नरेंद्र मोदी - जो बायडन भेट : महात्मा गांधींच्या 'विश्वस्ता'च्या संकल्पनेवर चर्चा

नरेंद्र मोदी आणि जो बायडन

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, नरेंद्र मोदी आणि जो बायडन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरेकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात शुक्रवारी भेट झाली.

बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच त्यांना प्रत्यक्ष भेटले.

या बैठकीवेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, "तुमच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिकेचे संबंध विस्तारण्यासाठीचं बी पेरलं गेलं आहे."

मोदी पुढे म्हणाले, "आजची द्विपक्षीय चर्चा महत्त्वाची आहे. आपण या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरुवातीला भेटत आहोत. हे दशक कसं आकाराला येतं, यामध्ये तुमचं नेतृत्व नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी मजबूत होण्यासाठी हे बीज पेरलं गेलं आहे."

जो बायडन यांनी गांधी जयंतीचा उल्लेख केला. त्यावर "गांधीजी विश्वस्ताची भूमिका निभावण्याबद्दल बोलले आहेत. ही एक संकल्पना आहे जी येत्या काळात आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे," असंही मोदी म्हणाले.

बायडन यांनी नमूद केलेले प्रत्येक विषय भारत-अमेरिका मैत्रीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. कोव्हिड-19, हवामान बदल आणि क्वाड यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत, असं मोदी पुढे म्हणाले.

"व्यापाराला भारत आणि अमेरिका या दोन्ही देशामध्ये स्वतःचं असं महत्त्व आहे. या दशकात आपण एकमेकांना पूरक असू शकतो. अमेरिकेकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भारताला आवश्यक आहेत आणि भारताकडेही अनेक गोष्टी आहेत ज्या अमेरिकेसाठी उपयुक्त ठरू शकतात. या दशकात व्यापार हा प्रमुख मुद्दा असेल," असं मोदींनी नमूद केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

बायडन यांना भेटण्यापूर्वी मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी चर्चा केली. मॉरिसन आपले मित्र असल्याचं मोदींनी सांगितलं.

त्यांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदींनी म्हटलं, "माझे चांगले मित्र, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत चर्चेचा नेहमीच चांगला अनुभव असतो. त्यांच्यासोबत वाणिज्य, व्यापार, ऊर्जा आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्याची चर्चा केली."

या दौऱ्यात मोदींनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासोबतही चर्चा केली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

या चर्चेनंतर मोदी म्हणाले, "जपान भारताच्या सर्वात महत्त्वाच्या भागीदारांपैकी एक आहे. जपानचे पंतप्रधान सुगा यांच्यासोबतची चर्चा चांगली झाली. विविध विषयांवर चर्चा झाली, यात दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला गेला. भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य जगासाठीही चांगले ठरतील."

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज म्हणजे 24 सप्टेंबर रोजी हा दौरा संपणार आहे.

मोदींनी घेतली कमला हॅरीस यांची भेट, भारतभेटीचं दिलं निमंत्रण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस यांची गुरुवारी (23 सप्टेंबर) वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली.

कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला आणि पहिल्या कृष्णवर्णीय उपाध्यक्षा आहेत. त्या मूळच्या भारतातील आहेत.

"भारतातील लोक तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत," अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरीस यांना भारतभेटीचं निमंत्रणही दिलं.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये ज्यावेळी कमला हॅरीस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विजयी झाल्या, त्यावेळी भारतातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता हस्तगत केल्यानंतर बायडन-मोदी भेट होतेय. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होते का, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. कारण या महिन्याच्या सुरुवातीलाच तालिबानच्या प्रवक्त्यानं बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं की, "भारत प्रशासित काश्मीरमधील मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याचा हेतू आहे."

कमला हॅरिस, मोदी

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांवर नियंत्रण आहे. दोनही देश काश्मीरवर आपला दावा सांगतात.

2019 मध्ये अमेरिकेच्या निवडणुकीवेळी कमला हॅरीस यांनी काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह 'QUAD' संमेलनात सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि जपानचे नेतेही यात असतील. एशिया-पॅसिफिक भागातलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं हे संमेलन महत्त्वाचं मानलं जातंय.

अमेरिकेतील टॉप-5 कंपन्यांच्या सीईओंसोबत मोदींची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील सौरऊर्जा, 5जी तंत्रज्ञान, ड्रोन इत्यादी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) चर्चा केली.

मोदींनी कुणा कुणाशी चर्चा केली?

  • क्वालकॉमचे सीईओ ख्रिश्चिाओ अमॉन
  • अॅडोबचे सीईओ शंतनू नारायण
  • फर्स्ट सोलारचे साईओ मार्क विडमर
  • जनरल ऑटोमिक्सचे सीईओ विवेक लल्ल
  • ब्लॅकस्टोनचे सीईओ स्टिफन ए शॉर्झमन

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)