महिलांना टॉपलेस राहू नका, कपडे घाला असं सांगणं चुकीचं

फ्रान्स, सनबाथ, टॉपलेस
फोटो कॅप्शन, टॉपलेस सनबाथ

महिलांना टॉपलेस राहू नका, कपडे घाला असं सांगणं चुकीचं असल्याचं फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डर्मानिन यांनी म्हटलं आहे.

फ्रान्समध्ये महिलांच्या टॉपलेस असण्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. वाद वाढल्याने फ्रान्सच्या गृहमंत्र्यांना याप्रकरणी हस्तक्षेप करून भूमिका मांडावी लागली.

गेल्या आठवड्यात सेंट मैरी-ला-मेर समुद्र किनाऱ्यावर तीन महिला टॉपलेस स्थितीत सनबाथ अर्थात सूर्यस्नान घेत होत्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना टॉपलेस न राहण्याविषयी म्हणजेच शरीराच्या वरच्या भागाचे कपडे परिधान करण्यास सांगितलं.

एका कुटुंबांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या टॉपलेस महिलांना कपडे परिधान करण्याची सूचना केली.

याप्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका झाली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यावरून खल सुरू झाला. अखेर गृहमंत्री यांनी महिलांच्या समर्थनार्थ बाजू घेतली. टॉपलेस स्थितीतील महिलांना कपडे घालण्यासंदर्भात सूचना करणं चुकीचं असल्याचं फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

कोरोना

मंत्री जेराल्ड डर्मेन यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की स्वातंत्र्य ही एक मौलिक गोष्ट आहे.

नेमकं काय घडलं होतं?

फ्रान्सच्या पाइरेनीस-ओरिएंटाल पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रेस रिलीज देत नेमकं काय घडलं हे स्पष्ट केलं आहे.

समुद्रकिनाऱ्यावर एक कुटुंब होतं, यामध्ये तीन मुलांचाही समावेश होता. त्यांनी पोलिसांना टॉपलेस महिलांविषयी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी टॉपलेस महिलांना शरीराचा वरचा भाग झाकेल असे कपडे घालण्याची सूचना केली.

हे प्रकरण वाढू नये याउद्देशाने पोलिसांनी कुटुंबीयांच्या सांगण्यावरून महिलांना शरीराच्या वरच्या भागाचे कपडे परिधान करण्याची सूचना केली.

म्युनिसिपल कायद्यान्वये सेंट-मैरी-ला-मेर समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस स्थितीत सनबाथ घेण्यास कोणीही रोखू शकत नाही.

पोलिसांनी अशी भूमिका घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

पोलीस प्रवक्ते ले.कर्नल मैडी श्यरर यांच्या मते दोन पोलिसांच्या विनाकारण सूचनांमुळे हे प्रकरण वाढीस लागल्याचं सांगितलं.

त्यांनी लिहिलं की तुम्हाला मी नेहमी पोलिसांच्या गणवेशात दिसेन मात्र सेंट-मरी-ला-मेर समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस राहून सनबाथ घेण्यास अनुमती आहे.

गृहमंत्री जेराल्ड डर्मेन यांनीही महिलांना कपडे परिधान करण्यास सांगणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

प्रशासनाला आपली चूक लक्षात आल्यानंतर ती मान्य करणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

फ्रान्स, सनबाथ, टॉपलेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टॉपलेस सनबाथ

फ्रान्समध्ये टॉपलेस स्थितीत सनबाथ घेण्यावर कोणतीही बंदी नाही मात्र स्थानिक प्रशासन हे रोखून कपड्यांसंदर्भात सूचना जारी करू शकतात.

गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, आधीच्या तुलनेत फ्रान्समध्ये टॉपलेस सनबाथ घेण्याचं प्रमाण युरोपातील अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

विए हेल्दीच्या सर्व्हेनुसार, फ्रान्समधील 22 टक्के महिलांनी टॉपलेस स्थितीत सनबाथ घेतल्याचं सांगितलं. स्पेनमध्ये 48 तर जर्मनीत 34 टक्के महिलांनी टॉपलेस सनबाथ घेतल्याचं सांगितलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)