हळद खाल्ल्यामुळे कॅन्सर बरा होईल का?

फोटो स्रोत, Getty Images
भारतासोबतच सगळ्या दक्षिण आशियातल्या देशांमध्ये स्वयंपाकघरात हळदीचा वापर होतोच. पण हळद ही पदार्थांना वेगळी चव - रंग आणते, आपल्या आरोग्यासाठी उपायकारक असते. पण ही हळद कॅन्सरपासून आपला बचाव करू शकते का?
दाह - अपचनापासून डायबिटीस, डिप्रेशन, अल्झायमर्सपर्यंतच्या गंभीर आजारांसाठी हळद कशी फायदेशीर ठरू शकते, हे सांगणारे हजारो लेख मिळतील. पण या हळदीने कॅन्सरवरही उपचार केले जाऊ शकतात.
हळदीवर हजारो संशोधनं झालेली आहेत. असं म्हटलं जातं हळदीमधल्या एका घटकामुळे ती औषधी ठरते. हा घटक म्हणजे - कर्क्युमिन
उंदरांवर या कर्क्युमिनचे प्रयोग करण्यात आले. उंदरांना मोठ्या प्रमाणात कर्क्युमिन दिल्यानंतर कॅन्सरची वाढ थांबत असल्याचं यात दिसून आलं. पण हळदीमध्ये 2-3% कर्क्युमिन असतं. आणि आपण जेव्हा हळदीचं सेवन करतो तेव्हा हे सगळंच कर्क्युमिन आपल्या शरीराकडून शोषलं जात नाही. शिवाय जेवणामध्ये सामान्यतः हळदीचं प्रमाण किती असायला हवं हे सध्या छापून आलेल्या अभ्यासांमध्ये हे कुठेच लिहिलेलं नाही.
हे संशोधन कसं करण्यात आलं?
हे जाणून घेण्यासाठी आम्ही ब्रिटनमधल्या हळदीच्या आरोग्यावर परिणाम जाणून घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या संशोधनाचा आढावा घेतला.
यामध्ये सहभागी झालेल्या पहिल्या गटाला दररोज एक चमच हळद खायला देण्यात आली. हीच हळद दुसऱ्या गटाला सप्लिमेंट म्हणून दिली गेली. तर तिसऱ्या गटाला हळद आहे सांगून दुसरं काहीतरी देण्यात आलं.
या लोकांच्या तीन रक्तचाचण्या करण्यात आल्या. हळदीचं सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातल्या रक्तपेशींनी दाह (Inflamation) होण्यापासून रोखला होता आणि यावरून त्यांची रोग प्रतिकारकशक्ती चांगली असल्याचं दिसून आलं.
डायबिटीससारख्या प्रदीर्घ आजारांवरही परिणामकारक ठरण्याइतपत दाह कमी करण्यासाठी हळद प्रभावी ठरू शकते का, याविषयीची माहिती मिळण्यास यामुळे मदत झाली. न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये पीबी बायोसायन्सेसने ही टेस्ट विकसित केली. याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस टेस्ट म्हटलं जातं.
दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये रक्तातल्या पांढऱ्या पेशी मोजण्यात आल्या. DNA टेस्टसाठी याचे निकाल गरजेचे होते. पण यावरून या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीचीही कल्पना दिली.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनने तिसरी चाचणी विकसित केली. यामध्ये DNAच्या मेथिलेशनबाबत शोध घेण्यात आला. कॅन्सर विरोधी ठरण्याचे गुणधर्म हळदीत किती आहेत याचा शोध या चाचणीतून घेण्यात आला.

या संशोधनात सहभागी तीन्ही गटांतल्या लोकांची ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पातळी न्यूकॅसल युनिव्हर्सिटीने घेतलेल्या ऑस्किडेटिव्ह स्ट्रेस टेस्टमध्ये समान आढळली.
हवामानाचा परिणाम आपल्या रोग प्रतिकारक शक्तीवर होतो. सनबर्नमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. सहा आठवड्यांच्या काळामध्ये तीनही गटांतल्या लोकांवर या बदलाचे परिणाम पहायला मिळाले.
तीनही गटांतल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक पेशी कमी झाल्याचं पांढऱ्या रक्तपेशींच्या मोजणीवरून लक्षात आलं. सगळ्या गटांमध्ये ही घट समान होती.
ज्या गटाला हळद सांगून दुसरं काही देण्यात आलं आणि ज्या गटाला हळद 'सप्लिमेंट' म्हणून देण्यात आली त्यांच्यातल्या DNA मिथिलेशनमध्ये फारसा फरक नव्हता. पण ज्या लोकांना अन्नद्वारे हळदीचं सेवन केलं त्यांचा मिथिलेशन पॅटर्न वेगळा होता.
यासोबतच युसीएलच्या संशोधकांना एका जनुकात मोठा बदल पहायला मिळाला. अँक्झायटी, अस्थमा, एक्झिमा आणि कॅन्सरमधल्या धोक्यांशी या जनुकाचा संबंध होता. या जनुकामध्ये काही बदल झाल्याचं आढळलं.
निष्कर्षांमधून काय आढळलं?
हळदीचा परिणाम सकारात्मक होतो की नकारात्मक होतो असा निष्कर्ष आताच काढणं घाईचं ठरेल. पण हळदीमुळे जनुकांमध्ये झालेले बदल फायद्याचे ठरू शकतात.
पण या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांच्या रक्तातल्या कर्क्यमुनिच्या पातळीचं विश्लेषन संशोधकांनी केलं नव्हतं, हे ही इथे सांगायला हवं.

फोटो स्रोत, Getty Images
जे लोक जेवणामध्ये हळद वापरत होते त्यांनी आपला आहार बदलला हेदेखील एक कारण असू शकतं. यामुळे मिथिलेशनमध्ये बदल झाला. पण हा हळदीमुळे पडलेला फरक नव्हता.
जेवणातून हळदीचं सेवन आणि हळदीच्या सप्लिमेंटमध्ये काय फरक?
जेवणामध्ये हळद वापरल्यास त्याचा परिणाम आपलं शरीर किती कर्क्युमिन शोषून घेतं यावर होतं. कर्क्युमिन लिपोफिलिक असतं. म्हणजेच लिपिड्स किंवा फॅट्समध्ये विरघळणारं असतं. म्हणूनच जेव्हा आपण जेवण तयार करण्यासाठी तेलाचा वापर करतो तेव्हा कर्क्युमिन तेलाला चिकटतं आणि सहजपणे आपल्या शरीरात विरघळतं. काळी मिरीही हेच करू शकते.
यामधला पिपरिन नावाचा घटक हे काम करतो. यामुळे आपल्या शरीराला जास्त कर्क्युमिन शोषून घेण्यास मदत होते. म्हणूनच हळद, काळी मिरी आणि तेल वापरून केलेलं जेवण एक चांगलं कॉम्बिनेशन ठरू शकतं.
हळदीविषयीच्या या संशोधनाबद्दल मोठी उत्सुकता आहे. कारण हळदीचा आपल्या जनुकांवर काय परिणाम होतो आणि हळद नेमकी आपल्या शरीरापर्यंत कशी पोहोचवता येऊ शकते याविषयीची माहिती समजली.

फोटो स्रोत, ANI
कॅन्सर विकसित होण्यापासून थांबवणारी गोष्ट म्हणून हळदीवर यापुढचं संशोधन केलं जाऊ शकतं, हे या अभ्यासावरून समोर आलं. म्हणजेच यामध्ये कॅन्सरचा विकास होण्यापासून रोखण्याची क्षमता असू शकते.
हळद आरोग्यासाठी फायद्याची ठरू शकते.
पण कॅन्सर किंवा हृदयरोगासारख्या प्रदीर्घ काळ चालणाऱ्या रोगांचे धोके कमी करण्यासाठीचा मार्ग शोधणं खूप कठीण असतं. म्हणूनच असा कोणतंही संशोधन जे या आजारांबद्दल सुरुवातीला योग्य इशारा देत असेल किंवा मग जे इतकं संवेदनशील असेल तर याच्याशी संबंधित धोक्यांमधल्या लहानशा बदलाबद्दलही माहिती देत असेल, तर अतिशय महत्त्वाचं असतं.
यासोबतच कमी प्रमाणात पण सातत्याने हळदीचं सेवन केल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, हे देखील या संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आढळलंय.
हळदी तुमचं अनेक जुन्या आजारापासून संरक्षण करू शकते म्हणूनच अन्नपदार्थांमध्ये हळदीचा वापर करणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं ठरू शकतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








