अमेरिकेत लाखो नागरिकांना हिमवादळाचा फटका, सहा जणांचा मृत्यू, 7 राज्यांत आणीबाणीची घोषणा

हिमवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे

फोटो स्रोत, The Capital Journal/Reuters

फोटो कॅप्शन, हिमवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे

अमेरिकेत हिमवादळाच्या तडाख्यात आतापर्यंत किमान 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. प्रचंड हिमवृष्टी आणि गोठवणाऱ्या थंडीमुळे तापमान प्रचंड खाली घसरले असून लाखो नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे.

ह्यूस्टन, टेक्सास येथील बस थांब्याजवळ 6 जानेवारीला (सोमवारी) सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. 'थंड हवामानामुळे' त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं शहराच्या मेट्रो सिस्टमच्या प्रवक्त्यानं बीबीसीला सांगितलं.

"बस थांब्याच्या अगदी समोर या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे," असं काउंटी मेट्रोपॉलिटन ट्रान्झिट अथॉरिटीचे मीडिया रिलेशन्सचे संचालक लेस्टर ग्रेस्ट्स यांनी सांगितलं.

तर, बर्फाच्छादित उत्तर कॅरोलिनामध्ये कार अपघातात महिलेचा मृत्यू, झाल्याचं कळतंय. विंस्टन-सलेम, उत्तर कॅरोलिना येथील पोलिसांनी सांगितलं की, 46 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला असून तिची कार हिमवादळामुळे महामार्गावरील ओव्हरपासजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर धडकली. तर, कारमधील अन्य एक प्रवासी गंभीर असून त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे.

हिमवादळामुळे झालेल्या मृत्यूंची ही सहावी घटना आहे. या वादळामुळे कॅन्सास आणि व्हर्जिनियामध्ये, टेक्सास, उत्तर कॅरोलिना आणि मिसूरीमध्येही मृत्यू झाल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.

कॅन्सासच्या काही भागांमध्ये 18 इंच (46 सेमी) पेक्षा जास्त हिमवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. साचलेल्या बर्फाच्या खचामुळे रस्ते बंद असून वाहतूक प्रभावित झाली आहे.

Poweroutages.us नुसार, किमान सहा राज्यांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, सुमारे यामुळे लाखो नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतोय.

अमेरिकेतील अनेक शाळा आणि सरकारी कार्यालये वादळी हवामानामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत.

हवामान तज्ज्ञांच्या मते, काही भागांत तीव्र थंडी टिकून राहील, पण आठवड्याच्या शेवटी ती हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.

हिमवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे

फोटो स्रोत, Devin Hartnett/ Facebook

अमेरिकेत नागरिकांना हिमवादळाचा सामना करावा लागत आहे. जवळपास 30 राज्यांमधील 6 कोटीहून अधिक नागरिकांना या हिमवादळाच्या कचाट्यात आहेत. या वादळामुळं गेल्या दशकातला सर्वांत मोठा हिमवर्षाव होण्याची शक्यता असून त्यामुळं तापमान वेगानं खाली सरकू शकतं.

अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवा (एनडब्ल्यूएस) च्या माहितीनुसार, अमेरिकेच्या मध्यवर्ती भागातून सुरू झालेलं हे हिमवादळ पूर्व दिशेने पुढं सरकलं असल्याचं सांगितलं. भारतातील सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास म्हणजे अमेरिकेतील वेळेनुसार रविवारी सायंकाळच्या दरम्यान वादळ अमेरिकेत पूर्व किनारपट्टीपर्यंत पोहोचलं.

एका पोलर वोर्टेक्स (ध्रुवीय भोवरा) मुळं हे हिमवादळ तयार झालं आहे. त्यामुळं नागरिकांना टोकाच्या तीव्र हवामानाचा सामना करावा लागत आहे.

शावनी भागामध्ये बर्फात खेळणारे अॅलिसन लुसी यांचे कुटुंब.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शावनी भागामध्ये बर्फात खेळणारे अॅलिसन लुसी यांचे कुटुंब.

या परिस्थितीमुळं हजारो फ्लाईट्स उशिराने उड्डाण करत आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच अनेक रस्ते पूर्णपणे बंद असून शाळाही वादळामुळं बंद ठेवण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

बर्फाच्या वादळामुळं कन्सास आणि मिसूरीमध्ये सगळीकडं बर्फाची पांढरी चादर पसरली जाण्याची शक्यता आहे. याठिकाणीही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसंच केंटकी, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, आर्कान्सा आणि न्यू जर्सीच्या काही भागांमध्येही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रीय हवाामन सेवेच्या वतीनं नागरिकांना दैनंदिन जीवनात अडथळा होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसंच वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कन्सास आणि मिसूरी केंद्रस्थानी

कन्सास आणि मिसूरी ही राज्यं या वादळाच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. कारण या भागात सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे. या भागात रविवारी दुपारपर्यंतच काही ठिकाणी 10 इंच म्हणजेच 25 सेंमीपेक्षा जास्त बर्फ पडला होता.

तीव्र हवामानामुळं कन्सासच्या ईशान्येकडील सर्व महामार्ग बंद करावे लागले आहेत. तर मिसुरीच्या सीमेवर असलेल्या कन्सास सिटी विमानतळावरून हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली.

कन्सास सिटीचे अधिकारी ब्रायन प्लॅट यांनी वादळाचं वर्णन शहराने अनुभवलेलं 'ऐतिहासिक' वादळ असं केलं आहे.

कन्सास आणि मिसुरी शहराच्या सीमेवर सर्वाधिक तीव्र हमामान असण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, National Weather Service

फोटो कॅप्शन, कन्सास आणि मिसुरी शहराच्या सीमेवर सर्वाधिक तीव्र हमामान असण्याची शक्यता आहे.

"आम्ही गेल्या 32 वर्षांत 10 इंचांपेक्षा जास्त बर्फवृष्टी पाहिलेली नाही," असं त्यांनी एनबीसी न्यूजला सांगितलं.

अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टी भागालाही वादळाचा फटका बसला. वॉशिंग्टन डीसीमधून माहिती देताना बीबीसी उत्तर अमेरिकेचे प्रतिनिधी रोवन ब्रिज म्हणाले की, "अद्याप बर्फवृष्टी सुरू झालेली नसली तरी रात्रभरात परिस्थिती अत्यंत बिकट होणार आहे.

"अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील इतर प्रमुख शहरं, बाल्टिमोर सारखी ठिकाणंही पुढील 24 ते 48 तास किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत मोठ्या प्रमाणावर यानं प्रभावित होण्याची शक्यता आहे," असंही ते म्हणाले.

काही शाळा बंद राहणार

अमेरिकेच्या बर्फवृष्टी होत असलेल्या अनेक भागांमध्ये शाळा बंद राहणार असून अधिकारी अधिक तीव्र परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी करत आहे.

केंटकरी, इंडियाना, मेरीलँड, वॉशिंग्टन डीसी आणि वर्जिनिया याठिकाणच्या शाळांनी आधीच सुटी जाहीर केली आहे. तर इतरही अनेक भागांमध्ये परिस्थिती पाहून सुटीचे निर्णय घेतले जात आहेत.

विमान वाहतुकीवर गंभीर परिणाम

या हिमवादळाचा हवाई वाहतुकीवर सर्वाधिक परिणांम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विमानतळांवरील परिस्थितीही अत्यंत गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे.

विमानतळावर उभे असलेले विमान.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विमानतळावर उभे असलेले विमान.

अमेरिकेतील देशांतर्गत आणि इतर विमान सेवेचा विचार करता रविवारी सायंकाळपर्यंतच जवळपास 5000 उड्डाणं उशिराने होत असल्याची माहिती फ्लाईटअवेअर वेबसाईटनं दिली आहे. तर 2000 हून अधिक विमान उड्डाणं रद्द झाली आहेत.

यामध्ये पुढच्या आणखी तीन तासांत 1700 ने वाढ होण्याची शक्यता आहे. तर आणखी जवळपास 1500 हून अधिक उड्डाणं रद्द होण्याची शक्यता आहे.

पोलार वोर्टेक्स म्हणजे काय?

हवामान अभ्यासकांच्या मते ही परिस्थिती पोलार वोर्टेक्स म्हणजेच ध्रुवीय भोवऱ्यामुळं निर्माण झाली आहे. धुर्वीय भोवरा म्हणजे आर्क्टिकच्या जवळपास निर्माण झालेला थंड हवेचा भोवरा.

सामान्यपणे ध्रुवीय भोवरा हा उत्तर ध्रुवाच्या आसपासच फिरतो. पण त्यात बदल होण्याची आणि त्याचा आकार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं दक्षिण भागात आधीच्या तुलनेत तापमान खाली घसरण्याची शक्यता असते.

लुईसविलेमध्येही विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लुईसविलेमध्येही विक्रमी बर्फवृष्टी झाली आहे.

शनिवारी हिमवादळ अमेरिकेत धडकण्याच्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेवर या ध्रुवीय भोवऱ्याचं संकट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत होतं.

आगामी काळात हे वादळ पूर्व दिशेला सरकून त्यामुळं वर्फवृष्टी आणि तापमान शून्याच्या खाली जाण्याची शक्यता आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.