चारा टाकायला गेलेल्या महिलेला चक्क डुकरांनी खाल्लं

फोटो स्रोत, Science Photo Library
रशियातील 56 वर्षीय महिला पाळलेल्या डुकरांना चारा घालायला गेली होती. तिथं तिचा पाय घसरला तेव्हा डुकरांनी चाऱ्याऐवजी तिलाच खाऊन टाकल्याची घटना समोर आली आहे.
मध्य रशियातल्या उदमुर्शिया इथल्या एका गावात ही घटना घडली आहे. घराजवळ डुकरांना चारा घालायला ही महिला गेली असताना तिला चक्कर आल्याने पाय घसरला आणि ती खाली पडली. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.
अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाला, असं सांगितलं जातं. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार महिलेचा पती प्रकृती बरी नसल्याने घरातच आराम करत होता.
मात्र जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने पत्नीची शोधाशोध सुरु केली. तेव्हा त्याला पत्नीच्या शरीराचे काही भाग डुकरांनी खाल्ल्याचे आढळून आलं.
अमेरिकतही डुकरांनी माणसाला खाल्ल्याच्या घटना
2012मध्ये अमेरिकेतल्या 69 वर्षीय टेरी व्हेन्स गार्नर यांना पाळीव डुकरांनी खाल्ल होतं. टेरी गार्नर हे ऑरेगन राज्यातले शेतकरी होते.
कुटुंबियांना त्यांच्या शरीराचे तुकडे सापडले होते. या घटनेच्या आधी डुकराने चावा घेतला होता, असं या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कदाचित ऱ्हदय विकाराच्या झटक्यानं गार्नर कोसळले असतील तेव्हा डुकरांनी त्यांच्यावर झडप मारली असा अंदाज लावला गेला होता. इथल्या एका डुकराचं वजन साधारण 320 किलो आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








