ही बुरशी ठरणार डासांचा कर्दनकाळ, 99% मलेरियाचे डास मारण्याचा प्रयोग यशस्वी

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Science Photo Library

    • Author, जेम्स गॅल्लाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांचा वेगानं नायनाट करू शकेल, अशी बुरशी निदर्शनास आल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

यासाठीचा एक प्रयोग बर्किना फॅसोमध्ये करण्यात आला.

त्यात दिसून आलं की, 45 दिवसांत 99 टक्के मलेरियाच्या डासांना मारण्यात आलं आहे.

"मलेरियाच्या डासांना कायस्वरूपी संपवणं आमचा उद्देश नसून मलेरियाचा प्रसार थांबवणं हा आहे," असं संशोधकांचं म्हणणं आहे.

मादी डास रक्त पिते, तेव्हा मलेरिया पसरतो. मलेरियामुळे दरवर्षी 4 लाख जण मृत्युमुखी पडतात.

जगभरात दरवर्षी मलेरियाची जवळपास 219 दशलक्ष प्रकरणं समोर येतात.

US मधील University of Maryland आणि बर्किना फॅसोमधील IRSS या संस्थेनं केलेल्या अभ्यासात, सर्वप्रथम मेटारिझिअम बुरशीचा शोध लावला, ही बुरशी मलेरिया पसरवणाऱ्या अनोफिलिस डासांचं संक्रमण नैसर्गिकरित्या रोखू शकते.

"या बुरशी खूपच परिणामकारक आहेत, तुम्ही जनुकीय बदल करून सोप्या पद्धतीनं डासांना संपवण्याचं तंत्रज्ञान विकसित करू शकता," असं University of Marylandचे प्राध्यापक रेमंड लेजर सांगतात.

कोळी

फोटो स्रोत, Getty Images

नंतर त्यांचं रूपांतर विषात होतं. जे ऑस्ट्रेलियातल्या फनेल-वेब कोळीमध्ये सापडतं.

"कोळी त्याचे दात वापरून कीटकाच्या शरीरात छेद करतो आणि मग त्यात विष पसरवतो. या प्रयोगात आम्ही कोळ्याच्या दातांऐवजी मेटारिझिअम वापरलं," लेजर पुढे सांगतात.

जनुकीय बदल केलेली बुरशी अशा कीटकांना वेगानं मारू शकते आणि यासाठी बुरशीजन्य पदार्थ कमी प्रमाणात लागतात, असं प्रयोगशाळेतील चाचण्यांमधून समोर आलं आहे.

यानंतर वास्तविक परिस्थितीत बुरशीचं निरीक्षण करणं, ही पुढची पायरी होती.

शेड

फोटो स्रोत, ETIENNE BILGO

यासाठी मग बर्किना फॅसोमध्ये 6500 स्क्वेअर फुटांचं एक शेड उभारण्यात आलं. त्यामध्ये झाडं, पाण्याचे स्रोत आणि डासांसाठी अन्न ठेवण्यात आलं होतं.

या शेडला मच्छरदानीच्या दुहेरी आवरणानं आच्छादण्यात आलं होतं, जेणेकरून काही बाहेर जाणार नाही.

यानंतर या बुरशीला तीळाच्या तेलासोबत मिक्स करण्यात आलं आणि त्यानंतर कापसाच्या काळ्या रंगाच्या कापडानं पुसण्यात आलं. या डासांना बुरशीच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी कापडावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 1,500 डासांवर संशोधकांनी हा प्रयोग करून पाहिला.

डासांना एकटं सोडल्यानंतर त्यांची संख्या वाढली होती, असं जर्नल सायन्समध्ये म्हटलं आहे. पण, ज्यावेळी विषारी बुरशी वापरली, तेव्हा 45 दिवसात फक्त 13 डास शिल्लक दिसून आले.

"फक्त दोन टप्प्यांत बुरशीनं डासांचा खात्मा केला," असं University of Marylandचे प्राध्यापक डॉ. ब्रेन लोवेट यांनी सांगितलं.

प्रयोगशाळा परिसर

फोटो स्रोत, OLIVER ZIDA

या शिवाय बुरशी डासांवर परिणामकारक ठरली, तिनं मधमाशांसारख्या इतक कीटकांवर प्रभाव केला नाही.

"डासांचा संपूर्ण नायनाट करण्याचा आमच्या तंत्रज्ञानाचा हेतू नाहीये. या भागातील मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत," लोवेट सांगतात.

मलेरियाचा सामना करण्यासाठी नवीन साधनं शोधणं आवश्यक आहेत, कारण डास हे कीटकनाशकांना प्रतिरोधक ठरत आहेत.

आफ्रिकेतील सर्वांत वाईट प्रभावित देशांमध्ये मलेरियाच्या प्रकरणांची वाढ होत आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

"हा खूपच उत्साह वाढवणारा अभ्यास आहे," असं या संशोधनाविषयी University of Oxfordचे प्राध्यापक मिशेल बोन्सल यांनी म्हटलं आहे.

बुरशीचा संसर्ग झालेला डास

फोटो स्रोत, BRIAN LOVETT

या तंत्रज्ञानातून डासांवर नियंत्रण ठेवणं मोठ्या प्रमाणावर शक्य आहे.

"पण आता यासाठी अनुवांशिक जैव-सुरक्षितता नियमांची आवश्यकता आहे, जेणेकरून जेनेटिक पद्धती वापरून डासांच्या नियंत्रणासाठी कार्यपद्धती इतर उत्साही प्रतिबंधांद्वारे गमावली जाणार नाही," असं ते पुढे सांगतात.

Liverpool School of Tropical Medicineचे डॉ. टोनी नोलॅन सांगतात, "हे निकाल उत्साहवर्धक आहेत."

"सध्या डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पद्धतींचा विकास करण्यासाठी नवीन आणि पूरक साधनांची आवश्यकता आहे," ते पुढे सांगतात.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)