महाड इमारत दुर्घटना: तेरा जणांचा मृत्यू, नऊ जण जखमी

रायगडच्या महाड तालुक्यात इमारत दुर्घटनेची घटना घडली. साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळ असलेली तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळली.
या दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत.

फोटो स्रोत, Twitter
पुण्याहून काल रात्रीच NDRF ची तीन पथके महाडकडे तातडीने रवाना करण्यात आली. ही पथकं लवकरात लवकर पोहोचावी म्हणून ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती प्रशासनानं दिली.
"पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत 40 कुटुंबं राहात होते. त्यातील 25 कुटुंबं बाहेर पडली, पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदतीसाठी स्थानिकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचे निदर्शनात आल्याने काही कुटुंबं बाहेर पडली होती," अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
इमारत कोसळल्याचा प्रचंड आवाज आल्याने सुरुवातीला परिसरातील लोक घाबरले. धूर पाहून अनेक लोक घटनास्थळाकडे पळाले. इमरतीच्या ढिगाऱ्याखालून लोकांच्या आक्रोशाचा आवाज येत होता असं प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितलं. त्यानंतर नागरिकांनीच बचावकार्याला सुरुवात केली तसेच अग्निशमन दलाला कळवले.
पावसामुळे दुर्घटनास्थळी मदतकार्यात अडथळा येत होता. मात्र, अशाही स्थितीत बचावकार्य वेगानं सुरू ठेवण्यासाठी यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न झाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
दुसरीकडे, जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाडजवळील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन केलं आहे. मेडिकल कॅम्पसाठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती करण्यात आलीय.
दरम्यान, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल
शिवसेना नेते आणि राज्याचे नागरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाडमधील दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांना घटनेची सविस्तर माहिती दिली. एकनाथ शिंदे यांना मदतकार्य आणि बचावकार्याचा आढावा घेतला.

फोटो स्रोत, Eknath Shinde
तसंच, ठाणे महापालिकेची आपत्कालीन दक्षता टीम (TDRF) देखील महाडकडे तातडीने रवाना करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना दिले.
प्रशासनानं काय माहिती दिली?
"महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत काजळपुरा भागात 05 मजली इमारत सोमवारी (24 ऑगस्ट) संध्याकाळी सात वाजता कोसळली. यामध्ये 45 ते 47 फ्लॅट होते. सुमारे 70 ते 80 रहिवाशी त्यामध्ये अडकल्याची शक्यता आहे. 15 लोकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून ते त्यांना उपचारासाठी पाठवलं आहे," अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

"पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत 40 कुटुंबं राहात होते. त्यातील 25 कुटुंबं बाहेर पडली, पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदतीसाठी स्थानिकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचे निदर्शनात आल्याने काही कुटुंबं बाहेर पडली होती," अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
इमारत कोसळल्याचा प्रचंड आवाज आल्याने सुरुवातीला परिसरातील लोक घाबरले. धूर पाहून अनेक लोक घटनास्थळाकडे पळाले. इमरतीच्या ढिगाऱ्याखालून लोकांच्या आक्रोशाचा आवाज येत होता असं प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितलं. त्यानंतर नागरिकांनीच बचावकार्याला सुरुवात केली तसेच अग्निशमन दलाला कळवले.
मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
महाडमधील इमारत कोसळ्याची घटना दुर्देवी आहे. मी NDRF च्या महासंचालकांशी बोललो असून आवश्यक ती सर्व मदत करण्याची सूचना केली आहे, असं ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत आमदार भरत गोगावले व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा केली.

फोटो स्रोत, UGC
याठिकाणी जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
महाड येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)