मोनालिसाच्या चित्रावर फेकला केक

मोनालिसा, पेंटिंग

फोटो स्रोत, TWITTER/@KLEVISL007/REUTERS

फोटो कॅप्शन, मोनालिसा

व्हीलचेअरमध्ये बसलेली वृद्ध महिला असल्याचं भासवत एका माणसाने जगप्रसिद्ध अशा मोनालिसाच्या म्हणजेच लिओनार्डो डा व्हिन्सीच्या चित्रावर केक फेकला आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे मोनालिसाच्या चित्राला कोणतंही नुकसान झालेलं नाही. चित्राभोवती उभारण्यात आलेल्या प्रोटेक्टिव्ह ग्लासवर हा केक जाऊन आदळला. या काचेवर पांढऱ्या रंगाचं क्रीम पसरलं आहे.

केक फेकणाऱ्या माणसाने विग घातला होता, लिपस्टिक लावलं होतं. पृथ्वीचा विचार करा असा संदेश देत तो माणूस पुढे जात होता.

रविवारी झालेला हा प्रकार धक्कादायक आणि अचंबित करणारा होता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

अमेरिकेचे लोव्हुर संडबर्ग यांनी जे घडलं ते सगळं प्रत्यक्ष अनुभवलं. मोनालिसाचं चित्र पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. तेव्हाच व्हीलचेअरमध्ये बसलेली व्यक्ती चित्राजवळ केली, त्या बाईने चित्राला मारायला सुरुवात केली, प्रत्यक्षात तिचे फटके काचेवर आदळत होते.

मग त्या व्यक्तीने केक फासायला सुरुवात केली. सुरक्षारक्षकांनी 10-15 सेकंदात त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळेच चक्रावून गेले.

मोनालिसाचं प्रसिद्ध चित्र असलेल्या ऐतिहासिक ठिकाणी असं काही घडू शकतं याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

केकच्या बरोबरीने त्या व्यक्तीने गुलाबही फेकले. सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हा तो 'थिंक ऑफ द अर्थ' असं ओरडत होता.

लिओनार्डो दा विंची, लैंगिक ओळख

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लिओनार्डो दा विंची

'काही माणसं पृथ्वीची नासधूस करत आहेत. त्याचा विचार करा. कलाकार तुम्हाला सांगत आहेत की पृथ्वीचा विचार करा. म्हणूनच मी हे केलं.'

36वर्षांच्या या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस मानसोपचार केंद्रात पाठवण्यात आलं. मोनालिसाचं चित्र असलेल्या ठिकाणच्या अन्य सांस्कृतिक वस्तूंचं नुकसान झाल्याने याप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं.

व्हीडिओ कॅप्शन, दृष्टिहीन व्यक्तिंना कलेचा आनंद घेता यावा म्हणून 3D फोटोवर्क्सनं अभिनव उपक्रम राबवला आहे.

रेनेसॉँ काळात साकारण्यात आलेल्या या चित्राभोवती 1950मध्ये संरक्षक काच बसवण्यात आली आहे. या चित्रावर झालेल्या असिड हल्ल्यानंतर ही उपाययोजना करण्यात आली होती.

संरक्षक काचेवरचं क्रीम बाजूला केल्यानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिल्याचं संडबर्ग यांनी चित्रित केलेल्या व्हीडिओत दिसत आहे.

असं होण्याची किती शक्यता होती असा सवाल अल्बानिआच्या क्लेव्हिस नावाच्या व्यक्तीने विचारला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)