विजय माल्यांच्या हस्तांतरणास ब्रिटीश सरकारची मंजुरी

विजय माल्या

फोटो स्रोत, AFP/Getty Images

भारतीय बँकांना करोडोचा चुना लावणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतात आणण्याच्या प्रयत्नांना बळ मिळताना दिसत आहे.

कारण ब्रिटन सरकारचे गृह सचिव साजिद जावेद यांनी सोमवारी विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. त्या आदेशावर आज त्यांनी स्वाक्षरीही केली.

अर्थात साजिद जावेद यांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यासाठी मल्ल्या यांना 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

डिसेंबरमध्ये प्रत्यार्पणाला विरोध करणारी विजय मल्ल्या यांची याचिका ब्रिटनच्या कोर्टाने आधीच निकाली काढली आहे. त्यामुळे आता साजिद जावेद यांचा आदेश विजय मल्ल्या यांना मोठा झटका मानला जात आहे.

63 वर्षाचे विजय मल्ल्या हे किंगफिशर एअरलाईन्सचे प्रमुख होते. यावेळी त्यांच्यावर भारतीय बँकांना 9 हजार कोटी रुपयांना बुडल्याचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे.

सध्या ब्रिटनमध्ये राहत असलेल्या विजय मल्ल्या यांना एप्रिल 2017 मध्ये प्रत्यार्पण समन्स बजावलं होतं. तेव्हापासून ते जामिनावर आहेत.

दरम्यान वेस्टमिन्स्टर कोर्टाने विजय मल्ल्यांच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर त्यांनी या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान ब्रिटन गृहसचिवांच्या आदेशानंतर भाजप नेत्यांनी हा भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईचा विजय असल्याचं म्हटलं आहे.

न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असलेल्या अरुण जेटली यांनी ट्वीट करुन विरोधकांचाही समाचार घेतला आहे. ते म्हणतात, "विरोधक शारदा चिटफंडमधील घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना तिकडे मोदी सरकारने मल्ल्यांच्या प्रत्यार्पणासाठी आणखी एक पायरी पुढं गेलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

तर आपच्या नेत्या आणि आमदार अलका लांबा यांनी मात्र मल्ल्या प्रकरणावरुन भाजपला कोपरखळी मारलीय. त्यांनी म्हटलंय की, "फक्त आरोपीच येणार की देशाचे 9 हजार कोटीही येणार? आम्ही ऐकलंय की दिल्लीत भाजपचं भव्य मुख्यालय बांधण्यासाठी ते पैसे दान म्हणून देऊन गेले होते"

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)