श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी केली 'ही' महत्त्वाची घोषणा

फोटो स्रोत, Getty Images
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी नव्या सरकारसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
त्यांनी ट्वीट करून सांगितलं, "देशात अराजकतेची स्थिती नियंत्रित करण्यासाठी आणि इतर समस्या सोडवण्यासाठी नवीन पावलं उचचले जातील."
त्यांनी सांगितलं की एका आठवड्याच्या आत संसदेत बहुमत असलेल्या आणि लोकांचा विश्वास संपादन करण्याची क्षमता असलेल्या पंतप्रधानांची नियुक्ती केली जाईल.
त्यांनी म्हटलं आहे, "नव्या सरकारला त्यांचे उपक्रम राबवायची संधी दिली जाईल. देश पुढे जावा यासाठी जे धोरणं आखली जातील त्याला आम्ही पाठिंबा देऊ"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"त्याशिवाय संसदेला अधिक सशक्त करण्यासाठी घटनेत आणखी सुधारणा करण्यात येईल. त्याबरोबरच कार्यकारी अध्यक्ष हे पद समाप्त करण्याचाही प्रस्ताव आहे."
गोटाबाया त्यांच्या शेवटच्या ट्विटमध्ये लिहितात, "लोकांच्या आयुष्य आणि त्यांच्या संपत्तीच्या रक्षणासाठी मी लोकांना मदतीसाठी नम्र आवाहन करत आहेत"
श्रीलंका सध्या एका मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्याविरोधात तिथली जनता निदर्शनं करत आहे. देशभरात झालेल्या हिंसाचारामुळे गोळीबार झाला आणि त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.
आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा अचानक आलेला नाही. त्याचा कयास आधीपासून लावला जात होता. महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यायला गोटाबाया यांनीच सांगितलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








