इराणने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर शेकडो गाढवं का मारली?

गाढवं, प्राणी, इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, TWITTER/ICHRI

फोटो कॅप्शन, गाढवांचे मृतदेह

इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेनजीक शेकडो गाढवांना मारलं आहे.

इराणमध्ये स्थानिक सूत्रांनी बीबीसी फारसीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीस्तान आणि बलुचिस्तान सीमेजवळच्या भागात गाढवांना मारण्यात आलं.

शनिवारी सोशल मीडियावर एक व्हीडिओ फिरु लागला त्यामध्ये अर्धाकच्चा रस्ता आणि शेकडो गाढवांचे मृतदेह असे दिसत आहेत.

तेलाची तस्करी रोखण्यासाठी इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी कालीगान परिसरात हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

ही घटना 14 फेब्रुवारीची असल्याची चर्चा आहे. कालीगान हा भाग सीस्तान आणि बलुचिस्तान राज्यातल्या सरावान प्रदेशातला जिल्हा आहे.

इंधनांची तस्करी रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही सुरक्षा यंत्रणांनी युद्धात वापरल्या जाणाऱ्या बाणांनी जनावरांना मारलं होतं.

सीस्तान आणि बलुचिस्तान यांची पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या बाजूने 1100 किलोमीटरची सीमा आहे. बेरोजगारीच्या कारणास्तव हा परिसर खनिज तेल तस्करीचं केंद्र झाला आहे.

शेकडो गाढवं आणि खेचरांचे मृतदेह या परिसरात पडून असल्याचं सूत्रांनी बीबीसी फारशीच्या प्रतिनिधीला सांगितलं.

इंधन सीमेपल्याड पोहोचवल्यानंतर गाढवं त्या भागात फिरतात. बहुतांशवेळा सुरक्षा यंत्रणांचे सैनिक जनावरांचा उपयोग करुन इंधनांची नेआण करणाऱ्या तस्करांशी त्यांचा मुकाबला होतो. इंधन वाहून नेणाऱ्या गाढवांना तसंच खेचरांना एकट्याने पाहिलं तरीही त्यांना मारलं जातं.

मृत गाढवांचे मृतदेह व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांमध्ये इराणमधील एक मानवाधिकारांसंदर्भात काम करणारी एक संस्थाही आहे.

देशातल्या अन्य भागांहून इथे गाढवांची तस्करी केली जाते. स्थानिक व्यापाऱ्यांकडे 10 ते 20 गाढवं किंवा खेचरं असतात. अनेकदा ही गाढवं किंवा खेचरं हीच त्यांची पुंजी असते.

आर्थिकदृष्ट्या काहीशा सधन लोकांकडे इंधनाची नेआण करण्यासाठी अधिक जनावरं असतात. स्थानिकांना ते प्राणी भाड्याने देतात. इराणमध्ये अशा प्राण्यांना मारण्याचा इतिहास आहे.

आतापर्यंत कोणत्याही संस्थेने या प्राण्यांना मारण्याची जबाबदारी घेतलेली नाही.

कारवाईचा विरोध

लंडनस्थित प्राण्यांच्या सुरक्षेसंदर्भात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने एका अहवालात म्हटलं आहे की इराणमध्ये प्राण्यांच्या सुरक्षेसाठी मूलभूत ढाचाही अस्तित्वात नाही.

प्राण्यांचं आरोग्य आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ही संस्था काम करते.

2015 मध्ये इस्लामी काऊंसिलच्या काही सदस्यांनी इराण आणि इराकच्या सीमेजवळच्या भागात प्राण्यांना मारण्याच्या घटना थांबवण्याची मागणी केली होती.

तत्कालीन संसदेचे सोशल कमिशनचे सदस्य शकूरपूर हुसैन शक्लान यांनी पोलीस यंत्रणांचं वागणं बेकायदेशीर असल्याचं म्हणणं होतं.

अधिकाऱ्यांनी या प्राण्यांना मारु नये असं आवाहन त्यांनी केलं होतं. या प्राण्यांच्या मालकांना कायद्याअंतर्गत अटक करायला हवी होती असंही ते म्हणाले होते.

एका प्रकरणात कुर्दिस्तान राज्याच्या सीमासुरक्षा दलाच्या कमांडरने अशी मागणी मान्य करायला नकार दिला होता.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)