सूर्यमालेतील सर्वांत छोट्या ग्रहाला नाव सुचवण्यात मदत कराल?

फोटो स्रोत, HELP NAME 2007 OR10
सूर्यमालेतील एका नवीन लघुग्रहासाठी नाव सुचविण्याचं आवाहन खगोलशास्त्रज्ञांनी केलं आहे. या ग्रहाचा शोध 2007 साली लागला होता. तेव्हापासून आजपर्यंत हा ग्रह नावाशिवायच आहे.
अतिशय छोटा असा हा ग्रह नेपच्यून ग्रहाच्याही पलीकडे आहे. आतापर्यंत या ग्रहाला (225088) 2007 OR10 म्हणूनच ओळखलं जात आहे.
त्यामुळेच हा ग्रह शोधणाऱ्या शास्त्रज्ञांनी त्याच्या बारशाची जबाबदारी लोकांवरच सोपवली आहे. या ग्रहाला आकर्षक नाव निवडण्यासाठी शास्त्रज्ञांनी लोकांकडून मतं मागविली आहेत. या ग्रहाला नाव देण्यासाठी गॉन्गोन्ग, होला आणि विली असे तीन पर्याय समोर आले आहेत.
या तीनपैकी ज्या नावाला सर्वाधिक पसंती मिळेल, ते नाव इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियनला सुचविण्यात येईल.
निवडलेली अंतिम तीन नावं
गॉन्गोन्ग हे चिनी देवतेचं नाव आहे. जलतत्त्वाचा देव असलेल्या गॉन्गोन्गचं वर्णन 'लाल केस आणि सापाप्रमाणे शेपटी असलेला' असं करण्यात आलं आहे. गोन्गोन्गमुळे पूर येतात. तो पृथ्वीला हादरवून सोडतो आणि अव्यवस्था निर्माण करतो, अशी अख्यायिका आहे.
होला ही युरोपियन देवता आहे. प्रजनन, पुनर्जन्म यांच्याशी संबंधित ही देवता आहे. तर विली हा एक नॉर्डिक देव आहे. त्याने बर्फाळ राक्षस यमिरला पराभूत केलं आणि त्याच्या शरीरापासून विश्वाची निर्मिती केली, अशी लोककथा आहे.
2007 OR10 हा ग्रह कायपर बेल्टमध्ये आहे. त्याचा व्यास 775 मैल (1, 247 किलोमीटर) आहे. म्हणजेच याचा आकार हा प्लुटो ग्रहाच्या निम्मा आहे. प्लुटोसुद्धा एक लघुग्रहच आहे.
या अनामिक ग्रहासाठी नाव सुचविण्याची अंतिम तारीख 10 मे आहे. जर या तीन नावांपैकी एक नाव तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही एकापेक्षा अधिक वेळाही त्या नावासाठी आपलं मत नोंदवू शकतात.
तब्बल 12 वर्षं नावाशिवाय काढल्यानंतर आता लवकरच या छोट्याशा ग्रहाला नाव मिळेल, अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








