इंग्लंड : बोरिस जॉन्सन सरकारमधील 27 जणांचे राजीनामे

बोरिस जॉन्सन

फोटो स्रोत, Reuters

UKमध्ये बोरिस जॉन्सन सरकार संकटात सापडलं आहे. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला आहे. त्यानंतर सरकारमधील एकामागून एक अशा तब्बल 27 जणांनी राजीनामे दिले आहेत.

ब्रिटन सरकारमध्ये सहभागी असलेल्या एकूण 2 कॅबिनेट मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला. तर 13 मंत्री, 9 संसदीय सचिव आणि 3 इतर पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत.

ती खूप मोठी चूक होती - जॉन्सन

2019 मध्ये क्रिस पिंचर यांना बोरिस सरकारमध्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या त्यावेळी त्यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची पूर्व कल्पना होती, अशी कबुली UKचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी एका मुलाखतीत दिली आहे. ही एक खूप मोठी चूक होती असंसुद्धा त्यांनी मान्य केलंय.

पण त्यांची ही मुलाखत प्रसिद्ध झाल्याच्या काही तासांमध्येच त्यांच्या सरकारमधल्या 2 महत्त्वाच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. दरम्यान, या धक्क्यानंतर आणखी एक धक्का जॉन्सन सरकारला बसला. आणखी इतर दोन मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची माहिती नंतर समोर आली आहे.

मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री 11 च्या सुमारास अर्थमंत्री ऋषी सूनक आणि आरोग्य मंत्री साजिद जावेद या मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर तिथे अनेक घडामोडी घडल्या आहेत.

ऋषी सुनक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऋषी सुनक

ऋषी सूनक यांच्या राजीनाम्याची घोषणा करताना म्हटलं, "सरकारने त्यांच्या संपूर्ण क्षमतेने काम करायला हवं ही लोकांची अपेक्षा अगदीच योग्य आहे. मला वाटतं की आपण त्यासाठी लढायला हवं. म्हणून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशासमोर अनेक आव्हानं आहेत."

तर साजिद जावेद यांच्या मते बोरिस जॉन्सन राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून सरकार चालवण्यास असमर्थ आहे. त्यामुळे ते या सरकारमध्ये राहू इच्छित नाहीत. अनेक खासदारांनी आणि जनतेचा विश्वास जॉन्सन यांच्यावरून उडाला आहे असंही ते म्हणाले.

सध्या शिक्षण मंत्री नाधिम झाहवाल यांना अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर स्टीव्ह बर्कले यांच्याकडे आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टर्नर यांच्या मते बोरिस सरकार आता कोसळण्याच्या बेतात आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मागच्याच महिन्यात विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि पुढचं वर्षभर तरी त्यांच्या सरकारला धोका नाही. फक्त नियमात बदल झाला तर ही परिस्थिती बदलू शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)