डोनाल्ड ट्रंप यांचा भारताला इशारा, 'मेड इन इंडिया' अडचणीत?

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेत आयात होणाऱ्या करमुक्त भारतीय उत्पादनांवर कर लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या वस्तूंवर अधिक कर लादला जात आहे, यामुळे हे पाऊल उचलण्याचा विचार असल्याचा ट्रंप यांनी काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
"भारतीय बाजारपेठेत अमेरिकेला वाजवी आणि न्याय्य स्थान मिळेल, अशी हमी भारतानं दिलेली नाही, त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे," असं ट्रंप यांनी काँग्रेस नेत्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
1970 मधील योजनेनुसार, अमेरिकेत भारतातून होणाऱ्या 5.6 अब्ज डॉलरच्या व्यापाऱ्यावर कर लादला जात नाही. पण अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर मोठा कर लादला जात आहे.
अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये राजकीय आणि संरक्षणदृष्ट्या घनिष्ठ संबंध आहेत, पण व्यापारीदृष्ट्या हे संबंध तणावाचे बनत चालले आहेत.
Generalized System of Preferences (GSP) प्रणालीतून भारताला बाहेर काढलं तरी पुढील 60 दिवस त्याचा काही परिणाम जाणवणार नाही, असं काँग्रेस आणि भारत सरकारला जारी केलेल्या निवेदनानंतर U.S. Trade Representative's Officeनं म्हटलं आहे.
2017मध्ये भारत आणि अमेरिकेतील व्यापारी तूट 27.3 अब्ज डॉलर इतकी होती, असं U.S. Trade Representative's Officeनं सांगितलं आहे.
भारत देश GSP प्रणालीचा सर्वांत मोठा लाभार्थी आहे. भारताला या प्रणालीतून वगळल्यास ती डोनाल्ड ट्रंप यांनी सत्तेत आल्यानंतर भारताविरुद्ध केलेली सर्वांत मोठी दंडात्मक कारवाई ठरेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








