हरलं की थेट....घरी, नेटफ्लिक्स आणतंय स्क्विड गेम्ससारखा रिअॅलिटी शो

स्क्विड गेम्स

फोटो स्रोत, Netflix

नेटफ्लिक्स एका रिअॅलिटी शोसाठी सध्या स्पर्धकांची भरती करत आहे. ही स्पर्धा तब्बल 35 कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी खेळवली जाणार आहे.

मूळ साऊथ कोरियन भाषेतील स्क्विड गेम्स ही नेटफ्लिक्सवरील आजपर्यंतची सर्वाधिक लोकप्रिय वेब सिरीज आहे. त्यामधून प्रेरणा घेऊनच नेटफ्लिक्सने हा नवा रिअॅलिटी शो तयार करण्याचा विचार केला आहे.

पण, या शोमध्ये स्क्विड गेम्स शोप्रमाणे जगण्या-मरण्याची बाजी नसेल, तर फक्त पैशांच्या बक्षिसासाठी स्पर्धक शोमध्ये सहभाग नोंदवतील, असं नेटफ्लिक्सने 12 जून रोजी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

नेटफ्लिक्सच्या या नव्या रिअलिटी शोमध्ये स्क्विड गेम्सप्रमाणेच 456 स्पर्धक असतील. विजेत्याला 4.56 मिलियन डॉलर (सुमारे 35 कोटी 64 लाख रुपये) इतकी बक्षीसाची रक्कम मिळेल. तर पराभूत स्पर्धकाला रिकाम्या हातांनी घरी परतावं लागेल.

याविषयी माहिती देताना नेटफ्लिक्सने म्हटलं, "रिअॅलिटी शोच्या इतिहासात आजवरच कधीच पाहायला न मिळालेल्या गोष्टी या शोमध्ये पाहायला मिळतील. स्पर्धकांची सर्वाधिक संख्या तर बक्षीसासाठीची सर्वाधिक रक्कम या शोमध्ये पाहायला मिळेल."

कोण घेऊ शकेल सहभाग?

21 वर्षे वयापुढील कोणताही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे. स्पर्धकाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. तर 2023 वर्षाच्या सुरुवातीला सुमारे महिनाभर शोच्या चित्रीकरणादरम्यान तो उपलब्ध असला पाहिजे.

स्क्विड गेम्सचा दुसरा भागही येणार

स्क्विड गेम्स वेब सिरीजचं दुसरं सीझन लवकरच येणार असल्याचं नेटफ्लिक्सने नुकतेच जाहीर केलं होतं.

स्क्विड गेम्स

फोटो स्रोत, Netlfix

या शोच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली होती. कर्जात बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना स्क्विड गेम्समध्ये आणलं जातं.

लहान मुलांकडून खेळले जाणारे खेळ खेळणं, प्रसंगी एकमेकांचा जीव घेण्याची तयारी ठेवणं, अशी स्पर्धा स्क्विड गेम्समध्ये असते. अखेरीस विजेत्याला 4.56 मिलियन डॉलर बक्षीस म्हणून मिळतील, अशी स्क्विड गेम्सची कथा होती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

नेटफ्लिक्सवरील आजवरचा सर्वात लोकप्रिय शो म्हणून स्क्विड गेम्स ओळखला जातो. ही वेब सिरीज प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या 28 दिवसांत तब्बल 111 मिलियन नेटफ्लिक्स युझर्सनी ती पाहिली.

स्क्विड गेम्स सिरीजचे कार्यकारी निर्माते आणि लेखक-दिग्दर्शक हाँग डाँग ह्यूक यांनी याविषयी सांगताना सोमवारी (12 जून) म्हटलं, स्क्विड गेम्सचा पहिला सिझन आणण्यासाठी 12 वर्षे गेली. पण केवळ 12 दिवसांत स्क्विड गेम्स नेटफ्लिक्सवरची सर्वाधिक लोकप्रिय सिरीज बनली."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)