अर्णब गोस्वामी, टाइम्स नाऊ विरोधात बॉलिवुड एकवटलं; सलमान, शाहरुख आणि 36 निर्मात्यांची हायकोर्टात धाव

सलमान आणि अर्णब गोस्वामी

फोटो स्रोत, Getty Images

रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊ, राहुल शिवशंकर, नाविका कुमार तसेच सोशल मीडियावर बेजबाबदारपणे बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात बॉलीवूडमधील 4 निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

बॉलीवूड संबंधित लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करुन मीडिया ट्रायल्स थांबवाव्यात अशी विनंती त्यात करण्यात आली आहे. ज्या लोकांविरोधात तक्रार करण्यात आली आहे त्यांना केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियम, 1994 हा कायदा लागू होतो. त्यांनी जो बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे तो काढून टाकावा असं म्हटलं आहे.

बॉलीवूड गलिच्छ आहे, तेथे घोटाळे होतात, ते नशा करतात, बॉलीवूडमधली घाण साफ करण्याची गरज आहे. अरेबियातली सगळी अत्तरं ओतली तरी बॉलीवूडमधली घाण आणि दुर्गंधी साफ होणार नाही, भारतातली ही सर्वांत घाणेरडी इंडस्ट्री आहे? कोकेन आणि एलएसडीमध्ये बॉलीवूड बुडालं आहे... अशा प्रकारची वक्तव्यं या माध्यमांतून झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या तक्रारदार लोकांमध्ये बहुतांश प्रसिद्ध लोकांची नावं दिसून येतात

  • द प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया
  • द सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन
  • द फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स कौन्सील
  • स्क्रीनरायटर्स असोसिएशन
  • आमिर खान प्रोडक्शन्स
  • अॅडलॅब्स फिल्म्स
  • अजय देवगण फिल्म्स
  • आंदोलन फिल्म्स
  • अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क
  • अरबाझ खान प्रोडक्शन्स
  • आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स
  • बीएसके नेटवर्क अँड एंटरटेनमेंट
  • केप ऑफ गुड फिल्म्स
  • क्लीन स्टेट फिल्म्स
  • धर्मा प्रोडक्शन्स
  • एमी एंटरटेनमेंट अँड मोशन पिक्चर्स
  • एक्सेल एंटरटेनमेंट
  • फिल्मकार्ट प्रॉडक्शन्स
  • होप प्रॉडक्शन
  • कबिर खान फिल्म्स
  • Luv फिल्म्स
  • मॅगफिन पिक्चर्स
  • नडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट
  • वन इंडिया स्टोरीज
  • आर. एस. एंटरटेनमेंट
  • राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स
  • रेड चिलीज एंटरटेनमेंट
  • रिलायन्स बिग एंटरटेनमेंट
  • रिल लाइफ प्रोडक्शन्स
  • रोहित शेट्टी पिक्चर्स
  • रॉय कपूर प्रॉडक्शन्स
  • सलमान खान व्हेंचर्स
  • सोहेल खान प्रॉडक्शन्स
  • सिख्या एंटरटेनमेंट
  • टायगर बेबी डिजिटल
  • विनोद चोप्रा फिल्म्स
  • विशाल भारद्वाज फिल्म
  • यशराज फिल्म्स

डीएसके लिगल कंपनीने फिर्यादींतर्फे तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)