हाफिझ सईदच्या लाहोरमधील घरासमोर बॉम्बस्फोट; 2 जणांचा मृत्यू, 14 जखमी

हाफिझ सईद, पाकिस्तान
फोटो कॅप्शन, घटनास्थळाचं दृश्य

पाकिस्तानच्या लाहोरमधील जौहर टाऊन भागात झालेल्या एका स्फोटात किमान दोन लोक मृत्यूमुखी पडली असून 14 जण जखमी झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

लाहोरचे आयुक्त कॅप्टन (निवृत्त) उस्मान युनिस यांनी दोन लोकांचा मृत्यू आणि 14 जण जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

उस्मान युनिस यांनी सांगितलं की, ज्या गल्लीत स्फोट झाला आहे, तिथे एक मोठा खड्डा पडला आहे. त्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त कार आणि बाइकही आहे.

स्फोटाची जागा पाहता हा आत्मघातकी हल्ला असल्याचं वाटत नसल्याचं युनिस यांनी म्हटलं.

घटनास्थळी ही स्फोटकं कारमधून आणण्यात आली की बाइकवरून आणली गेली हे अजून स्पष्ट नसल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पोलिसांच्या मते लाहोरमध्ये झालेल्या स्फोटाचं लक्ष्य जमात उद दावाचा प्रमुख हाफिझ सईदचं घर होतं.

पंजाब प्रांताचे पोलिस महासंचालक इनाम गनी यांनी सांगितलं की, हाफिझ सईदच्या घराजवळ सुरक्षा असल्यामुळे हल्लेखोर घरापर्यंत पोहोचू शकले नाहीत.

समा टीव्हीशी बोलताना लाहोरचे उपायुक्त मुदासिर रियाज यांनी सांगितलं की, स्फोटात अनेक महिला आणि मुलं जखमी झाले आहेत.

पाकिस्तानहून बीबीसीच्या प्रतिनिधी शुमायला जाफरी यांनी सांगितलं की, स्फोट लष्कर-ए-तैयबाचे संस्थापक आणि जमात उद दावाचे प्रमुख हाफिझ सईदच्या घराजवळ झाल्याची माहिती पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.

बीबीसीला एका अधिकाऱ्याने सांगितलं की, स्फोट जिथे झाला, तिथल्या एका घराचा वापर हाफिझ सईद करत होता. या घराकडे जाणाऱ्या चार रस्त्यांपैकी एका रस्त्यावर स्फोट झाला होता. या घराबाहेर नेहमी पोलिसांचा पहारा होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

हाफिझ सईदच्या सर्व घरं सरकारने ताब्यात घेतली आहेत आणि त्यावर दिवस-रात्र पोलिसांचा पहारा असतो.

बचावकार्य करणाऱ्या 1122 पथकाच्या प्रवक्त्याने पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, सिलेंडर फुटला की गॅसची पाइपलाइन फुटली हे अजून स्पष्ट झालं नाहीये. स्फोटाचं कारण अजून कळलं नाहीये.

हाफिज सईद कोण आहे?

हाफिज सईद लश्कर-ए-तोएबा या अतिरेकी संघटनेचा संस्थापक आहे. पाकिस्तानात तो जमात-उद-दावा ही समाजसेवी संघटनाही चालवतो.

हाफिझ सईद, पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हाफिझ सईद

2008 साली 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तो मास्टरमाईंड आहे असं म्हटलं जातं. या हल्ल्यात पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी 166 जणांना ठार केलं होतं. तर शेकडो लोक या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले होते.

हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने 'आंतरराष्ट्रीय दहशतवादी' घोषित केलं आहे. त्याच्यावर 1 कोटी डॉलर्सचं बक्षीसही ठेवण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळेच गेल्यावर्षी जुलै महिन्यात अतिरेकी कारवायांना निधी पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

हाफिज सईदला लाहोरमधल्या कडेकोट बंदोबस्त असलेल्या कोट लखपत कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)