महागाईच्या काळात या 7 मार्गांनी तुम्ही खाण्यापिण्यावरचा खर्च कमी करू शकता

अन्न

फोटो स्रोत, Getty Images

ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील रिटेल क्षेत्रातील महागाईचा दर एप्रिल महिन्यात सुमारे 7.79 टक्के होता. ही गेल्या आठ वर्षांतली सर्वोच्च वाढ आहे.

गेल्या काही दिवसांत भारतातील अन्नधान्याच्या किमती खूपच वाढल्या आहेत. पिठाच्या वाढत्या किमतींनी वृत्तपत्रांचे मथळे व्यापलेले दिसतात.

त्यामुळे स्वस्तात चांगलं अन्न घेणं हे सर्वसामान्य जनतेसाठी अवघड होत चाललं आहे असं बीबीसी मुंडोचे प्रतिनिधी फेलीप लांबियास म्हणतात. त्यामुळे महागाईच्या युगात चांगलं आणि स्वस्तात अन्न घेण्याचे 7 मार्ग सांगणार आहोत.

1. घरीच स्वयंपाक करा

हा सगळ्यात सोपा, आणि महत्त्वाचा उपाय. बाहेर खाणं जिभेला सुखावणारं असलं, त्यात श्रम कमी असते, झटपट मिळलं असतं तरी ते खिशाला परवडणारं नाही.

याशिवाय, जेव्हा आपण तयार अन्नपदार्थ खरेदी करतो, तेव्हा आपल्याला त्यातील घटकपदार्थांच्या दर्जाविषयी काहीच माहिती नसते.

बहुतेक भारतीय घरांमध्ये अन्न हे पामतेल, सोयाबिन तेल किंवा सूर्यफुलाच्या तेलात शिजवले जाते.

सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या, आधीपासून तयार केलेल्या अन्नपदार्थांबाबतही हेच आहे.

या पदार्थांना अतिप्रक्रिया केलेले किंवा अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थ म्हटले जाते.

या अन्नपदार्थांतील अनारोग्यकारक मेद, मीठ व साखर आरोग्यासाठी चांगले नसतात.

केवळ चव वाढवण्यासाठी या घटक जिन्नसांचा उपयोग केला जातो.

घरी स्वयंपाक केल्यामुळे आपण नेमकं काय खात आहोत हे आपल्याला माहीत असतं आणि आपल्याला त्यासाठी खर्चही खूप कमी येतो.

2. आवश्यक तेवढाच आहार घ्या

बरेच जण त्यांच्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त आहार घेतात.

जेवणाची थाळी

फोटो स्रोत, Getty Images

व्हेनेझुएलन पोषणतज्ज्ञ अरियाना अराउजो यांनी बीबीसी मुंडोला सांगितले, "अनेक देशांमध्ये वाढल्या जाणाऱ्या अन्नाचे प्रमाण खूप अधिक असते. यामुळे बाजारातून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आणि त्याचवेळी अधिक अन्नग्रहणामुळे वजनही वाढते."

दररोज प्रत्येक जेवणात 2000 ते 2500 कॅलरीज घेणं आदर्श आहे.

3. स्वयंपाकाच्या पद्धतींमध्ये बदल करा

तेल, कॉफी, काही फळे, भाज्या, बीफ, ब्रेड (कणकेचा अर्थात व्हीट ब्रेड) आणि अंडी या पदार्थांचे दर अधिक असतात. मात्र, काही सामान्य अन्नपदार्थ तुलनेने स्वस्त असतात.

अर्थात, तुम्ही या महागड्या पदार्थांना पर्याय शोधू शकता. हे पर्याय तेवढेच आरोग्यपूर्ण व किमतीला कमी असतील हे बघा. मात्र, अन्नपदार्थ खूप महाग किंवा खूप स्वस्त नकोत. कोणत्या अन्नपदार्थांऐवजी कोणते अन्नपदार्थ वापरले जाऊ शकतात हे समजणं महत्त्वाचं आहे.

अराउजे यांच्या मते, "समतोल जेवणात अर्धा भाग फळे-भाज्या, पाव भाग प्रथिने (प्रोटिन) व पाव भाग कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) असतात.

"प्रथिनांमध्ये बीफ, पोर्क, चिकन, फिश, दूध, अंडी, शेंगभाज्या, डाळी व शेंगदाण्यांचा समावेश होतो. तर कर्बोदकांमध्ये भात, ब्रेड, मका, पास्ता, केळी, बटाटे व कसावा (वेस्टइंडिजमधील एका वनस्पतीचे पीठ) यांचा समावेश होतो."

4. खरेदीचं नियोजन

बचतीचा मुख्य मुद्दा म्हणजे आपण बाजारात जातो, तेव्हा आपल्याकडे खरेदीचे नियोजन तयार असणे आवश्यक आहे.

यंदा भारताच्या आशा मोहरी व सोयाबिन या पिकांवर केंद्रित झालेल्या आहेत.

पास्ता

फोटो स्रोत, Getty Images

कुठे आणि काय खरेदी करायचे हे जाणून घेण्याची आपल्याला सर्वप्रथम गरज आहे.

फळे, भाज्या, चीज व मांस खरेदी करण्यासाठी आपण मॉलऐवजी बाजारात जायला हवे.

आपण काय स्वयंपाक करणार आहोत याच्या नियोजनाची नोंद करून ठेवणं खूपच उपयुक्त ठरतं.

बचतीसाठी गोष्टी मोठ्या प्रमाणात खरेदी करणंही खूपच फायद्याचं ठरतं.

5. हंगामी अन्नपदार्थ शोधा

भाज्या आणि फळे यांचा आहारात समावेश आलटून पालटून करता येतो पण कशाऐवजी काय खायचं हे समजणं महत्त्वाचं आहे.

"भाज्या-फळांमधून तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे व क्षार मिळतात. ते अन्य अन्नपदार्थांमधून मिळणे कठीण असते," असे बेल्बियन सांगतात.

तज्ज्ञांच्या मते, अन्नपदार्थ, हंगामी पदार्थांचा खर्च कमी करण्यासाठी त्यांची खरेदी देशाच्या पर्यावरणानुसार तसेच परिस्थितीनुसार करावी.

फळं

फोटो स्रोत, Getty Images

अराउजे यांच्या मते, "काही वेळा काही पदार्थ गोठवलेल्या स्वरूपात (फ्रोझन) उपलब्ध असतात आणि ते ताज्या पदार्थांहून स्वस्त असतात. त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे."

6. जतन करून ठेवण्याच्या (कंझर्वेशन) तंत्रांचा वापर

अन्नपदार्थ स्वस्त असताना मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते साठवून घेणे हा आणखी एक पर्याय आहे.

अन्नपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे. हा मार्ग मांस व भाज्या दोहोंबाबत वापरला जाऊ शकतो.

तुम्ही एका वेळी मोठ्या प्रमाणात अन्न शिजवून ठेवू शकता. खाऊन झाल्यानंतर उरलेले अन्न नंतर खाण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवू शकता.

अराउजे यांच्या मते, "असे केल्यास अन्नाच्या पोषकतत्त्वांपैकी 90 टक्के जतन होऊ शकतात." हा उपाय आपण आपल्या घरी नेहमीच करतो असेही त्यांनी सांगितले.

7. प्रथम नीट वाचा आणि दुसऱ्या क्रमांकाचा ब्रॅण्ड वापरा

मार्केटिंगच्या युगात आपण सहसा लोकप्रिय ब्रॅण्ड खरेदी करतो किंवा आपल्याला जो ब्रॅण्ड आधी चांगला वाटत होता, तो तेवढा लोकप्रिय नसल्यामुळे नाकारतो पण असे करणे गरजेचे नाही.

"पोषणतक्ता वाचणे महत्त्वाचे नाही, तर घटकपदार्थांची यादी वाचणे महत्त्वाचे आहे. साखर व मेदाचा स्तर कमी आहे की नाही हे ओळखणेही गरजेचे आहे," असे बेल्बियन सांगतात.

काही वेळा दुसऱ्या क्रमांकाचे रेटिंग असलेला ब्रॅण्ड चांगला असतो. हा ब्रॅण्ड किफायतशीर, साखरमुक्त व मेदमुक्त असू शकतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)