दीनानाथ दलाल : घराघरात चित्रकला पोहोचवणाऱ्या या चित्रकाराची ही चित्रं तुम्ही पाहिलीत का?

दीनानाथ दलाल

फोटो स्रोत, Dinanathdalalmemorialcommittee

फोटो कॅप्शन, 'दीपावली' दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ आणि आतील रेखाटनं यामुळे दीनानाथ दलाल हे नाव घराघरात पोहोचलं.

दीनानाथ दलाल. मराठी कलाविश्वात मनसोक्त मुशाफिरी केलेल्या चित्रकाराचा आज स्मृतिदिन. 30 मे 1916 रोजी त्यांचा गोव्यात मडगाव येथे जन्म झाला होता.

वयाच्या 20व्या वर्षी ते मुंबईत आले. केतकर मास्तरांच्या क्लासमध्ये शिकण्यासाठी गेले, तिथं त्याचं काम पाहून मास्तरांनी शिकण्यसाठी नव्हे तर शिकवण्यासाठी येण्यास सांगितलं. शिकवत असतानाच त्यांनी बाहेरून जे. जे. कला महाविद्यालयाचा डिप्लोमा पूर्ण केला.

पुढे मौज प्रकाशनाच्या जागेत काम करण्यासाठी एक खोली मिळाली आणि त्यांच्या व्यावसायिक कामांना खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. वेगवेगळ्या लेखकांशी संपर्क झाला. सामंतांच्या अॅड एजन्सीमध्ये त्यांनी काम केलं. 'दीपावली'तून दलालांची चित्रं घरोघरी पोहोचली.

दीनानाथ दलाल

फोटो स्रोत, Dinanathdalalmemorialcommittee

फोटो कॅप्शन, विनोबांचं हे तैलचित्र, दलालांची खासियत.
दीनानाथ दलाल

फोटो स्रोत, Dinanathdalalmemorialcommittee

फोटो कॅप्शन, जलरंगातले महात्मा गांधी. दलालांच्या शैलीचा हा एक अनोखा आविष्कार.
दीनानाथ दलाल

फोटो स्रोत, Dinanathdalalmemorialcommittee

फोटो कॅप्शन, 'गोवा' या शीर्षकाखालील लॅण्डस्केपची मालिका.
दीनानाथ दलाल

फोटो स्रोत, Dinanathdalalmemorialcommittee

फोटो कॅप्शन, कलाकाराची भावमुद्रा टिपणारी अशी असंख्य चित्र दलालांनी रेखाटली आणि ती लोकप्रियही झाली.
दीनानाथ दलाल

फोटो स्रोत, Dinanathdalalmemorialcommittee

फोटो कॅप्शन, काश्मीर चित्रमालिकेसाठी दलाल यांनी केलेला सराव.
दीनानाथ दलाल

फोटो स्रोत, Dinanathdalalmemorialcommittee

फोटो कॅप्शन, बोलकं मुखपृष्ठ ही दलालांच्या कामाची आणखी एक लक्षणीय शैली. रणजित देसाई यांच्या 'स्वामी'चं हे सर्वसमावेशक मुखपृष्ठ. विश्राम बेडेकर यांचं 'रणांगण' आणि व्यंकटेश माडगूळकर यांचं 'बनगरवाडी' यांची मुखपृष्ठही दलालांच्या कुंचल्यातून उतरलेली.
दीनानाथ दलाल

फोटो स्रोत, Dinanathdalalmemorialcommittee

फोटो कॅप्शन, कथाचित्रांचा सराव

दीनानाथ दलाल यांच्या कन्या प्रतिमा वैद्य यांनी ही चित्रं उपलब्ध करून दिली आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)