किम जाँग-उन आणि रॉड्रिगो डुटर्टे यांचे डुप्लिकेट जेव्हा एकमेकांना भेटतात - फोटो

फोटो स्रोत, EPA
फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम-जाँग-उन या दोघांनाही हॉंगकॉंगच्या रस्त्यांवर बघून अनेकांचा गोंधळ उडाला. एका ठिकाणी ते चक्क फ्राइड चिकन खाताना आणि कोल्डड्रिंक्स पिताना दिसले.
अनेकांना वाटलं की 'अरे! हे दोन मोठे नेते असे हॉंगकॉंगच्या रस्त्यांवर काय करत आहेत?'
पण थांबा, नीट पाहिल्यावर हे लक्षात येईल की हे दोघेही तोतये आहेत!
हे होते 'डुटर्टे' यांच्यासारखे दिसणारे क्रेसेन्सिओ एक्स्ट्रीम आणि किम जाँग-उन यांच्यासारखे दिसणारे हॉवर्ड एक्स.
काल हॉंगकाँगमध्ये या दोन राष्ट्राध्यक्षांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींना पाहायला लोकांची झुंबड उडाली होती. त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

फोटो स्रोत, EPA
त्या चिकन रेस्टोरंटमध्ये या दोघा तोतयांनी खोट्या रायफलही हातात घेतल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
डुटर्टे नेहेमी पांढरा शर्ट घालतात. त्याचप्रमाणे या तोतयानेही पांढरा शर्ट घालून चर्चमध्ये प्रार्थना केली.

फोटो स्रोत, Getty Images
डुटर्टे यांच्यासारख्या दिसणाऱ्या तोतयाबरोबर सेल्फी काढण्यासाठी लोकांमध्ये झुंबड उडाली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, EPA
मग त्यांनी एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन चिकनवर ताव मारला. आणि बरेच फोटोही काढले.
एवढे फोटो पाहून तुम्हालाही खरे डुटर्टे आणि किम कसे दिसतात, याचा जरा विसर पडला असेल तर हे घ्या...

फोटो स्रोत, EPA

फोटो स्रोत, Getty Images
सर्व फोटोंना कॉपीराइट लागू आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








