लंडनमध्ये चोरी झालेली गाडी पाकिस्तानात कशी पोहोचली?

पाकिस्तान, कचेरी, युके

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, हीच ती गाडी
    • Author, मोहम्मद सुहैब
    • Role, बीबीसी उर्दू डॉट कॉम

कराची हे पाकिस्तानातल्या सगळ्यात मोठ्या शहरांपैकी एक आहे. कराचीत तुम्हाला अनेक आकर्षक गाडया रस्त्यावर धावताना दिसतील. पण सध्या सोशल मीडियावर कराचीतली एक गाडी चर्चेत आहे.

विदेशी गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर 30 ऑगस्टला कस्टम अधिकारी डीएचए भागात एका गाडीचा शोध घेत होते. कस्टममध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार ही गाडी लंडनहून चोरी करून पाकिस्तानात आणण्यात आली.

ही सर्वसाधारण गाडी नाही. बेंटले मल्सीन व्ही अट ऑटोमॅटिक पद्धतीची गाडी आहे. कस्टम्सने दिलेल्या माहितीनुसार गाडीची किंमत 30 कोटींहून जास्त असल्याचा अंदाज आहे.

या गाडीकडे गुप्तचर यंत्रणांचं बारीक लक्ष होतं. 30 ऑगस्टला ही गाडी जिथे उभी होती तिथे छापा मारण्यात आला. एका विशिष्ट रंगाच्या कपड्यांनी ती गाडी झाकण्यात आली होती. कापड हटवण्यात आल्यानंतर या गाडीला पाकिस्तानमधली नंबरप्लेटही लावण्यात आल्याचं स्पष्ट झालं.

एक्साइज कर्मचाऱ्यांच्या संगनमताने नोंदणी

प्राथमिक माहितीनुसार, गाडीच्या चेसिसनंबरवरून गाडीची ओळख पटली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या क्रमांकाशी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ही गाडी जप्त करण्यात आली.

कस्टम्सने गाडी चोरल्याप्रकरणी दोन लोकांना अटक केली आहे. कराचीस्थित गाडीच्या मालकाने दावा केला की, नोव्हेंबर 2022 पर्यंत गाडीच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बोलीवर ही गाडी विकल्याचं कराचीस्थित गाडीमालकानं सांगितलं.

गाडीची चावी नसल्याने कस्टम्सनं कॅरिअरच्या माध्यमातून ही गाडी उचलली.

पाकिस्तान, कचेरी, युके

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, लोक या गाडीला धक्का देत आहेत.

कायदेशीर प्रक्रिया झालेली नसतानाही या गाडीची नोंदणी सिंध प्रांत होणं हे आश्चर्यजनक आहे. विदेशातून येणाऱ्या गाडीच्या नोंदणीसाठी परराष्ट्र मंत्रालय, कस्ट्म्स यांच्या परवानगीसह सगळे कर आणि इतर बाबी पूर्ण करणं अनिवार्य असतं.

मोटारनोंदणी, एक्साईज, करखातं यांचं संगनमत असल्याशिवाय ही गाडी पाकिस्तानात येऊ शकत नाही असं तपासातून आढळलं आहे.

या गाडीचा एक छोटा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर उलटसुलट प्रतिक्रियाही येत आहेत. ही गाडी युकेहून पाकिस्तानात आलीच कशी यावरही बोललं जात आहे. या गाडीवर पाकिस्तानची नंबरप्लेट कशी लागली याने लोक चक्रावून गेले आहेत.

गाडी पाकिस्तानात कशी पोहोचली?

सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर गाडी पाकिस्तानात कशी पोहोचली ते स्पष्ट होऊ शकेल पण आम्ही लंडनहून चोरी केल्या जाणाऱ्या गाड्या पाकिस्तानात कशा पोहोचतात ते समजून घेतलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पाक व्हील्सचे सहसंस्थापक सुनील मुंज यांनी बीबीसीशी बोलताना काही रंजक गोष्टी सांगितल्या. "गाडी अन्य देशातून पाकिस्तानमध्ये आणणारी टोळी एका ठराविक पद्धतीने काम करते. ज्या देशातून गाडी पळवली जाते तिथे चोरीचा रिपोर्ट (एफआयआर) दाखल केला जात नाही. कारण ज्या देशातून गाडी पळवली जाणार आहे आणि ज्या देशात आणली जाणार आहे तिथे गाडीच्या स्थितीविषयी शहानिशा करण्यात येते. गाडीची कागदपत्रं आहेत का, गाडी चोरलेली तर नाही या गोष्टी पाहिल्या जातात", असं त्यांनी सांगितलं.

जर ही गाडी चोरी झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये देण्यात आली असती तर गाडी बंदरातच जप्त करण्यात आली असती. कारण बंदरात कार्यरत अधिकाऱ्यांच्या सिस्टममध्ये या गाडीच्या चोरीची नोंद दिसली असती.

सुनील यांच्या मते, ही गाडी लंडनहून पाकिस्तानला ट्रान्सफर करण्यात आली तेव्हा ती चोरलेली आहे याची कल्पना कुणालाही नव्हती. जेव्हा पाकिस्तानमध्ये गाडीच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा लंडनमध्ये गाडी चोरल्याची तक्रार दाखल करण्यात आली. जेणेकरून विम्याचे पैसे मिळतील.

ही टोळी गाडी मिळवतात आणि दुसऱ्या देशात नेतात. बंदरात गाडीची ने-आण सुलभ पद्धतीने झाली की मूळ देशात गाडी चोरी झाल्याची तक्रार देण्यात येते. मग मालक शोधाशोध करू लागतो.

सुनील मुंज यांच्या मते, अशा पद्धतीने गाडी पाकिस्तानात आल्याचं हे पहिलं प्रकरण नाही. पाकिस्तानमध्ये अशा अनेक गाड्यांची नोंदणी झाली आहे. गाडी नॉन कस्टम्स प्रकारातली नव्हती तर दूतावासाच्या कागदपत्रांवर गाडीच्या ने-आणीला मंजुरी मिळाली होती.

दूतावासातील कर्मचाऱ्यांना ड्युटी फ्री म्हणजे करमुक्त गाडी आणण्याची परवानगी असते. जितकी वर्षं त्या देशात ते राहतील त्यांच्यासाठी करमुक्त गाडी आणण्याची सुविधा मिळते.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे अतिशय धोकादायक आहे कारण अशा गाड्यांमागे नेमकं कोण आहे, अपराधी कोण आहेत हे हुडकणं कठीण होऊन बसतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

गाडी पाकिस्तानमध्ये नेण्यात आली तेव्हा तिची किंमत 4 कोटी 14 लाख रुपये सांगण्यात आली. आताच्या विनिमय दरानुसार गाडीची किंमत 5 कोटी 85 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. गाडीवर लागू झालेला कर पकडला तर गाडीची किंमत 30 कोटी 74 लाख इतकी होत आहे.

सोशल मीडियावर चर्चा

अशा पद्धतीने गाडी आणल्याप्रकरणी लोक चिंता व्यक्त करत आहेत मात्र त्याचवेळी अनेक गंमतीशीर मीम्स, विनोदही तयार होत आहेत.

शम्ख खान नावाच्या युझरने लिहिलं, त्यांनी गाडी ब्रिटनहून पाकिस्तानात कशी आली याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. अम्लिका नावाच्या युझरने लिहिलं, गाडी लंडनहून पाकिस्तानला आलीच कशी?

पाकिस्तान, कचेरी, युके

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, सोशल मीडिया

पहिला पाकिस्तानचा माणूस जो लंडनहून चोरी करून पाकिस्तानात वस्तू घेऊन आला आहे. त्याला बक्षीस द्यायला हवं. त्याचा अपमान करू नक, असंही एकानं लिहिलं.

व्हीडिओत लोक या गाडीला धक्का देत असल्याचं दिसत आहे. युझर्सनी अशी विचारणा केली की ते असं का वागत आहेत?

एका युझरने इतिहासाचा दाखला देऊन म्हटलं, लंडनवाले आशियाई उपखंडाला लुटून गेले, याने एक गाडी तर आणली आहे.

साकीबने लिहिलं, "एक माणूस लंडनहून निघतो आणि बेंटले गाडी खिशात ठेऊन सीमा पार करून घेऊन येतो. या गाडीची नोंदणीही होते."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)