डोनाल्ड ट्रंप यांच्या ‘प्रक्षोभक’ पोस्टवर मार्क झुकरबर्ग कारवाई करायला घाबरतायत का?

मार्क झकरबर्ग

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, झोई क्लाइन्मन
    • Role, बीबीसी तंत्रज्ञान प्रतिनिधी

डोनाल्ड ट्रंप यांच्या फेसबुकवरील काही वादग्रस्त पोस्ट्सवर काहीही कारवाई न केल्यावरून मार्क झुकरबर्ग यांच्यावर सर्वत्र टीका होते आहे. अगदी त्यांच्या कंपनीतूनसुद्धा. आणि सध्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येवरून पेटलेल्या अमेरिकेत मार्क झुकरबर्ग एक धोकादायक पायंडा पाडत असल्याचा इशारा नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या गटांनी दिलाय.

यानंतर त्यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याशी व्हीडिओ कॉलवरून संवादही साधला.

जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन-अमेरिकन नागरिकाच्या मृत्यूनंतर उसळलेल्या आंदोलनांबाबत डोनाल्ड ट्रंप यांनी सोशल मीडियावरून केलेली पोस्ट वादग्रस्त ठरते आहेत.

"हिंसाचार मोडून काढण्यासाठी आपण नॅशनल गार्ड पाठवू आणि लुटालूट सुरू झाल्यास गोळीबारही सुरू होईल," (When the looting starts, the shooting starts), अशा आशयाचा मजकूर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी पोस्ट केला होता.

ट्रंप यांनी केलेलं हे ट्वीट हिंसाचाराचं उदात्तीकरण करत असल्याचं म्हणत ट्विटरने त्यावर वैधानिक इशारा देणारी सूचना लावली होती. त्यानंतर ट्रंप यांनी हाच मजकूर फेसबुकवरही पोस्ट केला होता. पण फेसबुकने त्याबाबत असा कोणताही इशारा दिला नाही.

ट्विटरने त्यांच्या या ट्वीटवर 'वॉर्निंग' लावल्यानंतर त्याविषयी चर्चा झाली आणि नंतर ट्विटर आणि व्हाईट हाऊसमधला तणाव वाढला.

याबाबत फेसबुकच्या काही कर्मचाऱ्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली तर काहींनी 'व्हर्च्युअल वॉकआऊट' केला. मात्र ट्रंप यांनी वापरलेले काही शब्द आपल्याला पटत नसले, तर "लोकांना स्वतःचं मत ठरवता यावं यासाठी हा मजकूर पाहता यायला हवा," असं म्हणत झुकरबर्ग यांनी ही पोस्ट फेसबुकवर राहू देण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं होतं.

पण त्यांचं हे म्हणणं चुकीचं असल्याचं नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या तीन नेत्यांचं म्हणणं आहे.

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

लीडरशिप कॉन्फरन्स ऑन सिव्हिल अँड ह्युमन राईट्सच्या अध्यक्ष वनिता गुप्ता, NAACP लीगल डिफेन्स अँड एज्युकेशनल फंडच्या संचालक शेरीलिन आयफिल, आणि कलर ऑफ चेंज संस्थेचे अध्यक्ष रशद रॉबिन्सन या तिघांनी सोमवारी एक संयुक्त पत्रक प्रसिद्ध केलं.

"ट्रंप यांच्या पोस्ट राहू देण्यामागचं मार्क यांचं स्पष्टीकरण न पटणारं आहे. आमची निराशा झाली आहे," एका संयुक्त निवेदनात या नेत्यांनी म्हटलं.

"मतदारांची इतिहासात झालेली वा आता होणारी दडपशाही त्यांना समजत असल्याचं वाटत नाही आणि फेसबुकमुळे ट्रंप यांच्या आंदोलकांवरच्या हिंसाचाराच्या आवाहनाला कसं खतपाणी मिळतंय, हे मान्य करायलाही झकरबर्ग तयार नाहीत. फेसबुकवर अशाच प्रकारच्या गोष्टी बोलणाऱ्यांकडे पाहता, हा धोकादायक पायंडा पाडला जातोय."

फेसबुकच्या कर्मचाऱ्यांसोबतच्या एका व्हर्च्युअल प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये झुकरबर्ग यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलंय. हा 'कठीण निर्णय' असला तरी मुक्तपणे विचार मांडता येणं हे फेसबुकचं तत्त्वं असल्याने राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची पोस्ट राहू देणं 'हाच योग्य पर्याय' होता, असं झकरबर्ग यांनी म्हटल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलंय.

तर फेसबुकने याच्या विरुद्ध पावलं उचलली तर रिपब्लिकन काय करतील, या भीतीपोटी झकरबर्ग असं करत असल्याचा काही कर्मचाऱ्यांचा दावा असल्याचंही या वर्तमानपत्राने म्हटलंय.

इतर कंपन्यांची प्रतिक्रिया

जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येचा निषेध आणि कृष्णवर्णीयांना देण्यात येणारी वागणूक, याचा निषेध करण्यासाठी अमेरिकेच्या अनेक शहरांत लोक रस्त्यावर उतरले आहेत. टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

सगळ्या वर्णाच्या लोकांबाबत समानता पाळण्यात यायला हवी, या कृष्णवर्णीय समाजाला आपला पाठिंबा असून जॉर्ज फ्लॉईड आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या स्मरणार्थ गुगलने त्यांच्या अमेरिकेसाठीच्या गुगल आणि युट्यूब होम पेजवर काळी रिबीन लावली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

तर टेस्ला आणि स्पेसएक्स कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क यांनीही ट्वीट करत जॉर्ज यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

तर सध्याच्या या परिस्थितीत वर्णद्वेषाच्या विरोधात आपण एकमेकांसाठी उभं राहण्याची गरज असल्याचं अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हटलंय.

अमेरिकेतल्या अनेक मोठ्या ब्रँड्सनी 'ब्लॅकआऊट ट्यूसडे' पाळत सध्या सुरू असलेल्या 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' (Black Lives Matter) आंदोलनांना पाठिंबा दर्शवला.

गप्प राहणं म्हणजे पाठिंबा दर्शवणं असल्यासारखं आहे, असं नेटफ्लिक्सने ट्वीट केलं.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

तर डिस्ने, अॅमेझॉन, अॅपल, हुलू, HBO या कंपन्यांनीही या ब्लॅक लाईव्हज मॅटर आंदोलनांना पाठिंबा दिलेला आहे.

हे पाहिलंत का

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)