अफगाणिस्तान, इराकमध्ये अमेरिकेची सैन्य कपात, डोनाल्ड ट्रंप यांना रिपब्लिकन पक्षातूनच विरोध

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका येणाऱ्या काळात अफगाणिस्तान आणि इराकमध्ये लढत असलेल्या सैन्यातील 2500 जवानांना माघारी बोलावणार आहे. अमेरिकन सरकारने या वृत्ताला दुजोरा दिलाय.
अमेरिकेतील वरिष्ठ रिपब्लिकन नेत्यांनी अफगाणिस्तान आणि इराकमधून सैन्याला परत बोलावण्याचा सरकारचा प्रस्ताव धोक्याचा असल्याची सूचना केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सैन्याला मायदेशी बोलावण्याचं नेहमीच समर्थन केलंय. तर, परदेशात अमेरिकन सैन्याच्या कारवाईला त्यांचा विरोध आहे.
पण, डोनाल्ड ट्रंप यांचे खंदे समर्थक असलेले मिच मॅकोनेल, यांनी सरकारचा हा प्रस्ताव म्हणजे मोठी 'चूक' असल्याचं वक्तव्य केलं आहे.
व्हाईट हाऊस सोडताना, राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सुरक्षा आणि परराष्ट्र धोराणांसंदर्भात काही मोठे निर्णय घेऊ नयेत अशी सूचना त्यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणतात, "अफगाणिस्तानत आजवर सुरू असलेलं सर्वांत मोठ युद्ध आता नकोसं झालं आहे."
"या युद्धाला आता मोठ्या जबाबदारीने पूर्णविराम देण्याची गरज आहे. पण, असं करताना दोन्ही देशांना संभावित धोका आणि सुरक्षेचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. जेणेकरून आपल्याला पुन्हा तिथं जावं लागणार नाही."
इराकमध्ये सद्यस्थितीत लढणाऱ्या अमेरिकन सैन्यात 500 ने कपात करून 2500 जवान ठेवण्यात येतील. तर, अफगाणिस्तानमध्ये असलेल्या जवानांची संख्या 2000 ने कमी होऊन 4,500 वरून 2,500 करण्यात येणार आहे.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री क्रिस मिलर यांच्या सांगण्यानुसार, यावरून असं दिसून येतं की "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप अफगाणिस्तान आणि इराकमधील युद्ध जबाबदारीच्या मार्गाने यशस्वीरित्या थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून अमेरिकेच्या जवानांना पुन्हा मायदेशी बोलावता येईल."
अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकी सैन्य
साल 2001 पासून अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानात तैनात आहे. 11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेत अल-कायदाने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानात लपून बसलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना हुसकावून लावलं.
2018 मध्ये तालिबान पुन्हा एकदा सक्रीय झालंय. अफगाणीस्तानातील दोन तृतीयांश भागात आताच्या घडीला तालिबानी सक्रीय आहेत.
रिपब्लिकन नेत्यांना का आहे चिंता?
मिच मॅकोनेल यांच्यासोबतच अनेक रिपब्लिकन नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. टेक्सासचे रिपब्लिन नेते मॅक थॉर्नबेरी यांनी देखील सरकारचा हा प्रस्ताव म्हणजे 'चूक' असल्याचं सांगितलं आहे. सैन्य कपातीच्या निर्णयामुळे चर्चा थांबेल. अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेलं युद्ध संपण्यासाठी ही चर्चा फार महत्त्वाची आहे.
नाटोचे सरचिटणीस जेन स्टॉल्टर्नबर्ग सांगतात, "इतक्या लवकर आणि चुकीच्या पद्धतीने बाहेर पडण्याची खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते."
अफगाणिस्तान पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा अड्डा बनण्याची शक्यता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
डेमोक्रॅटिक नेते काय म्हणतात?
एका डेमोक्रॅटिक नेत्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रस्तावाचं समर्थन केलं आहे. हाऊस आर्म्ड सर्व्हिस कमिटीचे प्रमुख अॅडम स्मिथ म्हणतात, "हा प्रस्ताव म्हणजे अत्यंत चांगलं धोरण आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








