नासाची मोठी कामगिरी, मंगळ ग्रहावर हेलिकॉप्टर उडवण्यात यश

नासा, इनजेनिटी

फोटो स्रोत, NASA

अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर एक छोटे हेलिकॉप्टर उडवण्यात यश मिळवले आहे.

इनजेनिटी नावाचे हे ड्रोन एका मिनिटापेक्षाही कमी काळ हवेत राहिले, पण हे एक मोठे यश असल्याचं नासाने सांगितलं आहे.

कारण जगात पहिल्यांदाच एखाद्या दुसऱ्या ग्रहावर विमानाद्वारा चालवले जाणारे आणि नियंत्रित केलेले पहिले उड्डाण होते. याची पुष्टी मंगळ ग्रहावरील एका उपग्रहाने केली. हेलिकॉप्टरचा डेटाही या उपग्रहाने पृथ्वीवर पाठवला.

आगामी काळात अशीच साहसी उड्डाणं पहायाला मिळतील असंही नासाने सांगितलं आहे.

अभियंत्यांनी या तंत्रज्ञानाचे अधिक संशोधन केल्यानंतर इनजेनिटीला अधिक उंचीवर उड्डाण करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही नासाने स्पष्ट केलं.

अमेरिकेतील पासाडेना येथील नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीतील इंजेनिटीचे प्रकल्प व्यवस्थापक मिमी आँग म्हणाले, "माणसाने दुसऱ्या ग्रहावर एक रोटरक्राफ्ट उडवले असं आपण आता म्हणू शकतो."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मंगळ ग्रहावर उड्डाण घेणे कठीण का आहे?

मंगळ ग्रहावर हवेत उड्डाण घेणे खूप कठीण आहे. कारण तिथल्या वातावरणाची कक्षा पृथ्वीच्या तुलनेत अत्यंत पातळ आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या केवळ एक टक्के आहे.

झेप घेण्यासाठी रोटरक्राफ्टच्या ब्लेडला खूप जोर लावावा लागतो. त्यामुळे इनजेनिटीचा अग्रभाग अतिशय हलका करून त्या ब्लेड्सना प्रति मिनिट 2,500 हून अधिक फिरण्याची क्षमता प्राप्त करण्यात आली.

व्हीडिओ कॅप्शन, Nasa Ingenuity: मंगळावर जेव्हा हेलिकॉप्टर उड्डाण घेतं

या यशामुळे दूरच्या जगाचा शोध घेण्याचा मार्ग बदलू शकतो अशी आशा नासाला आहे.

भविष्यातील रोव्हर्ससाठी ड्रोनचा उपयोग होऊ शकतो, तसंच मंगळ ग्रहावर पोहचल्यानंतर अंतराळवीरही त्याचा वापर करू शकतात.

नासाने यापूर्वीच शनी ग्रहाचे उपग्रह टायटनसाठी हेलिकॉप्टर मिशनसाठी मंजुरी दिली आहे.

या मोहिमेला 'ड्रॅगनफ्लाय' असे नाव देण्यात आले आहे. 2020 दशकाच्या मध्यात ते टायटनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)