ऑस्ट्रेलियात आढळला तीन डोळ्यांचा साप

फोटो स्रोत, Nt parks and wild life
मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियात महामार्गाच्या कडेला तीन डोळ्यांचा साप आढळला होता. त्या सापाचे फोटो अधिकाऱ्यांनी शेअर देखील केले होते. या सापाचं निधन झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नॉर्दन टेरिटरी पार्क्स आणि ऑस्ट्रेलियाच्या वन्यजीव खात्याने या सापाचे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना ते म्हणाले की हा साप 'विलक्षण' आहे. या सापाचं नाव त्यांनी मोंटी पायथन असं ठेवलं होतं.
नैसर्गिक उत्परिवर्तन किंवा नॅच्युरल म्युटेशनमुळे या सापाला तीन डोळे होते असं वैज्ञानिक सांगतात. ऑस्ट्रेलियातल्या डार्विन या ठिकाणाजवळ हम्पटी डू नावाचं एक छोटं शहर आहे त्या ठिकाणी वनअधिकाऱ्यांना हा साप आढळला होता.
या सापाची लांबी 15 इंच होती आणि त्याच्या स्थितीमुळे त्याला खाताना अडचण होत होती असं अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Nt parks and wildlife
या सापाचा अभ्यास करण्यात आला. दोन डोके एकत्र झाल्यामुळे या सापात हे व्यंग झालं असावं अशी शंका वैज्ञानिकांना आली होती. पण एक्स-रेचं निरीक्षण केल्यावर त्यांना कळलं की सापाला एकच तोंड आहे आणि त्याच्या कवटीवर एक जास्तीचा डोळा आहे.
हा साप तिन्ही डोळ्यांनी पाहू शकत होता असं वैज्ञानिक सांगतात.
सर्पतज्ज्ञ ब्रायन फ्राय सांगतात की "म्युटेशन हा उत्क्रांतीतला नैसर्गिक भाग आहे. जेव्हा प्रत्येक बाळ जन्माला येतं तेव्हा काही प्रमाणात म्युटेशन होतं. पण या सापाच्या दुर्दैवामुळे त्याला तीन डोळे मिळाले."
"मी या आधी कधीही तीन डोळ्यांचा साप पाहिलेला नव्हता. आमच्या प्रयोगशाळेत दोन तोंडांचा साप आहे. हा साप म्हणजे एका वेगळ्या प्रकारचं म्युटेशन आहे." असं ब्रायन सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








