कोरोना व्हायरसः लहान मुलांकडून कोरोनाचा प्रसार होतो का?

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेचल स्क्रेईर
    • Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

लहान मुलांच्या नाकात कोरोना व्हायरस तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतो, असं दक्षिण कोरियामध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात समोर आलं आहे.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सुरुवातीला लहान मुलांना कोरोनाची बाधा कमी प्रमाणात होत असल्याचं आढळून आलं होतं. त्यावेळी लहान मुलांमध्ये प्रामुख्याने सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणं सापडली. तसंच अनेक लहान मुलं ही लक्षणविरहीत असल्याचंही आढळून आलं.

पण या अहवालानानंतर आतापर्यंत अनुत्तरित असलेले काही प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं दिसून येत आहे.

रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थचे चेअरमन प्रा. रसेन वाईनर यांनी मुलांच्या कोरोना संसर्गाशी संबंधित खालील तीन प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केली आहेत.

  • लहान मुलांना कोरोनाची लागण होते का?
  • त्यांच्यातील कोरोना संसर्ग किती गंभीर असतो?
  • लहान मुलांकडून कोरोनाचा प्रसार होतो का?

लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते, हे आपल्याला माहीत आहे. पण अँटीबॉडीसाठी करण्यात आलेल्या रक्तचाचण्यांच्या माहितीनुसार, 12 वर्षांखालील मुलांच्या तुलनेत प्रौढ व्यक्तींना या कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे.

कोरोना
लाईन

तसंच व्हायरसची लागण झाल्यानंतर प्रौढ व्यक्तींपेक्षा लहान मुलांची आजारी पडण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती ब्रिटीश स्टडी या नियतकालिकामध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाली होती.

तिसऱ्या प्रश्नाबाबत आपल्याकडे अंत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. दक्षिण कोरियाच्या सर्व्हेमध्ये या प्रश्नाचंच उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दक्षिण कोरियाचं संशोधन नेमकं काय?

या संशोधनात 91 मुलांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये सौम्य लक्षणं असलेल्या किंवा लक्षणं नसलेल्या मुलांमध्येसुद्धा विषाणू आढळून येऊ शकतो. या मुलांच्या स्वॅबमध्ये विषाणू तीन आठवड्यांपर्यंत सापडू शकतो, असं समोर आलं.

विशेष म्हणजे, लहान मुलांच्या नाकात हा व्हायरस दीर्घकाळ राहतो. त्यामुळे याचा संसर्ग लहान मुलांकडून इतरांना होऊ शकतो.

कोरोना साथ सुरु झाल्यानंतर दक्षिण कोरियाच्या चाचणी करण्याच्या पद्धतीचं कौतुक झालं होतं. त्यावेळी दक्षिण कोरियाने ज्या पद्धतीने चाचणी केली, लक्षणं दिसत नसतानाही विषाणूचा शोध घेऊन अलगीकरण केलं, या पद्धतीने लक्ष वेधून घेतलं होतं.

एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर लोकांचं अलगीकरण करण्यात आलं. त्यानंतर चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत त्यांची सातत्याने चाचणी घेण्यात आली.

या अभ्यासामुळे मुलांकडून होणारा विषाणूचा प्रसार तसंच त्याबाबतची संभाव्य क्षमता यांच्याबाबत नवी माहिती प्राप्त होण्यासाठी मदत झाली.

पण इतर संशोधनांप्रमाणेच या अभ्यासावरही अनेक प्रश्नचिन्ह आहेत.

फक्त मुलांच्या नाकात व्हायरस सापडल्यामुळे ते प्रौढांप्रमाणेच कोरोना पसरवत असल्याचं सिद्ध होत नाही.

डॉ. रॉबर्ट देबायसी, वॉशिंग्टनमधील चिल्ड्रन्स नॅशनल हॉस्पिटलमध्ये प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांच्या मते, "मुलांमध्ये व्हायरस अधिक काळ राहत असला तरी त्यांच्याकडून कोरोनाचा प्रसार होतच नाही, असं म्हणणं अतार्किक ठरू शकतं."

पण युनिव्हर्सिटी ऑफ चाईल्ड हेल्थचे प्राध्यापक कॅल्कम सेंपल हे सांगतात, "फक्त स्वॅबमध्ये विषाणूची उपस्थिती ही संसर्गासाठी पुरेशी नाही. विशेषतः लक्षणं नसलेल्या लोकांमधून संसर्ग पसरण्याची कमी शक्यता आहे.

मग या अभ्यासाचा निष्कर्ष काय?

साधारणपणे लक्षणं नसलेल्या मुलांकडून आणि इतर व्यक्तींकडून विषाणू हवेत पसरत नाही, असं निदर्शनास आलं आहे. खोकला येत नसलेल्या लोकांकडून व्हायरस हवेत जाणारच नाही. त्यामुळे अशा लोकांकडून आजार पसरण्याचा धोका कमी आहे.

पण लक्षणं नसलेल्या लोकांमुळे संसर्गाच्या प्रमाणात वाढही होऊ शकते, हे विसरून चालणार नाही.

प्रा. वाईनर यांनी म्हटल्याप्रमाणे शाळा बंद ठेवणं तटस्थ मुद्दा राहिलेला नाही. उलट त्यामुळे धोक्याचं गांभीर्य लक्षात येईल. मुलांचं शिक्षण आणि मानसिक आरोग्यासाठी ते धोक्याचं आहे.

मुलांना शाळेत पाठवल्यामुळे निर्माण होणारा धोका किती मोठा असेल, हा प्रश्न तर समोर आहेच. पण भविष्यातील उद्रेकावर नियंत्रण मिळवण्यासाठी पावलं उचलणं आवश्यक आहे.

डॉ. रॉबर्ट देबायसी यांच्या मते, मुलांमधील कोरोनाचा संसर्ग हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. सौम्य लक्षणं असलेल्या मुलांची ओळख पटवली नाही तर ते आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)