उत्तर कोरिया निवडणूक: किम जाँग उन यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही

किम जाँग उन

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर कोरियामध्ये निवडणुका पार पडल्या. किम जाँग उन यांच्या पक्षाचे 100 टक्के खासदार संसदेत निवडून गेले आहेत पण यावेळी मात्र किम जाँग उन यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही.

ही निवडणूक केवळ एक औपचारिकता आहे असं म्हटलं जातं. नावापुरतं का होईना पण किम जाँग उन हे संसदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहतात.

पण यावेळी मात्र त्यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही.

किम यांची बहिण किम यो जाँग या खासदार बनल्या आहेत. किम यो जाँग यांचं राजकीय वजन वाढत चालल्याचं दिसत आहे. ही संसद अधिकृत आहे असं दाखवण्यासाठी या निवडणुका घेतल्या जातात. पण आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळोवेळी या निवडणुकाचा निषेध केला आहे.

कारण या निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या बॅलट पेपरवर केवळ एकाच जणाचं नाव असतं. त्यामुळे त्या उमेदवाराला नकारण्याचा अधिकारच मतदाराला नसतो. या संसदेला रबरी शिक्क्याची संसद असंही काही जण म्हणतात.

उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी सुप्रीम पीपल्स असेंब्लीच्या उत्तर कोरियाच्या संसदेचं नाव) 687 सदस्यांची नावं जाहीर केली. त्यात किम यांच्या नावाचा समावेश नव्हता.

किम यांचं नाव यादीत असलं काय किंवा नसलं काय यामुळे काही फरक पडत नाही असं तज्ज्ञ म्हणत आहेत. किम जाँग उन यांचं यादीत नाव नसणं हे त्यांची शक्ती कमी होण्याचं लक्षण आहे का असं विचारलं असता NKन्यूजच्या विश्लेषक रेचल मिनयंग ली सांगतात की ते खासदार असले किंवा नसले तरी त्यांची उत्तर कोरियावरची पकड ढिली झाली आहे असं समजण्याचं काही कारण नाही.

rueters

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर कोरियाची प्रतिमा बदलण्यासाठी ही रणनीती असावी. कारण जगातील बहुतांश लोकशाहीमध्ये राष्ट्राध्यक्ष हा संसदेचा सदस्य नसतो.

किम यो जाँग ( किम जाँग उन यांची बहिण) या 2014मध्ये खासदार झाल्या नव्हत्या. तर कुण्या खासदाराचा मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणुकीत त्या खासदार बनल्या असाव्यात असं रेचल मिनयंग ली सांगतात.

किम जाँग उन यांची बहिण किम यो जाँग

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, किम जाँग उन यांची बहिण किम यो जाँग

किम यो जाँग यांचं सत्तेतलं महत्त्व वाढत चाललं आहे. 2014मध्ये त्या प्रचार आणि आंदोलन या विभागाच्या उपसंचालक बनल्या होत्या. तेव्हापासून त्या सत्तेतली एक एक पायरी चढत आहेत. किम जाँग उन यांच्या परदेश दौऱ्यावेळी त्या देखील उपस्थित असतात. नुकताच डोनल्ड ट्रंप आणि किम जाँग उन यांची हनोई येथे भेट झाली. त्यावेळी किम यो जाँग देखील उपस्थित होत्या.

गेल्या रविवारी उत्तर कोरियात मतदान झालं. 17 वर्षांच्या प्रत्येक नागरिकाला हे मतदान अनिवार्य असतं. दर पाच वर्षाला या ठिकाणी मतदान होतं. मतदानाची टक्केवारी 100 टक्के असते आणि सत्ताधारी पक्ष वर्कर्स पार्टी ही एकमताने निवडून येते. उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था KCNA नं म्हटलं की यावेळी मतदानाची टक्केवारी ही 99.99 टक्के आहे. जे लोक परदेशात आहेत ते मतदानाला येऊ शकले नाही असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)