लीना नायर: भारतीय वंशाच्या लीना बनल्या शेनेलच्या सीईओ, इंद्रा नुईंना मानतात आदर्श

फोटो स्रोत, Instagram
भारतासाठी हा आठवडा काहीसा खास ठरला आहे. भारतीय महिलांनी तो देशासाठी खास ठरवला आहे.
एकीकडं हरनाझ संधू यांनी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला तर दुसरीकडे भारताच्या आणखी एक महिलेनं जागतिक स्तरावर भारताचं नाव उंचावलं आहे. त्यांचं नाव आहे लीना नायर.
तुमचा फॅशन जगताशी थोडा जरी संबंध असेल तर शेनेल या लक्झरी फॅशन ब्रँडबद्दल नक्कीच ऐकलं असेल. लीना आता या कंपनीच्याच ग्लोबल चीफ एक्झिक्युटिव्ह बनल्या आहेत.
एखाद्या कंपनीचं जागतिक स्तरावर सीईओ पद मिळवणाऱ्या इंद्रा नुई यांच्यानंतर त्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहे. इंद्रा नुई पेप्सिकोच्या ग्लोबल सीईओ होत्या.
मात्र, भारतीय वंशाच्या लीना नायर यांनी यापूर्वीच अनेक प्रकारचं यश मिळवलं आहे.
लीना नायर यापूर्वी अँग्लो-डच कंपनी असलेल्या युनिलिव्हरमध्ये चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर होत्या. युनिलिव्हरमध्ये हे पद सांभाळणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या आणि पहिल्या महिल्या होत्या.
युनिलिव्हरमध्ये त्या लीडरशिप एक्झिक्युटिव्हच्या सदस्यही होत्या. लीना यांनीही ट्विटरवर त्यांच्या या जबाबदारीविषयी माहिती दिली आहे.
''शेनेल कंपनीमध्ये चिफ एक्झिक्युटिव्ह पदावर संधी मिळाल्यामुळं मला प्रचंड गौरवान्वित झाल्याचा अनुभव होत आहे. ही एक उत्तम कंपनी आहे,'' असं त्यांनी लिहिलं.
लीना यांनी याबाबत अनेक ट्वीट केले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"युनिलिव्हरमधील दीर्घ करिअरसाठी मी आभार मानते. हे ठिकाण गेली 30 वर्षं माझं घर राहिलं आहे. याठिकाणी मला शिकण्याच्या अनेक संधी मिळाल्या आहेत. पुढं जाण्याच्या संधी मिळाल्या आणि एका विचारानं पुढं जाणाऱ्या या संस्थेमध्ये योगदान देण्याच्या संधी मला मिळाल्या," असं त्यांनी लिहिलं.
"मी कायम युनिलिव्हरबाबत आणि त्यांच्या ध्येयाबाबत अभिमानानं बोलत राहील,'' असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
शेनेलमध्ये नव्या नियुक्तीसाठी त्यांनी सर्वांचे आभार मानत सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
"आपल्या सर्वांचे आभार. माझ्यावर विश्वास ठेवा, याठिकाणी पोस्ट होणाऱ्या सर्व प्रतिक्रिया मी वाचत आहेत," असंही त्यांनी ट्विटर पोस्टमध्ये सांगितलं.
लीना यांच्याबाबत युनिलिव्हरनं काय म्हटलं?
लीना यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटलं त्याप्रमाणेच युनिलिव्हरमध्ये त्यांनी 30 वर्षांचा दीर्घ प्रवास केला. कंपनीत एका व्यक्तीने तीस वर्ष जी महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे, त्याबाबत कंपनीनं निवेदन जाहीर केलं.

फोटो स्रोत, Instagram
''कंपनीच्या सीएचआरओ लीना नायर यांनी जानेवारी 2022 मध्ये कंपनी सोडून नव्या संधीच्या दिशेनं जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ग्लोबल चिफ एक्झिक्युटिव्ह पदावर जात आहेत," असं कंपनीनं म्हटल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
"लीना यांनी गेल्या तीस वर्षांमध्ये कंपनीच्या हितासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यासाठी त्यांचे आभार. युनिलिव्हरमधील संपूर्ण कारकिर्दीदरम्यान त्या कायम आघाडीवर राहिल्या," असं युनिलिव्हरचे सीईओ अॅलन जोप म्हणाले.
लीना यांचं खासगी जीवन
52 वर्षीय लीना नायर महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या होली क्रॉस कॉनव्हेंट स्कूलमधून झालं.

फोटो स्रोत, Instagram
त्यानंतर सांगलीमधील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनीअरिंग केलं. त्यानंतर जमशेदपूरच्या झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट (XLRI) मधून उर्वरित शिक्षण पूर्ण केलं.
याठिकाणी त्यांनी एमबीएची पदवी घेतली आणि त्यानंतर 1992 मध्ये त्या हिंदुस्तान लिव्हरमध्ये काम करू लागल्या.
यशाची अनेक शिखरं पार केली
लीना यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात हिंदुस्तान लिव्हरमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून सुरू केली होती. त्यानंतर 1993 मध्ये त्या लिप्टनमध्ये फॅक्टरी पर्सनल मॅनेजर बनल्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
1996 मध्ये हिंदुस्तान लिव्हरमध्येच त्याच्या एम्पलॉई रिलेशन्स मॅनेजर बनल्या. त्यानंतर 2016 मध्ये त्यांना युनिलिव्हरच्या सीएचआरओ पदी नियुक्ती मिळाली. त्या पदावर पोहोचणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या पहिल्या महिल्या होत्या.
याच वर्षी फॉर्च्युन इंडियानं मोस्ट पॉवरफुल विमेन लिस्टमध्येही त्यांचा समावेश केला होता.
लीना यांनी याच वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही त्यांचं मत मांडलं होतं. मीट द लीडर कार्यक्रमांतर्गत त्यांनी अनेक पैलूंवर चर्चाही केली आहे.

फोटो स्रोत, Instagram
लीना, इंद्रा नूई यांना मैत्रीण आणि मार्गदर्शक मानतात. "त्यांना मैत्रीण आणि मेंटॉर म्हणताना मला अभिमान वाटतो," असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
या यशानंतर लीना नायर यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
जेएस डब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा लीना. महिला सबलीकरणासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, असं त्यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
गीतू मोझा यांनीही हा अभिमानास्पद क्षण असल्याचं म्हटलं आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सादिया झाहिदी, नॅसकॉमच्या देबयानी घोष यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शेनेल कंपनीनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या वर्णनामध्ये, शेनेल एक स्टाईल आहे. फॅशन तर येत जात राहते, पण स्टाईल कायम राहते, असं लिहिलं आहे.

फोटो स्रोत, Instagram
शेनेल प्रामुख्यानं फॅशन, ज्वेलरी, घड्याळं, चष्मे-गॉगल, परफ्यूम, मेकअप आणि स्किन केअरशी संबंधित ब्रँड आहे.
या ब्रँडची सुरुवात गॅब्रियेल बोनोल शेनेल यांनी केली होती. त्या फ्रेंच फॅशन डिझायनर आणि बिझनेसविमेन होत्या.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)