काबुलमध्ये रहिवासी भागात रॉकेट हल्ला, 8 जणांचा मृत्यू

रॉकेट हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिका-तालिबान चर्चेआधी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रॉकेट हल्ला झाला आहे. यात कमीत कमी 8 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत.

शनिवारी (21 नोव्हेंबर) सकाळी काबूलच्या एका रहिवाशी भागात दोन कारमधून जवळपास 20 मॉर्टर्स डागण्यात आले. या हल्ल्यात अनेक इमारती आणि कारचं नुकसान झालं. मात्र, आपण हे हल्ले केले नसल्याचं तालिबानचं म्हणणं आहे.

तालिबानसोबत शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो दोहामध्ये तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच ट्रम्प प्रशासनाने जानेवारीच्या मध्यापर्यंत अफगाणिस्तानातून 2000 अमेरिकी जवानांना माघारी बोलावलं जाईल, अशी घोषणा केली होती.

अफगाणिस्तान हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, एवढ्या घाईने अमेरिकी जवानांना माघारी बोलावल्यास तालिबान आणि इतर कट्टरपंथी घटकांचा सामना करण्याची अफगाणिस्तान सरकारची क्षमता कमी होऊन त्यांच्या अडचणीत वाढ होईल, असं म्हणत अमेरिकेच्या या निर्णयावर टीका करण्यात आली होती.

परकीय सैन्य माघारी गेल्यानंतर स्वतःच्या बळावर तालिबान किंवा इतर कट्टरतावाद्यांचा मुकाबला करण्याइतपत अफगाणिस्तान सैन्य मजबूत नसल्याचं अनेक जाणकारांना वाटतं.

तालिबाननं नाकारली हल्ल्याची जबाबदारी

शनिवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात परकीय दूतावास आणि काही आंतरराष्ट्रीय कंपन्या असणाऱ्या काबुलच्या मध्यवर्ती आणि उत्तरेकडच्या भागांना लक्ष्य करण्यात आलं.

मॉर्टरचे काही भाग आपल्या परिसरातही पडले. मात्र, कुणालाही इजा झाली नसल्याचं इराणच्या दूतावासाने सांगितलं आहे.

काबुल हल्ला

फोटो स्रोत, Reuters

तालिबानने हल्ल्याची जबाबदारी नाकारल्यानंतर एका स्थानिक कट्टर इस्लामिक गटाने हा हल्ला केला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.

गेल्या काही दिवसात काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी या इस्लामिक गटाने स्वीकारली होती. काही दिवसांपूर्वी याच गटाने एका शैक्षणिक संस्थेवर हल्ला केला होता. त्यात 50 जणांचा मृत्यू झाला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)