स्पेसएक्स : अवकाश सफरीचं स्वप्न पूर्ण होणार?

फोटो स्रोत, NASA
- Author, जॉनाथन अॅमॉस
- Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत असणारी खासगी संस्था स्पेसएक्स अवकाशात माणूस नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कॅप्सूलचं प्रक्षेपण केलं आहे. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून हे प्रक्षेपण झालं आहे. व्यावसायिक पातळीवर अवकाश प्रवासाच्या दृष्टीने हा पहिला टप्पा आहे, असं स्पेसएक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.
जर हे प्रक्षेपण यशस्वी झालं तर नियमितपणे आंतराळवीरांना अवकाशात नेण्यासाठी या कॅप्सुलला परवानगी मिळू शकते.
स्पेसएक्स ड्रॅगन 9 रॉकेट आणि ड्रॅगन क्रु कॅप्सुलचं केनडी स्पेस सेंटरमधील पॅड 39वरून प्रक्षेपण केलं. तिथल्या प्रमाण वेळेनुसार पहाटे 2.49 मिनिटांनी हे प्रक्षेपण झालं. रविवारी हे कॅप्सुल इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पोहोचणार आहे.
या कॅप्सुलमध्ये माणूस नाही. कॅप्सुल प्रात्याक्षिक म्हणून प्रक्षेपित करण्यात आले असून त्यात माणसाचा एक डमी बसवण्यात आला आहे. माणसाच्या आकाराचा अँथ्रोमॉफ्रिक सिम्युलेटर या कॅप्सुलमध्ये आहे. त्याची मान, डोक आणि कणा याच्या भोवतीने सेन्सर बसवण्यात आले आहेत. मनुष्य जेव्हा अंतराळात प्रवास करेल तेव्हा त्याच्यावर कोणकोणते दबाव असतील याची माहिती हे सेन्सर गोळा करतील. या डमीला 'रिप्ले' असं नाव देण्यात आलं आहे.
स्पेसएक्स या कंपनीच्या गेल्या 17 वर्षांतील इतिहासात हा महत्त्वाचा टप्पा आहे. मस्क यांनी ही कंपनी सुरू करताना लोकांना आंतराळात नेता यावं हा उद्देश ठेवला होता.
सध्या आमचं लक्ष नासाची गरज पूर्ण करणं हा आहे. ड्रॅगन कॅप्सूल सातत्याने वापरात आली तर व्यावसायिक पातळीवर आम्ही नागरिकांना आंतराळात नेण्याचा विचार करणार आहोत, असं मस्क म्हणाले. "आमच्यासाठी हा प्रयत्न आणि नासाने दिलेली संधी फार महत्त्वाची आहे," असंही ते सांगतात.
या कॅप्सुलमध्ये लाईफ सपोर्ट सिस्टम आहे. रॉकेट पृथ्वीच्या परीघात जाताना काही गडबड झाली तर लागू शकणाऱ्या आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
कॅप्सुल पृथ्वीवर परत येण्यासाठी 4 पॅराशूटही बसवण्यात आले आहेत. केनडी स्पेस सेंटरपासून फार दूर नसलेल्या अॅटलांटिक इथं हे कॅप्सुल परत येणार आहे.
नासाची बदलती भूमिका
या मोहिमेबरोबर नासा आंतराळवीरांनी अवकाशात पोहोचवण्याची जबाबदारी स्पेसएक्सकडे सोपवत आहे. पूर्वी सर्वच जबाबदारी नासाच्या तंत्रज्ञांकडे असायची. नवी कार्यपद्धती खर्च आणि वेळ वाचवणारी आहे. पण प्रत्येक टप्प्यावर नासाचं नियंत्रण मात्र असणार आहे.

फोटो स्रोत, Spaceex
यातून आम्हालाही बरंच काही शिकायला मिळणार आहे, असं नासाच्या ह्युमन स्पेसफ्लाईटचे प्रमुख बिल ग्रेस्टनमियर यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








