iPhone 11: ट्रायफोबिया म्हणजे काय? काही लोकांना नव्या आयफोनच्या कॅमेऱ्याकडे पाहून त्रास का होतोय?

iphone 11

फोटो स्रोत, APPLE

"अनेक लोकांना वाटतं की डिझाईन म्हणजे एखादी वस्तू कशी दिसते, एवढंच. पण आम्हाला वाटतं डिझाईन म्हणजे, एखादी वस्तू कशी दिसते, एवढंच नसून ती वस्तू त्या डिझाईनमुळे कशी काम करते, याला खरं महत्त्व आहे."

अॅपलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या या शब्दांचा अॅपलला विसर पडला की काय, असा प्रश्न अनेक जणांना पडला असेल. कारण आहे त्यांचे नवीन आयफोन.

दरवर्षी नवीन आयफोन आला की त्यात कोणकोणते फिचर्स असतील, याबद्दल कुतूहल असतं आणि ते जाहीर झाल्यावर कौतुकही तितकंच होतं. यंदा मात्र तसं फारसं होताना दिसत नाहीय.

आयफोन-11च्या तीन कॅमेऱ्यांनी अगदी भारी फोटो निघतील, याबाबत शंकाच नाही. पण त्याच्या रचनेवर सर्वच लोक एकसारखे व्यक्त होतायत, असं नाही.

कारण आयफोनवर ज्याप्रमाणे तीन कॅमेऱ्यांची रचना करण्यात आली आहे, ती पाहून काही लोकांना त्रास होऊ शकतो. या त्रासाला 'ट्रायफोबिया' असं म्हटलं जातं.

छोट्याछोट्या आकाराच्या समूहाकडे पाहिल्यावर काही लोकांना त्रास होऊ शकतो. त्याला ट्रायफोबिया असं म्हटलं जातं. विशेषतः छिद्रं किंवा लहान आयताकृतींच्या समूहाकडे पाहिल्यावरही असा त्रास होऊ शकतो.

ट्रायफोबियाचं उत्तम उदाहरण म्हणजे कमळाच्या फुलांमधील छिद्रांमध्ये असलेल्या बियांकडे पाहाताना मनात येणारी भावना. तसंच मधमाश्यांनी केलेल्या पोळ्याची रचना आणि समुद्री स्पंजकडे पाहातानाही असंच वाटतं.

iphone 11

फोटो स्रोत, Getty Images

या आकृतीबंधांकडे पाहिल्यावर जी प्रतिक्रिया दिली जाते ती संरक्षणात्मक भावनेतून आलेली असते, असं मत एसेक्स विद्यापीठातील प्राध्यापक आर्नोल्ड विल्किन्स आणि डॉ. जेफ कोल यांनी व्यक्त केलं आहे.

मनुष्यासाठी प्राणघातक ठरतील अशा काही कोळ्यांच्या, सापांच्या, विंचवाच्या अंगावर अशाच प्रकारचे आकृतीबंध असतात. त्यामुळे त्यांच्या भीतीतून आलेली भावनाच अशा आकृतीबंधांकडे पाहिल्यावर तिरस्कारातून व्यक्त होत असावी.

अर्थात हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध करता येत नसलं तरी अशाप्रकारचा फोबिया नक्कीच आहे.

हाच प्रकार आयफोनच्या नव्या मॉडेलमधील कॅमेऱ्यांच्या रचनेकडे पाहून होतो. आयफोन 11, आयफोन 11 प्रो, आयफोन 11 प्रो मॅक्स यामध्ये असलेल्या कॅमेऱ्यांमुळे एकाचवेळी अनेक व्हीडिओ रेकॉर्ड करता येतात.

अॅपल

फोटो स्रोत, Getty Images

प्रो मॉडेल्समध्ये टेलिफोटो, वाईड आणि अल्ट्रावाईड कॅमेऱ्यांची सोय आहे. त्याचप्रमाणे रात्री फोटो काढण्यासाठी नाईटमोडची सोयसुद्धा आहे. पण या कॅमेऱ्याकडे पाहून काही लोकांना उलटी येणं, चक्कर येणं असे त्रास होऊ शकतात. हा फोन न घेण्याच्या कारणांमध्ये हे एक कारण असू शकतं.

या फोनच्या मागे पाहिल्यावर नुसते कॅमेरेच दिसतात, असं मत एका व्यक्तीनं ट्विटरवर व्यक्त केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

आयफोन 8 आणि XRमध्ये केवळ एकच कॅमेरा आहे. त्यामध्ये असा कोणताही विचित्र आकृतीबंध नाही. पण आयफोन11 मधील या तिन कॅमेऱ्यांच्या आकृतीबंधामुळे ट्रायफोबिया असणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

डॉ. जेफ कोल बीबीसीशी बोलतना म्हणाले, "ट्रायफोबिया आपल्यापैकी कमी-अधिक प्रमाणात असतोच. एखादा आकृतीबंध पाहिल्यावर आपल्या प्रतिक्रियेवरून त्याचं प्रमाण किती आहे ते समजतं."

सध्या मात्र आयफोनच्या बातम्या आणि त्यावरून तयार झालेल्या मिम्सपासून सूटका नाही. ट्रायफोबियामुळे त्रास होऊ शकतो असे फोटो आणि ट्रायफोबिया हा शब्द ट्वीटरवर अनेकदा वापरल्याचं दिसून येईल.

अमेरिकन अभिनेत्री साहा पॉलसन आणि मॉडेल केंडल जेन्नर यांनी आपल्याला ट्रायफोबिया असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)