इजिप्त: ममीत रूपांतर केलेले उंदीर, फाल्कन पक्षी आणि बरंच काही शास्त्रज्ञांना सापडले

फोटो स्रोत, Reuters
इजिप्तच्या सोहाग शहरात एक मकबरा नुकताच सापडला आहे. त्याला नुकतंच सजवण्यात आलं आहे. तिथे अनेक वस्तू सापडल्या असून तिथे उंदराचं ममीत रूपांतर केल्याचंही दिसत आहे.
उंदीर आणि इतर प्राण्यांच्या सभोवताली दोन मानवी प्राण्यांच्या मृतदेहाचंही ममीत रूपांतर करण्यात आलं आहे. अंत्यसंस्कार करण्याच्या जागी मानवी प्राण्यांच्या अंत्यसंस्काराचे अनेक चित्र आहेत. तसंच शेतात कामं करणाऱ्या अनेक लोकांची चित्रं आहेत.
तज्ज्ञांच्या मते हा मकबरा 2000 वर्षं प्राचीन आहे. टुटू नावाचे एक ज्येष्ठ अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची ही विश्रांती घेण्याची ही जागा होती, असंही तज्ज्ञ सांगतात. ऑक्टोबरमध्ये काही दरोडेखोरांनी तिथे दरोडा घातला तेव्हा या जागेचा शोध लागला.

फोटो स्रोत, Reuters
ही जागा राजधानी कैरोपासून 390 किमी दूर आहे. हा भाग वाळवंटी असला तरी या ठिकाणी पर्यटक आकर्षित होतील, अशी आशा इजिप्तच्या पुरातत्व मंत्रालयाला आहे.
इजिप्तच्या Supreme Council of Antiquitiesचे सचिव मुस्तफा वाझिरी सांगतात, "हा अतिशय सुंदर मकबरा आहे. गेल्या काही वर्षातला हा सर्वोत्तम उत्तम शोध आहे. 2011च्या उठावानंतर देशात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे. त्यामुळे पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम झाला हे. या मकबऱ्यामुळे पर्यटक परत येतील अशी त्यांना आशा आहे."

फोटो स्रोत, Reuters
टॉलमिक काळातील एक महिला आणि एका पुरुषाची ममी मकबऱ्याच्या बाहेर मांडण्यात आली आहे. मृत्यूसमयी या महिलेचं वय 35 ते 50 होतं तर मुलाचं वय 12 ते 14 होतं.

फोटो स्रोत, Reuters
याशिवाय ममीत रूपांतर केलेले 50 उंदीर, मांजर आणि काही पक्षीही तिथे दिसतात.

फोटो स्रोत, Reuters

फोटो स्रोत, Reuters
इथे जो खजिना सापडला आहे त्यात रंगवलेल्या, आकर्षक चेहऱ्याचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Reuters
पुरातत्व मंत्रालयाच्या मते या प्रदर्शनाचा उद्देश इजिप्तमध्ये असलेल्या पुरातत्वीय गोष्टींकडे लक्ष वळवण्याचा आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








