथ्वीच्या चारी बाजूला फिरणारा तो पहिला उपग्रह होता.
स्पुतनिक तयार होण्याच्या आधी सोव्हिएतने Intercontinental ballistic missile लाँच केलं होतं. अमेरिकेनेही कृत्रिम चंद्र तयार करण्याचा मक्ता घेतला होता मात्र तो अयशस्वी ठरला.
त्यावेळी हा स्फोट संपूर्ण जगात दाखवला गेला. हा अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्का आहे अशी टिप्पणी ब्रिटन प्रसारमाध्यमांनी केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, अमेरिका शाळकरी मुलांना प्रसिद्ध 'डक अँड कव्हर' माहितीपट दाखवत होती, ज्यामध्ये बर्ट नावाचा एक अॅनिमेटेड कासव मुलांना अणुहल्ल्याच्या वेळी काय करावे याची माहिती देण्यास मदत करत असतो.
त्याच वर्षी एका वरिष्ठ गुप्तचर सूत्राच्या हवाल्याने अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये एक बातमी आली होती की क्रांतीच्या वर्धापनदिनानिमित्त 7 नोव्हेंबर रोजी सोव्हिएत युनियन चंद्रावर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची योजना आखत आहे.
'द डेली टाइम्स' न्यू फिलाडेल्फिया, ओहायो या वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. यानंतर अशीही बातमी आली की सोव्हिएत युनियन अमेरिकेच्या जवळच्या देशावर अण्वस्त्रांनी सुसज्ज रॉकेटने हल्ला करण्याची योजना आखत आहे.
शीतयुद्धाशी संबंधित बहुतेक अफवांप्रमाणे, ती कशी पसरली आणि ती कोठून आली हे कोणालाही माहिती नाही.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भीतीने सोव्हिएत युनियनलाही या संदर्भात योजना तयार करण्यास भाग पाडले.
त्या प्रकल्पाचे सांकेतिक नाव 'ई फोर' ठेवण्यात आले होते आणि हा प्रकल्प अमेरिकेच्या योजनेची कार्बन कॉपी होती.
नंतर हा प्रकल्प देखील सोव्हिएत युनियनने त्याच कारणास्तव रद्द केला की तो अयशस्वी झाल्यास, सोव्हिएतच्या भूमीवरही बॉम्ब पडू शकतो.
त्यांनी असा निष्कर्ष काढला की यामुळे 'अत्यंत अनावश्यक आंतरराष्ट्रीय अपघात' होण्याचा धोका आहे.
चंद्रावर उतरणे हा यापेक्षा मोठा पराक्रम आहे हे कदाचित त्यांना कळलं असावं. प्रोजेक्ट A 119 देखील यशस्वी होऊ शकला असता.
2000 मध्ये राफेलय याबद्दल बोलले. हा प्रकल्प 'तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य' होता आणि स्फोट पृथ्वीवर स्पष्टपणे दिसला असता या बाबीला त्यांनी दुजोरा दिला.
शास्त्रज्ञांना शंका असूनही, अमेरिकन एअर फोर्सला या वस्तुस्थितीची फारशी चिंता नव्हती की यामुळे चंद्राचे स्वच्छ वातावरण खराब होईल.
विज्ञान आणि आण्विक तंत्रज्ञानाच्या इतिहासावर काम करणारे अॅलेक्स वेलरस्टीन म्हणाले होते की प्रोजेक्ट A119 ही स्पुतनिकच्या प्रक्षेपणाच्या विरोधात पुढे आलेल्या अनेक कल्पनांपैकी एक होती.
तो म्हणाले, "स्पुतनिकला शूट करण्याचीही त्याची योजना होती, जी खरोखरच वाईट होती. लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काल्पनिक गोष्टी म्हणून ते त्यांच्याकडे पाहत होते."

फोटो स्रोत, Getty Images
"शेवटी त्यांनी स्वतःचा उपग्रह बनवण्याचा विचार केला आणि त्याला थोडा वेळ लागला, परंतु 1950 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत त्याने हा प्रकल्प गंभीरपणे सुरू ठेवला."
"यामुळे त्यावेळेच्या अमेरिकन कल्पनांबद्दल जाणून घेण्यास मदत होते. काहीतरी परिणामकार करण्याचा हा खरोखर एक प्रयत्न होता. मला वाटते की हे प्रकरण केवळ प्रभावशालीच नाही तर भीतीदायकही होतं."
"तो म्हणतो की त्या भूमिकेत जो कोणी आहे तो सहसा स्वतःच्या इच्छेने करतो. त्याला ते करण्यास काहीच अडचण नाही. जर त्याला भीती वाटत असती तर ते इतर लाखो गोष्टी करू शकले असते. शीतयुद्धाच्या काळात अनेक शास्त्रज्ञांनी असे केले आणि नंतर ते म्हणाले की भौतिकशास्त्र खूप राजकीय झाले आहे."
मात्र या वृत्तीवर व्हिएतनाम युद्धापर्यंत अधिक आत्मपरीक्षण केलं गेलं असेल.
अंतराळ या विषयातल्या आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल बोलताना ब्लेडिन बोवेन म्हणतात, “प्रोजेक्ट A 119 मुळे मला कार्टून सीरिज ‘द सिम्पसन्स’ च्या त्या सीरिजची आठवण येते जिथे लीसा नेल्सन खोलीच्या भिंतीवर न्यूक द व्हेल्सचं पोस्टर पाहते आणि त्यावर विचारते की तुम्हाला कोणत्या गोष्टीवर अणुबॉम्ब टाकायचा आहे?
बोवेन म्हणतात, “ हे खूप गंभीर संशोधन होतं. मात्र त्यांना योग्य तितका पैसा मिळाला नाही, तसंच फारसं लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे त्यांनी अंतराळविज्ञानातून लक्ष काढून घेतलं. ही गोष्ट 1950च्या शेवटी 1960 च्या दशकाच्या सुरुवातीची ही गोष्ट आहे.तो एक वेडेपणीचा काळ होता. त्यावेळी अंतराळविज्ञानाचं काय भविष्य असेल हे माहिती नव्हतं.”
ते पुढे म्हणतात, “चंद्रावर पोहोचण्याचा असा वेडेपणा कोणाच्या मनात आला तर ते जागतिक कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन मानलं जाईल आणि जगातील बहुतांश देश याच्याशी सहमत आहेत.”
आंतरराष्ट्रीय सहमती असूनसुद्धा अशा प्रकारच्या योजना समोर येऊ शकतात का?
बोवेन म्हणतात, “मी अशा काही गोष्टी ऐकल्या आहेत. उदा. पेंटागॉन इत्यादी लोकांकडून, त्यात अमेरिकन स्पेस फोर्सच्या मिशनचा आढावा घेण्याची चर्चाही झाली होती. ज्यामुळे चंद्राच्या वातावरणाचा शोध घेतला जाईल.”
जर अशा प्रकारच्या कल्पनांना अमेरिकेत महत्त्व दिलं नाही तर चीनमध्येही ते मिळणार नाही असं अजिबात नाही.
बोवेन म्हणतात, “चंद्र एक आकर्षक वस्तू आहे असा विचार करणारे लोक चीनमध्ये आहे यावर मला पूर्ण विश्वास आहे. हे लोक सैन्यात काम करतात.”
प्रोजेक्ट A 119 ची सविस्तर माहिती आजही एक रहस्य आहे. तसंच त्याच्या सगळ्या नोंदी जाळल्या आहेत अशी शंका आहे.
यावरून एकच बोध घ्यायला हवा की ज्या संशोधनाचं नाव आकर्षक नाही अशा संशोधनांकडे दुर्लक्ष करू नये. ही संशोधनं वाचायला हवीत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








