पेशावर येथील मदरशात स्फोट, 7 ठार 70 हून अधिक जखमी

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानातील पेशावर येथील एका मदरशामध्ये झालेल्या स्फोटात किमान सात जण दगावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटात 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
हल्ला पाकिस्तानमधल्या खैबर-पख्तुनवा प्रांतातल्या दिर कॉलनीतली स्पिन जमात मशीद आणि मदरशामध्ये झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोट झाला तेव्हा सकाळी आठ वाजता मदरशामध्ये अभ्यास सुरू होता.
या स्फोटात लहान मुलं ठार झाले असण्याची शक्यता आहे, असं रॉयटर्सला एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारली नाही.
"कुणीतरी मदरशामध्ये एक बॅग नेली आणि तिथेच ठेवली असा अंदाज आहे," अशी माहिती पोलीस अधिकारी वकार अझीम यांनी एएफपीला दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. "पेशावरमधील मदरशावर झालेल्या हल्ल्याने मला तीव्र दुःख झालं आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रति मी सद्भावना व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. या भ्याड, पाशवी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा योग्य तो न्यायनिवाडा करू याची मी देशाला हमी देतो", असं इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
खैबर पख्तुनवा प्रांताचे अर्थमंत्री तैमूर झगडा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी निवेदन प्रसिद्ध करून सांगितलं की, रुग्णालयात आतापर्यंत 50 जखमी आणि 5 मृतांना आणण्यात आलं आहे. बहुतांश जणांच्या शरीरावर भाजल्याच्या खुणा आहेत.
पेशावर शहर अफगाणिस्तानला लागून आहे. तालिबानी बंडाच्या वेळेस गेल्या काही वर्षांत इथे हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या.
सहा वर्षांपूर्वी बंदूकधारी हल्लेखोरांनी मिलिट्री स्कूलवर हल्ला केला होता त्यात 150 मुलांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








