कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आणखी दोन औषधांचा शोध

कोरोना, लस, औषध

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मिशेल रॉबर्टस्
    • Role, हेल्थ एडिटर, बीबीसी न्यूज

कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी आणखी दोन औषधांचा शोध लावण्यात आलाय. ही औषधं कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा एक चतुर्थांशाने कमी करू शकतात, असा दावा करण्यात आलाय.

टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब अशी या औषधांची नावं आहेत.

NHS च्या इंटेसिव्ह केअर यूनिट (ICU) मध्ये या लशींवर चाचणी करणाऱ्या संशोधकांनी सांगितलं की, हे औषध ड्रिपद्वारे दिल जाते आणि उपचार सुरू असलेल्या 12 पैकी एका कोरोनाग्रस्ताचा जीव वाचतो.

तज्ज्ञांच्या मते, "या औषधाचा पुरवठा ब्रिटनमधून आधीपासूनच झालाय. त्यामुळे या औषधाचा वापर तातडीने होऊ शकतो. जेणेकरून शेकडो जणांचे प्राण वाचू शकतात."

कोरोना, लस, औषध

फोटो स्रोत, Getty Images

ब्रिटनमधील हॉस्पिटलमध्ये 30 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. एप्रिल 2020 च्या तुलनेत हा आकडा 39 टक्क्यांनी अधिक आहे.

टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब ही औषधं कोरोनाग्रस्तांठी उपलब्ध व्हावेत, यासाठी ब्रिटन सरकार औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी सातत्याने संपर्कात आहे.

या औषधांमुळे कोरोनाग्रस्ताचा जीव वाचतोच, सोबत कोरोनामुक्तही लववकर होतो. गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णाला केवळ एका आठवड्यासाठीच ICU मध्ये ठेवण्याची आवश्यकता भासते.

एका आठवड्याच्या हॉस्पिटलच्या खर्चापेक्षाही कमी किंमत

ही दोन्ही औषधं एकसारखीच परिणामकारक आहेत. त्यातही एस्टेरॉयड डेक्सामेथासोनसोबत तर अधिक परिणामकारक ठरतात.

मात्र, ही औषधं अधिक स्वस्त नाहीत. 750 पाऊंड ते 1000 पाऊंड म्हणजे भारतीय रुपयात 69,784 रुपये ते 99,649 रुपयांच्या दरम्यान या औषधाची किंमत आहे. डेक्सामेथासोनच्या पाच पाऊंड (जवळपास 500 रुपये) च्या कोर्सपेक्षा अधिक आहे.

कोरोना, लस, औषध

फोटो स्रोत, Getty Images

तज्ज्ञांच्या मते, हॉस्पिटलच्या दरदिवशीच्या खर्चापेक्षा या औषधांची किंमत कमीच आहे. हा खर्च ब्रिटनमधील ग्राह्य धरण्यात आलाय. कारण तिथं हॉस्पिटलचा प्रत्येक दिवशीचा खर्चा 2000 पाऊंड म्हणजेच जवळपास दोन लाखांवर जातो.

मुख्य संशोधक आणि लंडनमधील एम्पीरियल कॉलेजचे प्रो. अँथनी गॉर्डोन यांनी सांगितल्यानुसार, "प्रत्येक 12 रुग्ण जे या औषधामुळे वाचतील, ते एक आयुष्य वाचवलीत. हे औषध परिणामकारक आहे."

ब्रिटनसह सहा वेगवेगळ्या देशांमधील ICU तील जवळपास 800 रुग्णांवर रिमॅप-कॅप चाचणी घेण्यात आली. स्टँडर्ड केअरमध्ये ठेवण्यात आलेल्या जवळपास 36 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला.

ICU मध्ये भरती झाल्यानंतर 24 तासांच्या हे औषध दिल्यानं रुग्णांचा मृत्यूदर एक चतुर्थांशानं 27 टक्के कमी झालं.

NHS च्या नॅशनल मेडिकल डायरेक्टर प्रो. स्टीफन पॉविस यांनी सांगितलं, "कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी नवं औषध आल्याचा आनंद आहे आणि कोरोनाविरोधातल्या लढाईतलं हे सकारात्मक पाऊल आहे."

ब्रिटन सरकारकडून निर्यातीवर स्थगिती

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट बॅट हॅनकॉक यांनी म्हटलं की, "ब्रिटनने वेळोवेळी सिद्ध केलंय आणि पुन्हा सिद्ध झालंय की, रुग्णांसाठी आशादायक आहे."

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, या औषधांचा धोकाही आहे. विशेषत: कोरोनाग्रस्तांना अधिक प्रमाणात हे औषध दिल्या फुफ्फुस आणि शरीराच्या इतर अवयवांना त्रास होऊ शकतो.

डॉक्टरांना हे औषध त्याच रुग्णांना देण्याची शिफारस केली आहे, जे रुग्ण डेक्सामेथासोन दिल्यानंतरही गंभीर स्थितीत आहेत आणि ज्यांची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

टोसीलिजुमॅब आणि सरीलूमॅब या दोन्ही औषधांच्या निर्यातीवर मात्र ब्रिटन सरकारनं स्थगिती आणलीय.

औषधांबाबतचं संशोधन अद्याप रिव्ह्यू केलं गेलं नाहीय आणि कुठल्या जर्नलमध्येही प्रकाशित केलं गेलं नाहीय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)