टेक्सास पाठोपाठ ओहायोमध्ये गोळीबार, एकूण 29 लोक मृत्युमुखी

अमेरिका, टेक्सास, गोळीबार

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, गोळीबारानंतरचे दृश्य

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमधल्या एल पासो परिसरात विस्ता मॉलमध्ये हा प्रकार घडला. अमेरिका आणि मेक्सिको सीमेपासून हे ठिकाण अगदी जवळच आहे.

या गोळीबारात 22 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी या व्यक्तीचं नाव पॅट्रिक क्रुसियस असं सांगितलं आहे. तो डलास भागात राहतो असं सांगण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये मॉलमध्ये एक बंदुकधारी व्यक्ती शिरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

टेक्सासपाठोपाठ ओहायो राज्यातील डेटन येथेही गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ओहायोतील गोळीबारामध्ये नऊ जणांचे प्राण गेले आहेत. तर 16 लोक जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अमेरिका, टेक्सास, गोळीबार

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, सीसीटीव्हीत गोळीबार करणारा माणूस दिसत आहे.

टेक्सासमधील घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी अकरा वाजता घडली.

अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र विस्ता मॉल आणि वॉलमार्ट मॉलमध्ये गोळीबार झाला आहे असं पोलिसांनी सांगितलं.

अमेरिका, टेक्सास, गोळीबार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सार्जंट रॉबर्ट गोमेझ यांनी पत्रकारांना घटनेची माहिती दिली.

एल पासोचे महापौर डी.मार्गो यांनी या घटनेप्रती शोक व्यक्त केला आहे. "एल पासोत अशा स्वरुपाची घटना घडू शकते यावर आमचा विश्वास नाही. आम्हाला अतीव दु:ख झालं आहे", अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही ट्वीटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

या घृणास्पद कृत्याने मी नि:शब्द झालो आहे अशा शब्दात टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी निषेध व्यक्त केला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)