Harbin Ice Festival: बर्फाचा राजमहाल, गगनचुंबी इमारती आणि रेल्वे
दरवर्षीप्रमाणे चीनमध्ये The Harbin International Ice and Snow Sculpture Festival चं आयोजन करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, AFP
रविवारी (5 जानेवारी) आतषबाजीसह मोठ्या उत्साहात या फेस्टिव्हलला सुरुवात झाली.

फोटो स्रोत, Getty Images
चीनच्या ईशान्य भागातील हेलाँगजांग प्रांतात दरवर्षी भरणारा हा महोत्सव जगातील सर्वांत मोठ्या आइस अँड स्नो फेस्टिवलपैकी एक आहे.

फोटो स्रोत, Reuters
बर्फाचं हे गारेगार जग निर्माण करण्यासाठी 2 लाख 20 हजार क्युबिक मीटर बर्फ वापरण्यात आला.

फोटो स्रोत, AFP
बर्फापासून तयार केलेल्या या भव्य-दिव्य इमारती पाहताना येणारे लोक हरखून जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या महोत्सवात बर्फापासून बनवलेली रेल्वेही आहे.

फोटो स्रोत, Reuters
36वा हार्बिन आईस फेस्टिव्हलला 1963 साली सुरू झाला. मात्र चीनमधील सांस्कृतिक क्रांतीमुळे तो मध्येच थांबवावा लागला. त्यानंतर थेट 1985 सालीच हा महोत्सव पुन्हा सुरू झाला.

फोटो स्रोत, Reuters
बर्फाच्या भव्य समीकरणांसोबतच फेस्टिव्हलला येणारे लोक स्लेजिंग, आइस हॉकी, आइस फुटबॉल, स्पीड स्केटिंग, स्कीइंग अशा वेगवेगळ्या खेळांचाही आनंद घेता येत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बर्फ ही थीम वापरून झालेला सामुदायिक विवाह सोहळा या फेस्टिव्हलचं आकर्षण ठरला. यावर्षी जवळपास 40 जोडप्यांनी या फेस्टिव्हलमध्ये लग्न केलं.

फोटो स्रोत, EPA
हार्बिन आईस फेस्टिव्हल 25 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालेल.

फोटो स्रोत, AFP
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








