Sex: असुरक्षित सेक्समधून पसरणारे आजार कोरोना काळात घटले?

गुप्तरोग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मायकल रॉबर्ट्स
    • Role, आरोग्य संपादक, बीबीसी न्यूज ऑनलाईन

इंग्लंडमध्ये नव्यानं निदान झालेल्या लैंगिक संक्रमणातून होणाऱ्या संसर्गाची प्रकरणं (STIs-सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स) तीन पटीनं कमी झाल्याचं, अभ्यासातून समोर आलं आहे.

कोरोना साथीच्या काळात लोकांच्या वर्तनात बदल झाल्यामुळं ही घट झाली असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शिवाय या काळात कमी चाचण्या होणं, हे देखील त्यामागचं कारण असू शकतं असं म्हटलं जात आहे.

कोव्हिडचे निर्बंध आता अगदी कमी प्रमाणात शिल्लक राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी STI चा विचार करता सामाजिक अंतराचा नियम मोडू नये असा इशारा दिला जात आहे. तसंच धोकादायक पद्धतानं शरिरसंबंध ठेवले असल्यास तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

STI शी संबंधित आजारांची लक्षणं नसू शकतात. मात्र कंडोमच्या वापरानं असे आजारच टाळता येऊ शकतात.

जननेंद्रियांवर येणारे फोड

2020 या वर्षामध्ये 318,000 STI ची प्रकरणं समोर आली आहे. 2019 मध्ये हा आकडा 467,096 होता, हे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.

जननेंद्रियांवर येणारे फोड, पुरळ अशा त्वचारोगांसाठी प्रत्यक्षात रुग्णाची तपासणी करणं अत्यंत गरजेचं असतं. पण अशा आजारांच्या निदानात मोठी घट झाल्याचं पब्लिक हेल्थ इंग्लंडनं म्हटलं आहे.

कंडोम

फोटो स्रोत, Getty Images

मात्र त्याचबरोबर क्लॅमिडिया आणि गोनोरिया अशा स्वतः सँपल किटद्वारे तपासणी करता येणाऱ्या आजारांचे निदान होण्याचं प्रमाणही घटलेलं पाहायला मिळत आहे.

2019 शी तुलना करता :

  • लैंगिक समस्यांविषयी सेवांद्वारे सल्ला घेणाऱ्यांचं प्रमाण 10% ने घटलं आहे.
  • समोरासमोर भेटून सल्ला घेण्याचं प्रमाण 35%नी घटलं आहे. मात्र इंटरनेटच्या माध्यमातून सल्ला घेणं दुपटीने वाढलं आहे.

गेल्या काही वर्षांचा विचार करता STI शी संबंधित नवे आजार आढळण्याचं प्रमाण पुढील प्रकारच्या व्यक्तींमध्ये सर्वाधिक आढळलं आहे :

  • वय 15-24
  • कृष्णवर्णीय
  • पुरुषाबरोबर शरिरसंबंध ठेवणारे पुरुष

नव्या प्रकरणांमध्ये घट झाली ही चांगली बाब आहे, पण यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे असं टेरेन्स हिगिन्स ट्रस्टचे डेबिक लेकॉक म्हणाल्या.

"लैंगिक संबंधांमधून संसर्ग होणारे आजार अजूनही पसरत आहेत," असं त्या म्हणाल्या.

"याचा अर्थ असा होतो की, सेक्स करत असाल तर तुम्ही नियमितपणे STI शी संबंधित चाचण्या करत राहायला हवं. तसंच लैंगिक आरोग्य सेवा या ऑनलाईन आणि प्रत्यक्ष भेटून दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहेत, हेही लक्षात असू द्यायला हवं."

इंग्लंडच्या पब्लिक हेल्थमधील लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारांच्या विभागाच्या प्रमुख डॉ. कॅटी सिंका यांनीही याबाबत सल्ला दिला आहे.

"तुम्ही नव्या किंवा अनोळखी पार्टनरबरोबर शरिरसंबंध ठेवत असाल, तर कंडोमचा वापर करा. तसंच चाचण्या करून घ्या. कारण STI शी संबंधित आजारांमुळं तुमच्यासह तुमच्या सध्याच्या आणि भविष्यातील सेक्स पार्टनरच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)