इम्रान खान यांची पत्नी रेहाम म्हणते, मी इम्रानला का सोडलं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल

पाकिस्तान, इम्रान खान,
फोटो कॅप्शन, इम्रान खान आणि रेहाम खान

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी (3 एप्रिल) विरोधकांसह नागरिकांना धक्का दिला.

इम्रान यांनी संसद बरखास्त करण्याचा, नव्याने निवडणुका घेण्याचं आवाहन केलं. इम्रान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला. यानंतर राजकीय वर्तुळाकडून तसंच सर्वसामान्य व्यक्तींच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

विरोधकांनी इम्रान खान यांनी केलेलं आवाहन अवैध ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची नोंद घ्यावी अशी त्यांना अपेक्षा आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आणि निवडणुका होईपर्यंत पाकिस्तानात काळजीवाहू सरकार स्थापन होऊ शकतं.

पाकिस्तानात सातत्याने सुरू असलेल्या घडामोडींवर सर्वसामान्य पाकिस्तानचे नागरिक काय म्हणत आहेत? सोशल मीडियावर यासंदर्भात काय प्रतिक्रिया आहेत.

सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियाही इम्रानविरोधक आणि इम्रानसमर्थक अशा विभागल्या गेल्या आहेत. सरकार न पडणं इम्रान समर्थक साजरा करत आहेत. विरोधक टीका करत आहेत.

पाकिस्तान, इम्रान खान,

फोटो स्रोत, FB/IMRANKHAN

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान इम्रान खान

दोन दिवसांपूर्वीच इम्रान यांनी देशाला संबोधित करताना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना लढण्याचं आवाहन देशवासीयांना केलं होतं. पण त्यांनी अचानक संसद भंग करण्याची सूचना केली. यावर ट्वीटरवर नाएला इनायत यांनी लिहिलं, 'मी शेवटच्या चेंडूवर चेंडू घेऊन पळून जाईन.'

इम्रान यांची माजी पत्नी रेहाम खान यांनी ट्वीट करून म्हटलं, 'नव्याने निवडणुका घेण्याचं सांगत अविश्वास ठरावाच्या अवैध गोष्टीला योग्य ठरवलं जाऊ शकत नाही. निवडणुका घ्यायच्या की नाही याचा निर्णय इम्रान घेऊ शकत नाहीत. कारण घटनेनं त्यांना तो अधिकार दिलेला नाही. नियमभंग करणाऱ्याला शासन झालं तर समाजासमोर योग्य उदाहरण राहील.'

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

रेहाम यांनी याआधीही इम्रान यांच्यावर टीका केली होती.

'संविधानाचा आदर राखण्यात आलेला नाही. देशांतर्गत नाही आणि विदेशी कोणत्याच ताकदींची पर्वा नाही. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की मी या माणसाची साथ का सोडली? आज जे आनंद व्यक्त करत आहेत ते आपला मूर्ख विचार दाखवून देत आहेत. परिस्थिती ओळखा.'

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हफीझने ट्वीट करून लिहिलं की, 'पाकिस्तान झिंदाबाद, इम्रान खान तुम्ही नेहमीच महान राहाल.'

इम्रान यांचे समकालीन वासीम अक्रम यांनी इम्रान खान यांचा हसरा फोटो ट्वीट करून लिहिलं, 'द गेम चेंजर.'

पाकिस्तानमध्ये अचानक झालेल्या राजकीय बदलानंतर इम्रान खान यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर अशा पोस्ट दिसू लागल्या आहेत.

प्रसिद्ध पत्रकार हामिद मीर यांनी ट्वीट केलं, सर्वोच्च न्यायालयाने रविवारी म्हटल्याप्रमाणे इम्रान खान किंवा राष्ट्रपतींनी दिलेल्या आदेशावर अवलंबून राहील. काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड होईपर्यंत राष्ट्रपती, इम्रान खान यांनाच पदी राहण्यासंदर्भात. हा न्यायालयाचा अपमान नाही का?

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

या सगळ्या प्रकरणात बालाकोट आणि 2019 मध्ये आमनेसामने असलेल्या भारत-पाकिस्तान यांची चर्चा होत आहे.

काहींनी 2019 मध्ये आसिफ गफ्फूर यांचं वक्तव्य शेअर करत आहेत. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, तुम्हाला चकित करू. आमच्या सरप्राईजचची प्रतीक्षा करा.

अर्शद शरीफ यांनी हे शेअर करताना म्हटलं आहे- सच्चा पाकिस्तानी नेहमी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चकित करतो.

साराने ट्वीट केलं, पाकिस्तानवर इम्रान खान यांचे उपकार असतील. त्यांनी मन जिंकलं. लुटारूंना धडा शिकवला.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

अनेकजण उदास शाहबाज शरीफ आणि हसऱ्या चेहऱ्याचे इम्रान खान यांचे फोटो शेअर करत आहेत. दोन छायाचित्रं, दोन वेगवेगळ्या कहाण्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)